Breaking News

Tag Archives: jitendra awhad

अखेर महिला आयोगाने आव्हाडप्रकरणी मागवला अहवाल

भाजपाच्या महिला कार्यकर्त्या रिदा रशीद यांनी आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार तथा माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात विनयभंगाची तक्रार पोलिसांमध्ये दाखल केली. त्यानंतर भाजपा नेत्यांकडून राष्ट्रवादी काँग्रेसवर टीकेची झोड उठविण्यास सुरुवात केली. तसेच तक्रारदार महिला रिदा रशीद यांनी मग आता महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर आणि खासदार सुप्रिया सुळे …

Read More »

रिदा रशीद यांचा सवाल, आ.आव्हाडांच्या कृत्याबद्दल खा.सुप्रियाताई, चाकणकर गप्प का?

राष्ट्रवादीचे आ.जितेंद्र आव्हाड यांनी रविवारी ठाण्यातील एका फ्लायओव्हरच्या उद्घाटनावेळी आपल्याशी केलेल्या गैरवर्तनाबाबत महिलांच्या सन्मानाची भाषा करणाऱ्या खा.सुप्रियाताई सुळे, महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपलीताई चाकणकर या गप्प का, त्यांचा महिलांच्या सन्मानाविषयीचा कळवळा आता गेला कुठे असा सवाल भाजपा महिला मोर्चा प्रदेश महामंत्री रिदा रशीद यांनी सोमवारी केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार …

Read More »

जयंत पाटील म्हणाले, आव्हाडांची समजूत काढली पण…

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा भाजपाच्या महिला कार्यकर्त्यीने नोंदविल्यानंतर आव्हाड यांनी आपण आपल्या आमदारकीचा राजीनामा देणार असल्याचे जाहिर केले. या घोषणेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे तातडीने आव्हाड यांच्या घरी पोहचत समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र जितेंद्र आव्हाड हे राजीनामा देण्याच्या मुद्यावर ठाम असल्याची माहिती …

Read More »

भाजपा म्हणते, नैतिकता असेल तर जितेंद्र आव्हाडांना पक्षातून निलंबित करा

राष्ट्रवादी काँग्रेस महिला सक्षमीकरणाची चर्चा करते पण त्या पक्षाकडे नैतिकता असेल तर त्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आ. जितेंद्र आव्हाड यांना पक्षातून निलंबित केले पाहिजे, अशी मागणी भाजपार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी पुणे येथे केली. जितेंद्र आव्हाड यांच्या गुन्ह्याचे समर्थन करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी कारवाई …

Read More »

अजित पवार म्हणाले, लोकप्रतिनिधीवर विनयभंगाचे कलम लावणे हा भ्याड प्रकार

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर भाजपाच्या महिला कार्यकर्त्यीकडून पोलिसांमध्ये विनयभंगाची तक्रार दाखल केली. तसेच सदर घटनेचा व्हिडिओही ट्विटरच्या माध्यमातून शेअर केला. या साऱ्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले की,  लोकप्रतिनिधीवर विनयभंगाचे कलम लावणे हा अतिशय भ्याड प्रकार असून सरकारने हा गुन्हा मागे घ्यावा अशी …

Read More »

आव्हाडांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हाः रिदा रशीद यांनी व्हिडिओ केले व्हायरल

ठाणे-कळवा दरम्यान असलेल्या तिसऱ्या पुलाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत काल पार पडले. त्यानंतर रात्री कार्यक्रम पार पडल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांचा ताफा कार्यक्रमासाठी आलेल्या नागरिकांची निघताना एकच गर्दी झाली. या गर्दीत जितेंद्र आव्हाड यांनी आपला विनयभंग केल्याची तक्रार पोलीस ठाण्यात केल्याने एकच खळबळ उडाली. …

Read More »

ठाणे-कळवा खाडी पूलावरून मुख्यमंत्री शिंदे आणि आव्हाड यांच्यात श्रेयवादाची लढाई

ठाणे आणि कळवा या दोन्ही शहरांना जोडणाऱ्या तिसऱ्या खाडी पुलाचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होत आहे. मात्र या पुलावरून ठाण्याच्या राजकिय वर्तुळात सध्या दावे-प्रतिदावे चांगलेच रंगल्याचे पाह्यला मिळाले. विशेष म्हणजे हे दावे-प्रतिदावे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यात रंगल्याचे पाह्यला मिळाले. या पुलाच्या निमित्ताने जितेंद्र आव्हाड …

Read More »

जितेंद्र आव्हाडांचा आरोप, माझ्या प्रकरणात तो नियमच पाळला गेला नाही…

हर हर महादेव मराठी चित्रपटात शिवरायांचा चुकीचा इतिहास दाखविल्याच्या निषेधार्थ ठाण्यातील व्हिव्हिएना मॉलमधील या चित्रपटाचा शो बंद पाडला. त्यानंतर एका प्रेक्षकाला मारहाण झाल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. याप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना पोलिसांनी अटक करण्यात आली. मात्र आज त्यांना जामीन मिळाला. सुटका झाल्यानंतर आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेत यासंपूर्ण …

Read More »

भाजपा म्हणते, शिंदे-फडणवीसांच्या राज्यात दादागिरी सहन करणार नाही

एखाद्या चित्रपटातील काही दृश्यांबाबत आक्षेप असेल तर त्याच्या विरोधात तक्रार करता येईल किंवा शांततामय पद्धतीने विरोधही करता येईल. पण चित्रपटगृहात जाऊन मारहाण करण्याची दादागिरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राज्यात कोणीही सहन करणार नाही, असा इशारा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी दिला. बावनकुळे कोल्हापूर जिल्ह्याच्या संघटनात्मक प्रवासात …

Read More »

जितेंद्र आव्हाडांना आधी १४ दिवसांची कोठडी आणि जामीन

साधारण मागील आठवड्यात हर हर महादेव या मराठी चित्रपटात शिवकालीन इतिहासात मोडतोड केल्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह ठाण्यातील व्हिव्हिएना मॉलमध्ये जात या चित्रपटाचा शो बंद पाडला. तसेच तेथील एका प्रेक्षकाला मारहाणीचा एक व्हिडिओही प्रसारीत झाला. त्यानंतर आव्हाड यांच्यासह काही कार्यकर्त्यांना काल संध्याकाळी ठाणे पोलिसांनी अटक केली. …

Read More »