Breaking News

Tag Archives: mumbai high court

पुणे वगळता महाराष्ट्र आणि गोव्यातील सर्व न्यायालये सुरु मुंबई उच्च न्यायालयाकडून आदेश जारी

मुंबईः प्रतिनिधी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्र आणि गोव्यातील सर्व न्यायालयांचे कामकाज सुरुवातीला थांबविण्यात आले. मात्र अनलॉक प्रक्रियेमध्ये ऑनलाईन सुरु करण्यास मंजूरी देण्यात आली. मात्र आता १०० टक्के क्षमतेसह दोन टप्प्यात पुणे वगळता इतर जिल्ह्यांमध्ये १ डिसेंबर २०२० रोजीपासून न्यायालयीन कामकाज सुरु करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाचे रजिस्ट्रार एस.जी दिघे यांनी …

Read More »

मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने औरंगाबाद खंडपीठाचा महत्वपूर्ण निर्णय तुर्तास ईडब्लूएसचा दर्जा देण्यास होकार

मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यातील मराठा समाजाच्या आरक्षणप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रलंबित आहे. मात्र मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने ईडब्ल्युएसचे प्रमाणपत्र सादर केल्याने सदर मराठा समाजातील व्यक्तीला ईडब्ल्युएस अंतर्गत असलेले फायदे देण्याचा महत्वपूर्ण निकाल देत पुढील सुणावनी १ डिसेंबर रोजी घेणार असल्याचे स्पष्ट केले. बीड जिल्ह्यातील मराठा समाजातील एका ज्ञानेश्वर पिराजी …

Read More »

आशिष शेलार यांच्या याचिकेवर उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला दिले हेआदेश ४ नोव्हेंबर २०२० पर्यत प्रतिज्ञा पत्र सादर करण्याचे आदेश

मुंबई: प्रतिनिधी कोरोना बाधित रुग्णांवर शासकिय रूग्णालयात उपचार सुरु असताना त्या रूग्णांची पुरेशी काळजी घेतली नसल्याच्या १० घटनांप्रकरणी भाजपा आमदार आशिष शेलार यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. या होत असलेल्या बेजबाबदारी प्रकरणी राज्य सरकारला ४ नोव्हेंबर पर्यत प्रतिज्ञा पत्र सादर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने आज दिले. मुख्य न्यायाधीश दिपंकर दत्ता …

Read More »

सार्वजनिक उत्सवावर नऊ तपासणी पथकांची राहणार नजर जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे पथकांची नियुक्ती

मुंबई : प्रतिनिधी सार्वजनिक उत्सवासाठी उभारण्यात येणाऱ्या मंडपांच्या तपासणीसाठी मुंबई शहर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुंबई महानगरपालिका क्षेत्रात तीन समित्या व नऊ पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. आगामी सणासुदीच्या कालखंडात विविध मंडळांतर्फे उत्सव साजरे केले जातील. त्या अनुषंगाने उभारण्यात येणऱ्या मंडपांची तपासणी करुन त्याचा अहवाल देण्याची जबाबदारी या पथकांवर सोपविण्यात आली आहे. उच्च …

Read More »

जप्त केलेले मास्क, हँड सॅनिटायझर, पीपीई कीट्स रूग्णालयांना द्या काँग्रेस नेते मोहन जोशी यांच्या याचिकेवर उच्च न्यायालयाचे माहिती सादर करण्याचे आदेश

मुंबई: प्रतिनिधी सरकारच्या विविध खात्यांनी जप्त केलेली पीपीई कीट्स वापरात आणण्यासाठी खुली करावीत याकरीता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस आणि माजी आमदार मोहन जोशी यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून त्यावर राज्य सरकारने याबाबत माहिती द्यावी असे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. या याचिकेवर उच्च न्यायालयाचे न्यायाधीश बी.पी.कोलाबावाला यांच्या …

Read More »

पीएमसी बँकप्रकरणी उच्च न्यायालयाचे रिझर्व्ह बँकेला आदेश १३ नोव्हेंबरपर्यंत काय केले आणि पुढची दिशेची माहिती सादर करा

मुंबई: प्रतिनिधी पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी खोतदारकांना दिलासा देण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) अद्याप कुठली पावले उचलली आहेत व यातून मार्ग काढण्यासाठी पुढील दिशा काय असेल, याची माहिती १३ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयात सादर करावीत, असे स्पष्ट आदेश मुंबई उच्च न्यायालयाने आरबीआरला दिले. याबाबतची पुढील सुनावणी आता १९ नोव्हेंबरला घेण्यात येणार असल्याची …

Read More »

२००५ पूर्वीच्या शिक्षक-प्राध्यापकांनाही नव्या पेन्शन योजनेचा लाभ मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील लाखो शिक्षक आणि प्राध्यापकांची नियुक्ती २००५ पूर्वीची असेल, मात्र ते शिकवित असलेल्या संस्थेला त्यानंतर १०० टक्के ग्रँट मिळालेले असेल तर त्यांना नवी पेन्शन योजनाच लागू होणार असल्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या तीन सदस्यीय खंडपीठाने नुकताच दिला. विविध शासकिय आणि खाजगी शाळांमधील जवळपास १५ ते २० शिक्षकांनी राज्य …

Read More »

वसई-विरार महानगरपालिकेतील अखेर ती २९ गावे अखेर शासनाने वगळली माजी आमदार विवेक पंडीत यांच्या लढ्याला यश

मुंबई: प्रतिनिधी अनेक वर्ष वसई-विरार महानगरपालिकेतून बळजबरीने लोकांच्या मताविरुद्ध सामील केल्या गेलेल्या २९ गावांना वगळावे याकरिता विविध स्तरांवर लढा, आंदोलने केली गेली. तसेच या मागणीकरिता प्रदीर्घ न्यायालयीन लढा ही उभा केला गेला. या पार्श्वभूमीवर २९ गावांना महानगरपालिकेतून वगळण्याचा निर्णय राज्य शासनाने नुकताच घेतला. गावे वगळल्याच्या निर्णयाचे प्रतिज्ञापत्र महाराष्ट्र राज्य शासनाने …

Read More »

उच्च न्यायालयाने काढलेले वाभाडे मुख्यमंत्र्यांसाठी लज्जास्पद काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांची टीका

मुंबईः प्रतिनिधी डॉ. दाभोलकर, कॉ. पानसरे यांच्या हत्येप्रकरणी तपास यंत्रणांकडून होत असलेल्या अक्षम्य दिरंगाईमुळे संतापून उच्च न्यायालयाने राज्यातील पोलीस यंत्रणेचे वाभाडे काढले आहेत. उच्च न्यायालयाने आपल्या १४ मार्च २०१९ च्या आदेशात सरकारवर आसूड ओढलेले आहेत. राज्यातील पोलीस यंत्रणेची कामगिरी पूर्णपणे निराशाजनक असून उच्च न्यायालयाने वापरलेल्या प्रत्येक शब्दातून उद्वेग दिसून येत …

Read More »

अवैध घुसखोर घुसविणाऱ्या विकासकावर कारवाई मंत्रिमंडळ उपसमितीची सरकारला शिफारस

मुंबईः प्रतिनिधी एसआरए पुर्नवसन प्रकल्पातील एखाद्या सदनिकेत विकासकानेच जर अवैधरित्या घुसखोर घुसविला असेल तर ती सदनिका ताब्यात घेवून त्या विकासकावर कायदेशीर बडगा उगारण्याची शिफारस मंत्रिमंडळ उपसमितीने केली. गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता यांच्या अध्यक्ष प्रकास महेता यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक गुरूवारी पार पडली त्यात वरील शिफारसी करण्यात आल्या. मुंबई महानगराला …

Read More »