Breaking News

Tag Archives: covid-19

केंद्राकडूनही ३१ जुलैपर्यंत या नव्या सवलतींसह अनलॉक-२ जाहीर जून्या सवलतींसह नव्या सवलतींचा समावेश

नवी दिल्ली-मुंबई: प्रतिनिधी राज्य सरकारपाठोपाठ केंद्रानेही ३१ जुलै पर्यंत अनलॉक-२ जाहीर केला आहे. या काळात खालीलप्रमाणे सवलती देण्यात आलेल्या आहेत. कंटेनमेंटच्या बाहेर- १) शाळा, कॉलेज, कोचिंग, शैक्षणिक संस्था ३१ जुलै पर्यंत बंद राहणार. पण ऑनलाईन-डिस्टन्स पध्दतीने शिक्षणाची प्रक्रिया सुरु राहणार. पण १५ जुलै २०२० पासून प्रशिक्षण संस्था सुरू करण्यास राज्य …

Read More »

वीज ग्राहकांना दिलासा: तक्रारी एका दिवसात निकाली काढण्याचे आदेश महाराष्ट्र विद्युत नियामकआयोगाने घेतली दखल

मुंबई : प्रतिनिधी वीज ग्राहकांना जास्त रकमेची देयके मिळत असल्याच्या तक्रारींची गंभीर दखल घेत देयक आकारणीत अधिक पारदर्शकता आणावी आणि ग्राहकांच्या तक्रारींचे ताबडतोब निराकरण करण्यासाठी संनियंत्रण यंत्रणा उभारावी असे निर्देश महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने वीज कंपन्यांना दिले आहे. महाराष्ट्रातील विद्युत क्षेत्राचे नियमन करण्यासाठी विद्युत अधिनियम, २००३ अंतर्गत स्थापन करण्यात आलेला …

Read More »

कोरोना: उपनगर, पुणे आणि औरंगाबादेत वाढ कायम, मात्र २२८५ जणांना घरी सोडले १८१ जणांचा मृत्यू तर ५२५७ नवे रूग्ण

मुंबई: प्रतिनिधी मुंबई शहरात कोरोनाग्रस्तांची संख्या कालच्याप्रमाणे आजही १२०० मध्ये नियंत्रणात आहे. मात्र उपनगरातील ठाणे शहर व जिल्ह्यात ५८०, नवी मुंबईत २३४, कल्याण डोंबिवलीत ५१३, उल्हासनगर १३७, भिवंडी-निझामपूर १३१, मीरा भांईदर १५०, वसई विरार २८७, रायगड १५३, पनवेल १५८ इतके रूग्ण आढळून आले आहेत. ही संख्या कालच्या तुलनेत नक्कीच जास्त …

Read More »

प्लाझ्मा थेरपीचा शोध कोणी आणि कधी लावला माहित आहे का? १९ व्या शतकात लावला पण कशासाठी

कोरोनावर मात करण्यासाठी आणि बाधितांचे प्राण वाचविण्यासाठी महाराष्ट्रात २३ ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालये, पालिका रुग्णालये याठिकाणी थेरपीचा वापर करण्यास केंद्र सरकारने मान्यता दिली. यापैकी १७ ठिकाणी ही उपचार पद्धती कोविड रुग्णांसाठी सुरु होत आहे. ही मोठी उपलब्धता असून आपण मध्यम आणि गंभीर रुग्णांवर जिथे केअर नसलेल्या ठिकाणी प्लाझ्मा मशीन मागवत आहोत. …

Read More »

जगातली सगळ्यात मोठी प्लाझ्मा थेरपीची ट्रायल महाराष्ट्रात व्यापक प्रमाणात प्रयोग करणारे देशातील पहिले राज्य

मुंबई : प्रतिनिधी प्लाझ्मा देणारे जीवनदाते आहेत. गंभीर रुग्णांना बरे करण्यासाठी प्लाझ्मा थेरपीचा उपयोग प्रथमच होत आहे. आपल्याला अभिमान आहे की जगातली ही सर्वात मोठी सुविधा आपण आपल्या राज्यात सुरु करतो आहोत. आपण परंपरेनुसार एक पाउल पुढे टाकले आहे. एप्रिलमध्ये आपण प्लाझ्मा थेरपीचा पहिला प्रयोग केला होता. नंतर आपण केंद्राकडे …

Read More »

कोरोना: मुंबईत संख्या नियंत्रित तर ठाणे, पुणे आणि औरंगाबादेत वाढ २३३० जणांना घरी सोडले तर राज्यात ५४९३ रूग्ण नव्याने, १५६ जणांचा मृत्यू

मुंबई: प्रतिनिधी राज्यात यापूर्वी सर्वाधिक संख्या मुंबई आणि महानगरात रहात होती. पंरतु मुंबई शहरातील कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात यश येत असून २ ते अडीच हजाराच्या संख्येने कोरोनाबाधित होणाऱ्यांची संख्या आता १२८७ वर आली आहे. त्यानंतर ठाणे विभागातील कल्याण-डोंबिवली, ठाणे शहर, मीरा भांईदर, वसई विरार मध्ये बाधितांची संख्या वाढत आहे. याशिवाय पुणे …

Read More »

सरकारी सेवानिवृत्तीला १ किंवा वयाच्या ६० वर्षापर्यंत मुदत वाढ शासन निर्णय लवकरच निघणार

मुंबई: विशेष प्रतिनिधी राज्यातील कोरोनाची परिस्थिती कधी अटोक्यात येईल याचा अंदाज अद्याप तरी राज्य सरकारला येत नाही. त्यामुळे आगामी काळात संभावित कर्मचाऱ्यांचा तुटवडा जाणवू नये यासाठी यावर्षी किंवा पुढील वर्षी सेवानिवृत्त होत असलेल्यांना १ वर्षाची मुदतवाढ किंवा वयाच्या ६० व्या सेवानिवृत्ती देण्याविषयी राज्य सरकार गंभीरपणे विचार करत असून यासंदर्भात लवकरच …

Read More »

मुंबई ३ ते ४ शिफ्टमध्ये सुरु होणार ? राज्य सरकारकडून चाचपणी

मुंबई: प्रतिनिधी मुंबईसह महानगरात जरी कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असली तरी राज्याची आणि देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला जास्त कालावधीसाठी बंद ठेवता येणार नाही. त्यामुळे मुंबई शहरातील सरकारी, खाजगी कार्यालये आणि उद्योग तीन ते चार शिफ्टमध्ये सुरु करण्याचा विचार करण्यात येत असल्याची माहिती मंत्रालयातील विश्वसनीय सूत्रांनी दिली. कोरोना विषाणूला रोखण्यासाठी राज्यात …

Read More »

कोरोना: ४४३० जण घरी तर दुसऱ्या दिवशीही ५३१८ नवे रूग्ण १६७ जणांचा मृत्यू , १-६० हजाराच्या घरात एकूण रूग्ण, ६७ हजार अॅक्टीव्ह

मुंबई : प्रतिनिधी राज्यात एकाबाजूला रूग्ण बरे होवून घरी जाणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. आज पुन्हा ४ थ्या दिवशी ४४३० इतक्या विक्रमी संख्येने रूग्ण घरी गेले. त्यामुळे घरी जाणाऱ्यांची संख्या ८४ हजारावर पोहोचली. तर काल ५ हजार रूग्णांचे निदान झाल्यानंतर आज दुसऱ्यादिवशीही ५३१८ नव्या रूग्णांचे निदान झाले. त्यामुळे एकूण रूग्ण …

Read More »

या कॉर्पोरेट कंपन्या आणि देणगीदारांनी दिली ५२ कोटींहून अधिकची मदत कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी कौशल्य विकास विभागाच्या महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीने सीएसआर देणगी समन्वयाचे उत्कृष्ट काम करुन लाखो आपत्तीग्रस्तांना मोठी मदत मिळवून दिली. यासाठी सोसायटीमार्फत धैर्य मोहीम राबविण्यात आली. याअंतर्गत विविध कॉर्पोरेट्स आणि खाजगी देणगीदारांकडून ५२ कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या विविध प्रकारच्या मदत साहित्याची उभारणी आणि त्याचे गरजुंना …

Read More »