Breaking News

Tag Archives: ncp (sharad pawar group)

उत्पन्न वाढीच्या मुद्यावरून जयंत पाटील हसन मुश्रीफ यांच्यात रंगला वाद पहिल्यादाच राष्ट्रवादीच्या दोन गटातील मंत्र्यांमध्ये रंगला वाद

राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर सत्ताधारी गटासोबत गेलेल्या अजित पवार यांच्यासह ९ आमदार मंत्र्यांमध्ये आणि शरद पवार यांच्या गटात आतापर्यंत एखाद्या प्रश्नावरून वाद रंगल्याचे चित्र सध्या सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनात दिसले नव्हते. मात्र आज पहिल्यांदाच अजित पवार गटाचे मंत्री हसन मुश्रीफ आणि शरद पवार गटाचे आमदारा जयंत पाटील यांच्यात लक्षवेधीवरील …

Read More »

जितेंद्र आव्हाड यांचा सवाल, सावित्रीबाई यांच्याविरोधात लिखाण करणारे आरोपी कसे सापडत नाहीत? सरकारची भूमिका संशयास्पद; विरोधकांचा सभात्याग

विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासा दरम्यान शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विरोधात आक्षेपार्ह लिखाण एका संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आले होते. त्यावर कारवाई करण्याचा निर्णयही घेण्यात आला होता. मात्र आतापर्यंत ते आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या लेखकावरही कारवाई का कऱण्यात आली नाही असा सवाल विधानसभेत उपस्थित केला. यावेळी …

Read More »

मणिपूर प्रश्नी जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली गांधी पुतळ्यासमोर आंदोलन सलग दोन महिने मणिपूर धगधगतंय मात्र सरकार निष्क्रिय !

मणिपूर येथे घडणाऱ्या हिंसाचार विरोधात व केंद्र सरकारच्या निष्क्रियतेविरोधात आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्यभर आंदोलन करण्यात आले. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालय परिसरातील गांधी पुतळ्यासमोर मौन व्रत धारण करून आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाबाबत माहिती देताना जयंत पाटील म्हणाले की, भारतात कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती किती …

Read More »

मंदिरात धूप घालण्याच्या मुद्यावरून शिंदे, पाटील यांच्या प्रश्नांना देवेंद्र फडणवीसांनी दिले हे उत्तर विधान परिषदेत रंगली खडाखडी

नाशिक मध्ये मुस्लिम समुदायाकडून काढण्यात आलेल्या संदल मिरवणूकीच्या मार्गात लागणाऱ्या त्र्यंबकेश्वर मंदिरात धुप घालण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यावरून राज्यात भाजपाप्रणित संघटनांच्या प्रतिनिधींकडून मोठा गदारोळ माजविण्यात आला. त्यामुळे नाशिकमधील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. त्यानंतर राज्य सरकारने तपास करण्यासाठी एसआयटीची स्थापना केली. त्या एसटीच्या अनुषंगाने विधान परिषदेत पवार गटाचे आमदार …

Read More »

मणिपूर येथील महिलांच्या व्हायरल व्हिडिओवरून सुप्रिया सुळे यांची मोदी सरकारवर टीका महिलांच्या सन्मानाचे रक्षण करण्यात मोदी सरकार अपयशी

भाजपाची मणिपूर राज्यात सत्ता असूनही मागील दोन महिन्याहून अधिक काळ सातत्याने हिंसाचार सुरु आहे. तसेच अमेरिका आणि फ्रांसच्या दौऱ्यावर जाणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अद्याप मणिपूर येथे सुरु असलेल्या हिंसाचार प्रकरणी चकार शब्द काढला नाही की तेथे भेट दिली नाही. त्यातच मणिपूरमध्ये हिंसक जमावाने दोन महिलांची नग्न अवस्थेत घिंड काढल्याचा …

Read More »

देवेंद्र फडणवीस यांची घोषणा, सर्व पोलिस ठाण्यात स्वतंत्र अमली पदार्थ विरोधी कक्ष दहशतवाद विरोधी पथक 'समन्वय एजन्सी' म्हणून काम पाहणार

राज्यातील अमली पदार्थांच्या व्यापार आणि प्रसारास आळा घालण्यासाठी कडक भूमिका राज्य शासनाने घेतली असून सर्व पोलिस ठाण्यांमध्ये स्वतंत्र अमली पदार्थ विरोधी कक्ष स्थापन करण्यात आल्याची घोषणा उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करत अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी संबंधितांना शिक्षा होण्यासंदर्भात ते पदार्थ बाळगण्याची मर्यादा कमी करण्यासंदर्भात केंद्र सरकारला विनंती करणार असल्याची …

Read More »

अजित पवार गट- शरद पवार यांच्यात चर्चा, जयंत पाटील यांनी दिली ही माहिती भाजपाबरोबर जाण्याचा प्रश्नच येत नाही अशी शरद पवार यांची भूमिका

शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमधून बंडखोरी करत अजित पवार यांनी राज्यातील भाजपा प्रणित शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होत पाठिंबा दिला. त्यानंतर अजित पवार गटाच्या नेत्यांनी शरद पवार यांच्यावर यथेच्छ टीका केली. त्यानंतर आता कायदेशीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता गृहीत धरून अजित पवार गटाने नमती भूमिका घेत काल रविवारी आणि आज …

Read More »

शरद पवार यांच्या मनधरणीसाठी अजित पवार गट पुन्हा चव्हाण प्रतिष्ठानमध्ये प्रफुल पटेल म्हणाले, शरद पवार हे आमचे दैवत, पक्ष एकसंध व मार्गदर्शन घेण्यासाठी आलो

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशनाच्या एक दिवस आधी रविवारी अजित पवार गटाने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची मनधरणी करण्यासाठी भेट घेतली. त्यानंतर आज विधिमंडळाच्या विधानसभा आणि विधान परिषदेच्या सभागृहात अजित पवार समर्थक आमदार सत्ताधारी बाकावर आणि शरद पवार समर्थक आमदार विरोधी बाकावर बसल्याचे दिसून येत होते. मात्र …

Read More »

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांमध्ये संभ्रम “इकडे की तिकडे?” दोन नेत्यांची बाजू घेण्याऐवजी गैरहजर राहणेच बरे असे समजून गैरहजर

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या नेतृत्वा विरोधात त्यांचेच पुतणे तथा विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आपल्या समर्थक आमदारांना घेऊन भाजपा-प्रणित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारला पाठिंबा देत सहभागी झाली. आतापर्यंत शरद पवार यांनी आपल्यावर अन्याय केल्याची भावना व्यक्त करत अजित पवार आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी भूमिका …

Read More »

फडणवीसांनी उल्लेख केलेल्या शिंदे सरकारला लिहिलेल्या विरोधकांच्या पत्रात आहे तरी काय? वाचा तर मग या कारणामुळे चहापनावर टाकला बहिष्कार

राज्यातील भाजपा प्रणित शिंदे-फडणवीस सरकारला अजित पवार यांच्या रूपाने तिसरे इंजिन लागलेले असतानाही वेगवान निर्णय गतिमान सरकार या घोषणेची प्रत्यक्ष अंमलबजाणी होताना दिसत नाही. तसेच मागील एक वर्षाच्या कालावधीत शिंदे-फडणवीस-पवार सरकारने वारेमाप घोषणा केल्या. मात्र त्या घोषणांची अंमलबजावणी होताना दिसत नाही. त्याचबरोबर राज्यातील कायदा-सुव्यवस्था आदींसह शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विरोधी पक्षनेते अंबादास …

Read More »