Breaking News

Tag Archives: covid-19 lockdown

पॅकेज-१: आयकरसाठी ३० नोव्हें. पर्यंतची मुदत : टीडीएस टीसीएसमध्ये २५ टक्के कपात लघु व मध्यम उद्योजकांसाठी ३ लाख कोटींचे कर्ज देणार

नवी दिल्ली-मुंबई: प्रतिनिधी लॉकडाऊनमुळे भेडसाव्या लागत असलेल्या आर्थिक नुकसानीत नागरिकांना आणि उद्योगांना दिलासा देण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नोकरदार, व्यापारी आणि उद्योजकांना उत्पन्नावरील आयकर भरण्यासाठी ३० नोव्हेंबर आणि ऑडिट करण्यासाठी ३१ ऑक्टोंबर पर्यंतची मुदत देत टीडीएस आणि टीसीएसच्या दरात थेट २५ टक्के कपात करण्यात येत असल्याची घोषणा केली. तसेच ही …

Read More »

२० लाख कोटींच्या आर्थिक पॅकेजसोबत ४ था लॉकडाऊन १८ मेपासून सर्वस्तरातील घटकांचा विचार पॅकेजमध्ये केल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा

नवी दिल्ली-मुंबई: विशेष प्रतिनिधी मागील तीन टप्प्यात लॉकडाऊन होता. मात्र त्या सर्वांपेक्षा वेगळा आणि नवा लॉकडाऊनचा ४ था टप्पा सुरु होणार आहे. देशातील रस्त्यावर विक्री करणारा, फुटपाथवरचा ठेलेवाला यांच्यासह कुटीरोद्योग, लघु उद्योग, गृह उद्योग, छोटे-मोठे उद्योग यासह संपूर्ण उद्योग जगातासाठी २० लाख कोटी रूपयांचे विशेष आर्थिक पॅकेज भविष्यकाळात देशाला आत्मनिर्भर …

Read More »

कृषी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना दिलासा: फक्त अंतिम सत्राची परिक्षा होणार १५ जून पूर्वी परिक्षा तर १५ जुलैपूर्वी निकाल- कृषीमंत्री दादाजी भुसे

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील कृषि व संलग्न अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांसाठी चारही कृषि विद्यापीठातील परिक्षांच्या नियोजनाचा कृषि अनुसंधान परिषदेने तयार केलेला कृति आराखडा राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी आज जाहिर केला. कृषि पदविका (दोन वर्ष) अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांना अंतर्गत मुल्यमापनाव्दारे १०० टक्के गुण देऊन व्दितीय वर्षात प्रवेश देण्यात येईल. तर व्दितीय …

Read More »

पुढच्या वर्षात प्रवेश घ्यायचाय, परिक्षेची माहिती हवीय, या नंबरवर करा फोन मुंबई विद्यापीठाची विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाईन सुरु

मुंबई: प्रतिनिधी विद्यापीठ अनुदान आयोग (युजीसी ) व राज्य शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या निर्देशानुसार मुंबई विद्यापीठाने कोविड- १९ च्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाच्या परीक्षा व पुढील वर्गातील प्रवेशासंदर्भात विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाईन क्रमांक व ईमेल सुविधा सुरु केली आहे. विद्यार्थी या हेल्पलाईन क्रमांकावर व ईमेलवर संपर्क साधून परीक्षा व पुढील वर्गातील प्रवेशासंदर्भात मार्गदर्शन …

Read More »

दवाखाने बंद ? सरकारी रूग्णालयात गर्दी, मग ऑनलाईन ओपीडीत दाखवा आरोग्य सल्ल्यासाठी मोफत ऑनलाईन ई- संजीवनी ओपीडी

मुंबई : प्रतिनिधी कोरोनामुळे राज्यात लॉकडाऊन सुरू आहे त्यामुळे काही ठिकाणी खासगी दवाखाने बंद आहेत अशा परिस्थितीत नागरिकांना आरोग्य विषयक तपासणी, सल्ला घेताना येणारी अडचण लक्षात घेऊन ऑनलाईन ई-संजीवनी ओपीडी सेवा सुरू करण्यात आली आहे. राज्यात प्रायोगिक तत्वावर सुरू झालेली ही सेवा पूर्णपणे सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी www.esanjeevaniopd.in या …

Read More »

लॉकडाऊनचा ४ था टप्पा १८ तारखेपासून सर्वांनी आराखडा तयार करून १५ मे पूर्वी पाठविण्याचे पंतप्रधानांचे आवाहन

नवी दिल्ली-मुंबई: प्रतिनिधी देशातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता पुढची रणनीती तयार करावी लागणार आहे. यापार्श्वभूमीवर कोरोना पूर्व आणि कोरोनानंतरची परिस्थिती असे दोन भाग पाडावे लागणार आहे. त्यामुळे पुढच्या लॉकडाऊनबाबत १५ तारखेपूर्वी आपल्याला आपल्या राज्यात कशा प्रकारे रचना करता येईल याचा आराखडा तयार करून केंद्राकडे द्या. आम्ही त्यावर विचार करून १८ …

Read More »

श्रमिक ट्रेन्सबरोबर आता प्रवासी रेल्वेही सुरु होणार : परंतु निवडक ठिकाणीच रेल्वे मंत्रालयाकडून पत्रक जाहीर

नवी दिल्ली- मुंबई: विशेष प्रतिनिधी विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. या लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात अनेक नागरिक आपल्या मूळ ठिकाणाहून इतरत्र अडकल्याची बाब उघडकीस आली. त्यामुळे अशा व्यक्तींसाठी विशेषत: स्थलांतरीत कामगारांसाठी श्रमिक कामगारांसाठी श्रमिक ट्रेन्स सुरु केल्या. आता त्या पाठोपाठ विशेष प्रवासी वाहतूकीच्या गाड्याही १२ मे पासून सुरु कऱण्याचा …

Read More »

रेशन दुकानातून तांदळाबरोबर आता डाळही मोफत अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत एप्रिल ते जुन २०२० या तीन महिन्यांसाठी नियमित धान्यासोबतच प्रति महिना प्रती कार्ड १ किलो चणाडाळ किंवा तुरदाळ मोफत वाटप केली जाणार असल्याची माहिती राज्याचे अन्न, नागरीपुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात आणि राज्यात सुरु असलेल्या लॉकडाऊनच्या काळात एकही नागरिक …

Read More »

अडकलेले नागरिक, विद्यार्थ्यांनो तुमच्यासाठी मोफत एसटी पाठवतोय : मात्र या गोष्टी करा अर्ज भरून सादर करा: सोमवारपासून मिळणार सेवा: सतेज बंटी पाटील

मुंबई: प्रतिनिधी राज्याच्या विविध भागात लॉकडाऊनमुळे मोठ्या प्रमाणावर नागरिक आणि विद्यार्थी अडकले आहेत. त्यांना त्यांच्या मुळ घरी सोडण्याटसाठी एसटी महामंडळाकडून सोमवारपासून मोफत बस सेवा सुरु करण्यात येणार आहे. या बससेवेतून स्थानिक नागरिकांना प्रवास करता येणार नाही. तसेच या खालील अटींची पूर्तता करणाऱ्यांना बस सेवेचा लाभ मिळणार असल्याची माहिती परिवहन राज्यमंत्री …

Read More »

मजूरांच्या प्रश्नी रेल्वेमंत्री गोयल आणि मुख्यमंत्री ठाकरेंचे पवारांना आश्वासन शरद पवारांचा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व केंद्रीय रेल्वेमंत्र्यांना दूरध्वनी

मुंबई: प्रतिनिधी मजुरांच्या प्रश्नासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आज केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. त्यावेळी मजूरांना त्यांच्या गावी पोहोचविण्यासाठी रेल्वे प्रवासाची सोय करण्याचे आश्वासन दिले. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे मजूरांच्या प्रवासासाठी एसटी बसेसची सोय करणार असल्याचे सांगितल्याने मजूरांना दिलासा मिळणार …

Read More »