Breaking News

Tag Archives: ganeshostav

कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना ‘या’ विभागाकडे मिळणार टोल माफीचे पासेस पासेस, स्टिकर्स पोलीस, परिवहन विभागाकडे उपलब्ध

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना पथकर (टोल) माफी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला असून त्याची अंमलबजावणी शनिवार दि. २७ ऑगस्टपासून करण्यात येत आहे. मुंबई – बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग यावरील आणि इतर सार्वजनिक बांधकाम विभागांच्या रस्त्यांवरील पथकर नाक्यांवर ही सवलत ११ सप्टेंबरपर्यंत असणार आहे. गेल्या महिन्यात मुख्यमंत्री …

Read More »

गणेशोत्सवासाठी रेल्वेच्या कोकणात ७४ गाड्या, आरक्षण ‘या’ तारखेपासून रेल्वे विभागाने जारी केली माहिती

जून महिना संपूर्ण पावसाविना गेला. तर ऐन उन्हाळ्यात पावसाने हजेरी लावल्याने आंबा बागायतदारांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. मात्र मागील दोन दिवसांपासून कोकणसह राज्यातील काही भागात पाऊसाने चांगली हजेरी लावलेली दिसत आहे. तशातच पुढील महिन्यात शेवटच्या आठवड्यात गणरायाचे आगमन होत असल्याने मुंबईतून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची अडचण होवू नये म्हणून मध्य रेल्वेकडून …

Read More »

गणेशोत्सव काळात मंडपात जावून दर्शनास बंदी सार्वजनिक गणेशोत्सव २०२१ निमित्त मार्गदर्शक सूचना जारी

मुंबई : प्रतिनिधी कोविड-19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता यावर्षीचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच नावाजलेल्या मंडळाच्या मंडपात प्रत्यक्ष जावून दर्शन घेण्यास राज्य सरकारने सर्वच नागरीकांवर बंदी घातली असून मंडळांना त्यांच्या मंडपातील गणरायाचे लाईव्ह प्रक्षेपण करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे यंदा नामांकित, नवसाच्या गणरायाचे …

Read More »

कोंकणवासियांना खुषखबरः वाहनांना टोलमाफी सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

मुंबई : प्रतिनिधी गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची गैरसोय होऊ नये यासाठी सर्व आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली असून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या वाहनांना पथकरातून सवलत देण्यात येत असल्याची घोषणा सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. या पथकर सवलतीसाठी गणेशभक्तांच्या वाहनांना स्टीकर्स तातडीने उपलब्ध करुन देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या …

Read More »

नवे निर्बंध नाहीत, मात्र नागरिकांनी गर्दी केली तर…. पहिल्या दिवसाचा अंदाज घेऊन दुसऱ्याच दिवशी कठोर निर्णय -उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे : प्रतिनिधी पुणे, पिंपरी चिंचवड महानगरासह जिल्ह्यात लसीकरण वाढीवर शासनाचा भर असून प्रत्येक महिन्याला लसीकरण वाढविण्यात येत असल्याचे सांगतानाच कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या व पॉझिटिव्हिटी रेट कमी असला तरी गाफील राहून चालणार नाही. आरोग्य यंत्रणा सुसज्ज करण्याबरोबरच दक्षता नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी दिले. गणेशोत्सव साधेपणाने साजरा …

Read More »

पूर परिस्थितीतील मदत आणि गणेशोत्सवासाठी अजून ४० रेल्वे गाड्या रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे याची माहिती

मुंबई: प्रतिनिधी कोकणातील पूर परिस्थितीतून मार्ग काढून रेल्वे लवकरात लवकर सुरु कशी करता येईल जेणेकरून मदत कार्याला वेग येईल.. याबाबत तातडीने आढावा घेऊन रेल्वे अधिकाऱ्यांना सूचना करतानाच गणेशोत्सवासाठी अजून ४० गाड्यांचे नियोजन करण्याच्या सूचना रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांनी आज केली. भाजपा नेते आमदार अॅड आशिष शेलार यांच्यासह खासदार …

Read More »

कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी विशेष गाड्या सोडा भाजपा नेते आमदार अॅड आशिष शेलार यांची रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना विनंती

मुंबई: प्रतिनिधी कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांना सोडण्यात आलेल्या ७२ विशेष रेल्वे गाड्या फुल झाल्या असून रेल्वेने अजून अधिकच्या गाड्या सोडाव्यात अशी मागणी भाजपा नेते आमदार अॅड आशिष शेलार यांनी पुणे दौऱ्यात रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेऊन केली. कोकणात गणेशोत्सवाठी मुंबई, ठाणे, नवी मुंबई, वसई, विरार या भागातून मोठ्या …

Read More »

पब, डिस्को, बारना सवलतींचा प्रसाद आणि गणपती उत्सव बंदिवासात ! भाजपा नेते आमदार अॅड आशिष शेलार यांची टीका

मुंबई: प्रतिनिधी पब, डिस्को, बारना सवलतींचा प्रसाद आणि गणपती उत्सव बंदिवासात अशी स्थिती राज्यात निर्माण झाल्याची टीका भाजपा नेते विधानसभा मुख्य प्रतोद आमदार अॅड. आशिष शेलार यांनी आज येथे केली. गणेशोत्सवाबाबत राज्य शासनाने नियमावली जाहीर केली ती जाचक असल्याकडे लक्ष वेधीत आमदार अॅड. आशिष शेलार यांनी या नियमावलीचा खरपूस समाचार …

Read More »

राज्यात गणेशोत्सवाचेच नियम नवरात्र उत्सवाला का? भाजपा नेते आशिष शेलार यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई: प्रतिनिधी गणेशोत्सवापूर्वी मुर्तीकारांना शासन निर्णयाची माहिती दिली गेली नाही. त्यामुळे त्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले. आता नवरात्रोत्सवाची तयारी झाली असल्याने देवीच्या मुर्ती तयार होण्यापूर्वी शासन निर्णय जाहीर केल्यास त्यांचे संभावित आर्थिक नुकसा होणार नाही. त्यामुळे नवरात्र उत्सवालाही गणेशोत्सवाचे नियम लागू आहेत का? असा सवाल करत यासंदर्भात बैठक घेवून …

Read More »

गृहमंत्र्यांनी करून दिली गणेशोत्सव आणि मोहरमसाठीच्या नियमावलींची आठवण : वाचा नियम उद्यापासून गणेशोत्सवाला सुरुवात

मुंबई : प्रतिनिधी कोविड-१९ मुळे उद्धवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता या वर्षी गणेशोत्सव तसेच मोहरम साध्या पदध्तीने  करावेत, असे आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले. २२ ऑगस्टपासून राज्यात गणेशोत्सव हा महत्त्वाचा सण सुरु होत आहे. गणेशोत्सवासाठी गृहविभागाने मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत.  १)सार्वजनिक गणेशोत्सवासाठी सर्व संबंधित सार्वजनिक गणेश मंडळांनी महापालिका/स्थानिक प्रशासनाची …

Read More »