Breaking News

Tag Archives: ganeshostav

आढावा बैठकीत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांनी दिल्या या सूचना कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही याची दक्षता घेत साधेपणाने गणेशोत्सव साजरा करावा

मुंबई : प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येणारा गणेशोत्सव हा सामाजिक भान राखत शांततेने साजरा करावा. याकाळात गर्दी होणार नाही, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही याची दक्षता घ्यावी असे आवाहन करतानाच कोरोना युद्धाच्या मध्यावर आपण काही ठिकाणी शिखराकडे गेलो तर काही ठिकाणी जात आहोत, त्यामुळे गाफील न राहाता आतापर्यंत ज्या उपाययोजना सुरू आहेत …

Read More »

गणेशोत्सवासाठीची कोंकण रेल्वेची पहिली रेल्वे उद्या धावणार उद्यापासून बुकींग आणि गाडी धावणार

मुंबई : प्रतिनिधी गणेशोत्सव काळात मुंबईतील चाकरमान्यांना कोकणातील आपल्या गावी जाण्यासाठी रेल्वे सुरू करावी अशी मागणी सातत्याने करण्यात येत होती. त्यास अखेर यश आले असून १५ ऑगस्ट २०२० पासून कोकणात जावू इच्छिणाऱ्या चाकरमान्यांसाठी कोकण रेल्वे मार्गावर २०० गाड्या धावणार असल्याची माहिती कोकण आणि मध्य रेल्वेने एका प्रसिध्दी पत्रकान्वये आज जाहीर …

Read More »

चाकरमान्यांनो पोलिस स्टेशनला नाव नोंदवा गणेशोत्वासाठी टोल माफी मिळवा सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांना टोल माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गणेशोत्सव सुरू होण्याच्या दोन दिवस आधी आणि परतीच्या प्रवासात दोन दिवस टोल मधून सवलत मिळणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले. यासंदर्भात मंत्री शिंदे, गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी सार्वजनिक …

Read More »

गणेशोत्सव येतोय ! कोकणातील प्रमुख रस्त्यांची डागडुजी तातडीने करा आढावा बैठकीत अशोक चव्हाण यांचे निर्देश

मुंबई: प्रतिनिधी आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात अनेक चाकरमानी जातात. मात्र यंदा कोरोनामुळे कोकणात जाण्यासाठी रेल्वे सुरु करण्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. मात्र एसटी सुरु होण्याची शक्यता आहे. याशिवाय अनेक जण खाजगी बस आणि गाड्यांनी कोकणात जातात. कोकणाकडे जाणारे राष्ट्रीय महामार्ग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रमुख रस्त्यांचा आढावा घेऊन आवश्यकता असलेल्या …

Read More »

घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सवासाठीची नियमावली जाहीर घरात २ फुटाचा तर सार्वजनिक मंडळ‌ासाठी ४ फुटाची गणेश मुर्ती बंधनकारक

मुंबई: विशेष प्रतिनिधी काही दिवसांवर राज्यात गणेशोत्सव आलेला आहे. मात्र कोरोनाच्या वाढत्या प्रसाराचा संभावित धोका लक्षात घेवून राज्य सरकारने हा उत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला असून त्या दृष्टीने नियमावली जाहीर केली. ती खालीलप्रमाणे… १) महापालिकेच्या धोरणानुसार सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी रितसर परवानगी घेणे आवश्यक. २) उच्च न्यायालयाच्या निर्णयामप्रमाणे आणि …

Read More »

मुबईसह राज्यात गणेशोत्सव साजरा होणार मात्र मिरवणूका नाही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे आवाहन

मुंबई: प्रतिनिधी हे खरे आहे की नेहमीप्रमाणे यंदा गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा करता येणार नाही. कोरोनाचा धोका संपलेला नाही. गर्दी करता येणार नाही, मिरवणूका काढता येणार नाहीत. कोरोना पार्श्वभूमीवर सर्व प्रकारची दक्षता, योग्य निर्णय घेऊनच अतिशय साधेपणाने हा उत्सव साजरा करावा लागेल असल्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सांगत साधेपणाची चौकट …

Read More »

पुण्यातील मंडळांनी घेतलेल्या या निर्णयाचे मुंबईसह महाराष्ट्राने अनुकरण करावे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिनंदन आणि आवाहन

मुंबई : प्रतिनिधी पुण्याचं सांस्कृतिक वैभव असलेला सार्वजनिक गणेशोत्सव यंदा साधेपणानं साजरा करण्याचा निर्णय पुण्यातील मानाच्या पाच आणि काही प्रमुख गणेशोत्सव मंडळांनी घेतल्याबद्दल उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी संबंधित गणेशोत्सव मंडळांच्या प्रतिनिधी, सदस्यांचं अभिनंदन केलं असून जाहीर आभारही मानले. राज्यावरील कोरोनाचं संकट पाहता पुणे, मुंबईसह राज्यातील सर्वच …

Read More »

पर्यावरणाच्या रक्षणासाठी यंदा टिश्यु पेपर गणरायाची निर्मिती शाडू आणि पीओपीच्या गणरायाच्या मुर्तीपेक्षा स्वस्त दरात उपलब्ध

मुंबई : प्रतिनिधी ग्लोबल वार्मिंग आणि समुद्र, नदी-नाल्यांमधील वाढत्या प्रदुषणाला आळा घालण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. मात्र या पर्यांवरणाच्या रक्षणासाठी विर्ले-पार्ले येथील संकेश रेणूके यांनी आपला खारीचा वाटा उचलण्यासाठी माफक दरात टिश्यू पेपरपासून गणरायाची निर्मिती करून त्यास हातभार लावण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. विर्ले-पार्ले येथील …

Read More »