Breaking News

Tag Archives: deepak kesarkar

शिंदे गटातील मंत्र्यांवर मुख्यमंत्री शिंदेंची माणसे ठेवणार लक्ष्य भाजपाच्या पध्दतीने शिंदेंचे पाऊल

राज्यात स्थानापन्न झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्र्यांना खात्याचे वाटप करण्यात आले. मात्र खाते वाटपानंतर आधीच्या तुलनेच चांगली खाती मिळाली नसल्यावरून शिंदे गटातील मंत्र्यांमध्ये नाराजीच्या चर्चा बाहेर आल्यानंतर या मंत्रिमंडळात पहिल्यांदाच मंत्री झालेल्यांकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या ताफ्यातील माणसे त्यांच्या दिमतीला देत आपल्याच मंत्र्यांवर अप्रत्यक्ष लक्ष ठेवणार असल्याची धक्कादायक माहिती पुढे …

Read More »

विधान परिषदेत खडाजंगी: नीलम गोऱ्हे म्हणाल्या, तुम्ही मंत्री तुमच्या घरी हे सभागृह आहे.. उपसभापती नीलम गोर्‍हे यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांना झापले !

विधान परिषदेत सभागृहात आज दुसऱ्या दिवशी एका तारांकित प्रश्‍नावर शिक्षणमंत्री दीपक केसरकर उत्तर देत असतांना विरोधकांचे समाधान झाले नाही. या प्रश्‍नावरून विरोधकांनी सभागृहात गोंधळ घालण्यास सुरुवात केली. या वेळी पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील हे खाली बसून बोलू लागले. त्यावर विरोधकांनी तीव्र आक्षेप घेतला. ‘मंत्री गुलाबराव पाटील हे दादागिरी …

Read More »

मुख्यमंत्री शिंदेंनी नाराज मंत्र्यांना केले खुष; स्वत:कडील खात्यांची जबाबदारी “या” मंत्र्यांकडे संदीपान भुमरे, दादा भुसे, शंभुराज देसाई, दिपक केसरकर यांच्यासह आठ जणांकडे सोपविली जबाबदारी

मंत्रिमंडळ विस्तारानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खाते वाटप जाहिर केले. परंतु शिंदे गटातील अनेक मंत्र्यांना मिळालेल्या खात्यांचे वाटप रूचलेले नसल्याने अनेक मंत्री नाराज असल्याची चर्चा शिंदे गटातील मंत्र्यांमध्ये सुरु झाली. त्यातच बुधवारपासून राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु होत असल्याच्या यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्याकडील अतिरिक्त असलेल्या खात्यांचा कारभार नाराज …

Read More »

दिपक केसरकर म्हणाले, चित्रा वाघ म्हणत असतील तर आणखी चौकशी होईल मंत्री संजय राठोड यांच्या मागणीवरून केला खुलासा

राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. या विस्तारात १८ जणांचा समावेश करण्यात आला. परंतु या १८ मध्ये पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात संशयाच्या भोवऱ्यात अडकलेल्या संजय राठोड यांचा समावेश करण्यात आल्याने भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी टीका केली. या टीकेवरून आता शिंदे गटाचे मंत्री …

Read More »

केसरकरांच्या टीकेला प्रत्युत्तर देतना नितेश राणे म्हणाले, हिंदूत्वासाठी सगळं.. प्रतीक पवार हल्ल्याची चौकशी 'एनआयए'कडे सोपवा-भाजपा आ. नितेश राणे यांची मागणी

नुकतेच एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते दिपक केसरकर यांनी सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणावरून भाजपाचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जाणीवपूर्वक शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला. त्यानंतर आमदार नितेश राणे यांनी आज भाजपाच्या प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत काय उत्तर देणार याकडे लक्ष लागून राहिले …

Read More »

दिपक केसरकर म्हणाले, नारायण राणेंनी आदित्य ठाकरे यांची बदनामी केली सुशांत सिंग राजपूत प्रकरणावरून साधला निशाणा

शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे समर्थक असे उघड दोन गट पडले. मात्र सुरुवातीला बंडखोरीनंतर ४० आमदारांनी ठाकरे कुटुंबिय आणि मातोश्रीवर भाष्य करायचे नाही असा निर्णय घेतला. मात्र मध्यंतरीच्या काळात दिपक केसरकर यांच्यासह अनेक बंडखोर आमदारांनी उध्दव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावरही टीका करण्यास सुरुवात केली. मात्र …

Read More »

राज्य मंत्रिमंडळ विस्ताराबाबत सुधीर मुनगंटीवारांनी दिली नवी ताऱीख, वाचा कोण होणार मंत्री १५ ऑगस्टच्या अगोदर मंत्र्यांचा शपथविधी

राज्यात सत्तांतर झाल्यापासून बंडखोर गटाचे प्रवक्ते दिपक केसरकर यांच्याकडून मंत्रिमंडळ विस्ताराच्या अनुषंगाने नेहमी तारखा जाहीर करण्यात येतात. त्यानुसार आजही केरसकर यांनी शनिवारी किंवा रविवारी राज्य मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचे जाहिर केले. मात्र भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मंत्रिमंडळ विस्ताराची नवी तारीख दिली असून १५ ऑगस्टच्या पूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचे …

Read More »

दिपक केसरकर यांचे प्रत्युत्तर, तुमच्यासाठी काहीतरी केले, तेही सांगा; अन्यथा मी जाहीर करेन शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांचा उद्धव ठाकरे याना इशारा

तुम्ही माझ्या नातवाच्या अॅडमिशनसाठी प्रयत्न केलेत, पण त्याही पेक्षा जास्त मी तुमच्याकरीता काही तरी केलेले आहे. माझ्याही हातून मोठ मोठी कामे झाली आहेत. ते ही लोकांना सांगा. अन्यथा येत्या दोन दिवसात मी प्रसार माध्यमांसमोर मी जे जे काही तुमच्यासाठी केले ते सगळे जाहीर करेन असा सज्जड इशारा शिंदे गटाचे प्रवक्ते …

Read More »

शिंदे गटाचे प्रवक्ते दिपक केसरकरांकडून पुन्हा उध्दव ठाकरे लक्ष्य, याप्रश्नांची उत्तरे द्या कोणाच्या घरावर मोर्चे काढण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला?

शिवसेनेने पहिल्यांदा तिकीट देत धैर्यशील माने यांना निवडूण आणले. मात्र त्यांनी बंडखोर एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केल्याने हातकणगंले येथील शिवसैनिकांनी खासदार धैयर्शील माने यांच्या घरावर मोर्चा काढत आपला संताप व्यक्त केला. या मोर्चाचा धागा पकडत शिंदे गटाचे प्रवक्ते दिपक केसरकर म्हणाले की, खासदारांच्या घरावर मोर्चा काढायचा अधिकार तुम्हाला कोणी …

Read More »

बंडखोरांनाच पडला “ठाकरे कुटुंबावर बोलायचे नाही आणि बोलू द्यायचे नाही” वाक्याचा विसर बंडखोरांकडून आदित्य ठाकरेंना लक्ष्य करण्यास सुरुवात

शिवसेनेतील बंडाळीनंतर सध्या राज्याच्या शिवसंवाद दौऱ्यावर निघालेल्या शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी बंडखोरांवर गद्दार आणि पाठीत खंजीर खुपसला आदी आरोप आणि टीका करण्यास सुरुवात केली. त्यावर मागील काही दिवसांपासून मातोश्री आणि ठाकरे कुटुंबियांवर बोलायचे नाही अशी भूमिका घेणारे बंडखोर नेत्यांनी आता आदित्य ठाकरे यांना प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. तसेच …

Read More »