Breaking News

Tag Archives: loksabha election

अखिलेश यादव यांचे भाकित,…तर भाजपाचा ८० जागांवर पराभव होईल.. भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी वैद्यकीय महाविल्यालयांना भेटी द्याव्या मग कळेल

उत्तर प्रदेशात काही महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणूकीत समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनी चांगलीच लढत देत भाजपाचा जवळपास ५० जागांवर पराभव केला. तसेच ३०० पार असलेल्या भाजपाला २५० जागांवर रोखले. त्यानंतर आगामी लोकसभा निवडणूकीत ८० जागांवर भाजपाचा पराभव होऊ शकतो असे भाकित केले. विशेष म्हणजे भाजपाने आगामी २०२४ च्या लोकसभा …

Read More »

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डांच्या वक्तव्यावर शरद पवार म्हणाले, आमच्या त्यांना शुभेच्छा चुकीने ३ जागा कमी सांगितल्या

मागील दोन दिवसांपासून भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा हे महाराष्ट्र दौऱ्यावर असून त्यांनी लोकसभेच्या ४५ तर लोकसभेच्या २०० जागा जिंकण्याचा संकल्प जाहिर केला. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या समन्वयाने लोकसभेत घवघवीत यश मिळवू अशी घोषणाही नड्डा यांनी केली. नड्डा यांच्या या घोषणेबद्दल आज राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार …

Read More »

लोकसभेच्या ४५, विधानसभेच्या २०० जागा जिंकण्याचे भाजपाचे उद्दिष्ट भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत बाळासाहेबांच्या शिवसेनेसह ४५ पेक्षा अधिक जागा जिंकण्याचे तसेच विधानसभा निवडणुकीत २०० पेक्षा अधिक जागा जिंकण्याचे उद्दिष्ट भाजपाने ठेवले असल्याची माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी भिवंडी येथे पत्रकार परिषदेत दिली. केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष आ किसन कथोरे, प्रदेश सरचिटणीस माधवी नाईक, विक्रांत पाटील, प्रदेश सचिव संदीप …

Read More »

देवेंद्र फडणवीस यांनी सांगितला भाजपाचा आगामी लोकसभा निवडणूकीचा प्लॅन… बैठकीनंतर दिली माहिती

नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणूकीत महाविकास आघाडी विशेषत: शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांना पराभूत करत भाजपाच्या धनंजय महाडिक यांचा आर्श्चयकारक विजय घडवून आणल्यानंतर भाजपाने आता आगामी लोकसभा निवडणूकीची तयारी सुरु केली आहे. याच तयारीचा भाग म्हणून भाजपाचे राष्ट्रीय महामंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थितीत मुंबईत एक बैठक पार पडली. या बैठकीत आगामी …

Read More »

मतदारांना भुलविण्यासाठी राज्य सरकारची अशीही चलाखी दुष्काळ, खरीप आणि गृहनिर्माण योजनांसाठी निधी उपलब्ध करून देण्याच्या कामाला गती

मुंबईः प्रतिनिधी निवडणूका आल्या की त्या जिंकण्यासाठी सत्ताधारी, विरोधकांकडून मतदारांना भुलविण्यासाठी कोणती ना कोणती लोकानुनयी घोषणा केली जाते. मात्र निवडणूका जिंकण्यासाठी राज्यातील भाजप-शिवसेनेच्या सरकारने थेट सरकारी निधीचाच वापर करत मागील दोन वर्षापासून रखडलेल्या शेतकऱ्यांना द्यावयाची नुकसान भरपाईचा निधी आणि शहरी भागातील नागरीकांच्या गृहनिर्माण प्रकल्पांना निधी पुरविण्याच्या हालचालींना मोठ्या प्रमाणावर वेग …

Read More »

लोकसभा निवडणुकीत महिलांची मते निर्णायक ठरणार महिला मतदारांचा टक्का वाढला

मुंबई: प्रतिनिधी महाराष्ट्रात चार टप्प्यात होणाऱ्या निवडणुकीतील उमेदवारांचे भवितव्य ठरविण्यात यंदा महिला मतदारांचा महत्वाचा वाटा असेल. 2004, 2009 आणि 2014 च्या तुलनेमध्ये महिला मतदारांचा टक्का वाढला आहे. 2004 मध्ये पुरुष आणि महिला मतदार अशी स्वतंत्र नोंदणी करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे त्यावर्षी एकूण 3 कोटी 42 लाख 63 हजार 317 मतदारांची …

Read More »

३ विद्यमान खासदारांसह १२ जण राष्ट्रवादीकडून रिंगणात राजू शेट्टी यांना पाठिंबा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची घोषणा

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे, साताराचे उद्यनराजे भोसले, कोल्हापूरचे धनंजय महाडीक या विद्यमान खासदारांना पुन्हा एकदा लोकसभा निवडणूकीसाठी उमेदवारी जाहीर करत रायगड लोकसभा मतदारसंघातून सुनिल तटकरे यांना उमेदवारी जाहीर करत असल्याची घोषणा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी करत राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली यादी जाहीर केली. याशिवाय ठाणे लोकसभेसाठी आनंद परांजपे, …

Read More »

सरकारी जाहीरातींमुळे आचार संहितेचा भंग होतोय जाब विचारून गुन्हा दाखल करण्याची काँग्रेसची मागणी

मुंबईः प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता दि. १० मार्च रोजी पासून लागू झालेली असतानाही राज्यभरातील एसटी बसेस, बस थांबे, पेट्रोल पंपासहित इतर सार्वजनिक ठिकाणी असलेल्या सरकारी प्रचाराच्या जाहिराती अद्याप काढण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे निवडणूक आयोगाने सरकारला जाब विचारून संबधितांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी …

Read More »

राज्यातील जागा वाटप आणि परिस्थितीचा काँग्रेस आढावा घेणार गुरूवारी गांधी भवन येथे होणार बैठक

मुंबईः प्रतिनिधी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतर्गत असलेली परिस्थिती आणि संभावित विजयी जागांचा आढावा घेण्यासाठी गुरूवारी सकाळपासून प्रदेश काँग्रेस कार्यकारणीची बैठक होणार आहे. ही बैठक प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली होणार असल्याची माहिती काँग्रेसमधील सूत्रांनी दिली. ऐन लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून जाहीर केलेली …

Read More »

लोकसभेसाठी राष्ट्रवादीचा आमदार काँग्रेसच्या वाटेवर आमदार सतीश चव्हाण हाताच्या पंजावर लढविणार निवडणूक

औरंगाबाद : प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीचा बिगूल वाजला असून, मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सतीश चव्हाण हे काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज भरणार असल्याची माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ.अब्दुल सतार यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच इतर उमेदवारांची नावे म्हणून जालना मतदारसंघातून डॉ. कल्याण काळे किंवा मी स्वतः यांच्यापैकी एक उमेदवार …

Read More »