Breaking News

Tag Archives: governor bhagat singh koshyari

Budget Session: भाजपाच्या घोषणा, राज्यपालांचे २ मि.भाषण आणि राष्ट्रगीताचा अवमान घोषणाबाजीमुळे राज्यपालांनी २ मिनिटात घेतले भाषण आटोपते

राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पिय अधिवेशनाची सुरुवात सांसदीय प्रथेप्रमाणे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या भाषणाने होत असते. त्यानुसार राज्यपाला कोश्यारी यांनी विधिमंडळाच्या संयुक्त सभागृहात अभिभाषणासाठी आले. मात्र भाषण सुरु केल्यानंतर भाजपाचे आमदारांनी सरकार विरोधी घोषणा द्यायला सुरुवात केल्याने राज्यपालांनी आपले भाषण दोनच मिनिटात आटोपते घेतले आणि राष्ट्रगीताची वाट न पाहताच थेट निघून गेले. …

Read More »

उदयनराजें म्हणाले की, राज्यपालांच्या त्या वक्तव्याने… राज्यपाल कोश्यारी यांच्या वक्तव्यावर उदयनराजेंची प्रतिक्रिया

औरंगाबादेत काल आयोजित कार्यक्रमात बोलताना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी रामदास स्वामींशिवाय शिवाजीला कोण विचारेल? असे खळबळजनक वक्तव्य केल्याने राज्यात नव्याने वादंग निर्माण झाले. यापार्श्वभूमीवर विविधस्तरातून राज्यपालांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ प्रतिक्रिया उमटत असताना छत्रपती शिवाजी महाराज यांचे थेट १६ वे वंशज छत्रपती उदयन राजे भोसले यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली असून छत्रपती शिवाजी …

Read More »

राज्यपाल कोश्यारी म्हणाले, समर्थाशिवाय शिवाजीला कोण विचारेल ? औरंगाबादेतील समर्थ साहित्य परिषदेच्या कार्यक्रमात केले वक्तव्य

मागील अनेक वर्षांपासून छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरू कोण होते यावरून महाराष्ट्रात वाद निर्माण झाला होता. तसेच त्यावेळी शिवाजी महाराज यांचे गुरू समर्थ रामदास स्वामी किंवा दादाजो कोंडदेव नव्हते तर तर दस्तुरखुद्द राजमाता जीजाऊ याच होत्या यावर शिक्कामोर्तब झाले. त्यानंतर महाराष्ट्रात समर्थ रामदास स्वामी हे शिवाजी महाराज यांचे गुरु होते …

Read More »

अर्थसंकल्पीय अधिवेशनात होणार विधानसभा अध्यक्षपदासाठी निवडणूक राज्यपालांनी राजकारण करु नये, संविधानिक पदाचा मान राखावाः नाना पटोले

मराठी ई-बातम्या टीम विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक नियमाला धरून घेण्याचा कार्यक्रम महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचा होता. नियम बदल करणे हा विधिमंडळाचा अधिकारच आहे, त्यात घटनाबाह्य असे काहीच नाही. राज्यपालांनी संविधानिक पदाचा मान राखावा, राजकारण करु नये, असा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना दिला. गांधी भवन येथे …

Read More »

आणि चक्क राज्यपाल कोश्यारींनी स्विकारला मुख्यमंत्र्यांचा पहिला सल्ला निवृत्त न्यायमूर्ती व्ही.एम. कानडे राज्याचे नवे लोकायुक्त

मुंबई: प्रतिनिधी सत्तेत स्थानापन्न होवून दिड वर्षे पूर्ण होत आले तरी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि महाविकास आघाडी सरकार यांच्यात अनेकविध विषयावरून संघर्ष सुरु असल्याचे चित्र राज्यातील जनतेला पाह्यला मिळत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि राज्यपालांमध्ये टोकाचे मतभेद निर्माण झाल्याचे दिसत असतानाच मुख्यमंत्र्यांनी शिफारस केलेल्या निवृत्त न्यायाधीशाच्या निवडीला राज्यपालांनी पसंती …

Read More »

अधिवेशनासह या प्रश्नी भाजपाचे शिष्टमंडळ राज्यपालांच्या भेटीला अध्यक्षांची निवडणूक टाळून संवैधानिक व्यवस्था कोलमडली, राष्ट्रपतींना अहवाल पाठवा

मुंबई: प्रतिनिधी राज्यापुढे अनेक महत्त्वाचे प्रश्न असताना केवळ दोन दिवसांचे पावसाळी अधिवेशन घेण्याच्या निर्णयाचा विरोध करण्यासाठी आज भाजपाच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. राज्यपालांनी निर्देश देऊन सुद्धा विधानसभा अध्यक्षांची निवडणूक घेतली जात नाही. त्यामुळे राज्यातील संवैधानिक व्यवस्था कोलमडली असल्याचा अहवाल राष्ट्रपतींना पाठविण्यात यावा, ओबीसी आरक्षण पूर्ववत होईस्तोवर स्थानिक …

Read More »

राज्यपाल म्हणाले, संकटावर मात करत राज्याच्या प्रगतीसाठी आघाडी सरकारचे कार्य नवीन, बलशाली महाराष्ट्र घडविण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन

मुंबई : प्रतिनिधी गेल्या सुमारे सव्वा वर्षाहून अधिक काळ आपण कोविड संसर्गाविरोधात एकजूटीने लढत आहोत. महाराष्ट्र शासनाने या साथीला आटोक्यात आणण्यासाठी विविध उपाय योजले आहेत. कोविड-१९ च्या संकटावर मात करीत असताना राज्याची अर्थव्यवस्था सांभाळत वंचित-उपेक्षित, शेतकरी, महिलांना न्याय देतानाच राज्याच्या प्रगतीचा आलेख उंचावला जाईल यासाठी महाराष्ट्र शासन कार्य करीत आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या …

Read More »