Breaking News

Tag Archives: devendra fadnavis

भगतसिंग कोश्यारी म्हणाले, जो गलत था गलत हो गया, न्यायालयाने बोलणे के बाद… न्यायालयाच्या निकालानंतर कोणी बोलू शकत नाही

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावरून सध्या राज्याच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर न्यायालयाने मोठा निकाल दिला असून यात राज्यपालांनी घेतलेल्या निर्णयांवर ताशेरे ओढले. राज्यपालांनी घेतलेले निर्णय कायद्याला धरून नव्हते, असं स्पष्ट मत न्यायालयाने आपल्या निकालात नोंदवले. यासंदर्भात आता विरोधी पक्षांनी टीका करायला सुरुवात केली असतानाच दस्तुरखुद्द माजी राज्यपाल …

Read More »

निकालानंतर मुख्यमंत्री शिंदे यांचे प्रत्युत्तर, प्रतारणा करणाऱ्या संधीसाधू नेत्यांना चपराक घटनाबाह्य सरकार म्हणणारेच कालबाह्य

महाराष्ट्रात सत्तांतर घडत असताना घडलेल्या विविध घटनांवर न्यायालयाने भाष्य केलं आहे. यावेळी न्यायालयाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे सर्व निर्णय बेकायदेशीर आणि चुकीचे होते, असं निरीक्षण न्यायालयाने नोंदवलं. त्याचबरोबर शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांची नियुक्ती बेकायदेशीर असल्याचंही न्यायालयाने सांगितलं. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला नसता तर आजची राजकीय स्थिती …

Read More »

देवेंद्र फडणवीस यांचा सवाल, तेव्हा नैतिकता कुठल्या डब्यात बंद करुन ठेवली होती? विनाकारण नैतिकतेचा मुलामा चढवण्याचा प्रयत्न करा नका

महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. या निकालात अनेक ताशेरे शिंदे गटावर ओढण्यात आले आहेत. मात्र उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्याने आम्ही जैसे थे परिस्थिती करत सुई मागे आणू शकत नाही असंही कोर्टाने म्हटलं आहे. एवढंच नाही तर आमदारांना अपात्र ठरवायचं का नाही? याचे पूर्ण अधिकार हे विधानसभा अध्यक्षांना दिले …

Read More »

नाना पटोले यांची टीका, भाजपा… सत्तेसाठी कोणत्याही थराला जाते हे पुन्हा सिद्ध शिंदे-भाजपा सरकार असंवैधानिक, बेकायदेशीर असल्याचे सर्वोच्च न्यायालयाकडून शिक्कामार्तब

महाविकास आघाडी सरकार पाडण्यात राज्यपालांची प्रत्येक कृती चुकीची होती यावर सर्वोच्च न्यायालयाने गंभीर ताशेरे ओढले आहेत. राजभवनचा गैरवापर करुन भाजपाने महाराष्ट्रातील मविआचे सरकार पाडले हे आम्ही सातत्याने सांगत होतो तेच सर्वोच्च न्यायालयानेही म्हटले आहे. शिंदे-भाजपा सरकार हे असंवैधानिक व बेकायदेशीर आहे हे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले ही त्यांच्यासाठी मोठी चपराक …

Read More »

जयंत पाटील न्यायालयाच्या निर्णयावर म्हणाले, शिवसेनेच्या सदस्यांनी जी कृती केली ती अवैध ठरणार शिंदे सरकार जरी वाचले तरी सत्तेत राहण्याचा नैतिक अधिकार नाही

शिंदेसरकार जरी वाचले तरी त्यांना सत्तेत राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्यातील सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर माध्यमांसमोर बोलताना व्यक्त केले. जयंत पाटील म्हणाले, राज्यपालांनी घेतलेले सर्व निर्णय कसे चुकीचे आहेत हे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले. भरत गोगावले यांचा व्हीप अमान्य केला …

Read More »

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे का राजीनामा देतील? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मांडली भूमिका सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर सविस्तर भूमिका मांडली

सर्वोच्च न्यायालय उद्या महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावरील निकाल देणार असल्याचे स्पष्ट संकेत सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डी.वाय.चंद्रचूड यांनी दिले. त्यानंतर न्यायालय काय निर्णय देणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. त्यातच विविध पक्षांकडून आणि कायदेतज्ञांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अपात्र ठरतील आणि आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देतील असे भाकित वर्तविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर …

Read More »

नितीन गडकरी यांची राज्य सरकारला सूचना, जून्या वाहनांसाठी स्क्रॅप युनिट सुरु करा राज्यातील राष्ट्रीय महामार्ग, उड्डाणपूल, रस्त्यांच्या कामातील अडथळे दूर करून प्रकल्प कालबद्धरित्या पूर्ण करा-मुख्यमंत्री

राज्यात सुरू असलेल्या आणि मान्यता मिळालेल्या राष्ट्रीय महामार्ग, उड्डाणपूल, रस्ते यांच्या कामातील अडथळे दूर करून कालबद्धरित्या हे प्रकल्प पूर्ण करावेत. वनांच्या हद्दीतील अस्तित्वात असलेल्या रस्त्यांच्या दुरुस्ती कामांसाठी वन विभागाने प्राधान्याने कार्यवाही करून ते प्रकल्प मार्गी लावावेत, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. राज्यातील विविध रस्ते प्रकल्प आणि …

Read More »

फडणवीसांच्या टीकेला जयंत पाटील यांचे प्रत्युत्तर, त्यांचा भाजपाने फौजदाराचा हवालदार केला…. अन् आमची माप काढवीत का?

कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी १० मे रोजी मतदान होणार आहे. निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. या निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील नेतेही कर्नाटकात प्रचार करत आहेत. रविवारी ७ मे रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निपाणीतील एका प्रचार सभेत राष्ट्रवादी काँग्रेसला लक्ष्य करताना म्हणाले, राष्ट्रवादी हा महाराष्ट्रातील साडेतीन जिल्ह्यांचा पक्ष आहे. कर्नाटकात काय करणार, …

Read More »

उध्दव ठाकरे यांचा मोदींवर निशाणा, बजरंग बली की जय, मग कुठे गेली तुमची ५६ इंच छाती? काही जणांना माझ्यावर टीका केल्याशिवाय भाकरच मिळत नाही

बारसू रिफायनरी प्रकल्पाला विरोध करणाऱ्या स्थानिकांशी भेटण्यासाठी ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे हे आज बारसू येथील आंदोलनकर्त्यांशी भेट घेऊन त्यांच्या पाठीशी शिवसेना असल्याचे सांगितले. त्यानंतर महाड नगरपालिकेच्या नगराध्यक्षा स्नेहल जगताप यांच्या ठाकरे गटात प्रवेश केला. त्यावेळी झालेल्या जाहिर सभेत बोलताना ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी …

Read More »

उध्दव ठाकरे यांचा शिंदे-फडणवीसांना इशारा,…तर महाराष्ट्र पेटवू आपल्याच जनतेचे नुकसान पोहोचवून सरकार विकास करणार असेल तर असा विकास नको

बारसूतील प्रस्तावित रिफायनरीवरून मोठा वाद सुरू आहे. या प्रकल्पाला स्थानिकांनी कडाडून विरोध केला आहे. याविरोधात स्थानिक ग्रामस्थ आंदोलनही करत आहेत. तर पोलिसांकडून या आंदोलकांविरोधात बळाचा वापर झाल्याचं निदर्शनास आलं आहे. दरम्यान, आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजापूरमध्ये जात येथील नागरिकांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीकास्र …

Read More »