Breaking News

Tag Archives: covid-19 lockdown

पॅकेज-५: राज्यांना यापूर्वीच काहीस दिलयं: ओव्हर ड्राफ्ट देण्याची रिझर्व्ह बँकेला विनंती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची माहिती

नवी दिल्ली-मुंबई: प्रतिनिधी देशावर कोरोनाच्या संकटामुळे लॉकडाऊन करावे लागले. त्यामुळे प्रत्येक राज्यातील आर्थिक व्यवहार ठप्प झालेले असल्याने आर्थिक प्रश्नांनी आपले हात-पाय पसरण्यास सुरुवात केलीय. तत्पूर्वीच राज्यांना जीएसटी वसूली पोटी द्यावयाची रक्कम एप्रिल महिन्यातच दिली आहे. तर आजाराचा सामना करण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयांकडून ४ हजार कोटींचे वाटप करण्यात आल्याचे सांगत आलेल्या …

Read More »

पॅकेज सर्वसामान्यांसाठी की धनदांडग्या उद्योगपतींसाठी? मंत्री अशोक चव्हाण यांचा केंद्र सरकारला संतप्त सवाल

मुंबई : प्रतिनिधी केंद्र सरकारचे पॅकेज कोरोनामुळे होरपळून निघालेल्या सर्वसामान्य नागरिकांना आधार देण्यासाठी आहे की धनदांडग्या उद्योगपतींची घरे भरण्यासाठी आहे, असा सवाल राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केला आहे. कोरोना पॅकेजच्या नावाखाली केंद्र सरकारने नवीन आर्थिक धोरणे जाहीर करण्याचा सपाटा सुरू केला आहे. कोरोनाविरूद्ध आज सुरू असलेल्या लढाईशी …

Read More »

राज्याची जीवन वाहीनी ठरलेली लाल परी बनली मजुरांची मदत वाहीनी ११ हजार ३७९ बसेस मधून १ लाख ४१ हजार ७९८ मजुरांचा प्रवास

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राची जीवनवाहिनी म्हणून ज्या एस.टी बस कडे पाहिले जाते त्या एस.टी बसेसही स्थलांतरीत मजुर आणि कामगारांच्या मदतीला धावून आल्या आहेत. आतापर्यंत ११ हजार ३७९ बसेसद्वारे सुमारे १ लाख ४१ हजार ७९८ स्थलांतरीत मजुरांना त्यांच्या राज्यात जाण्यासाठी महाराष्ट्राच्या सीमेपर्यंत बसची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. आतापर्यंत आपल्या …

Read More »

मुख्यमंत्री आणि पवारांमुळे अखेर बिहार, प.बंगालचे कामगार पोहोचले घरी गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्यात अडकून पडलेल्या बिहार आणि पश्चिम बंगालच्या कामगारांना ठाम नकार देण्यात येत होता. मात्र यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्तीशं बिहारचे मुख्यमंत्री नीतीशकुमार, प.बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी वैयक्तिक पातळीवर संवाद साधल्याने या कामगारांना त्यांच्या मुळ घरी जाता आले. …

Read More »

पॅकेज ४- आत्मनिर्भर भारतासाठी संरक्षण, अंतराळ, कोळसा, खाण उद्योगात खाजगी कंपन्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून घोषणा

नवी दिल्ली-मुंबई: प्रतिनिधी कोरोना संकटाला संधीत रूपांतरीत करण्यासाठी आत्मनिर्भर भारताचा नारा देत लोकल टू ग्लोबल बनण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १० लाख कोटींचे पॅकेज जाहीर केले. त्यातील ४ थ्या टप्प्यात अंतराळ, ऑटोमिक एनर्जी, संरक्षण, इस्त्रो, खाणी, विमानतळ, वीज वितरण, रिमोट सेंन्सिंग आदी क्षेत्रातील सरकारची एकाधिरशाही संपुष्टात आणत खाजगी गुंतवणूकदारांच्या मदतीने …

Read More »

९ वा महिना शुरू है, यहाँ कपडा और ब्लेड मिलेगा …..? राहत केंद्र (निंबळक बायपास रस्ता), सासऱ्याची सूनेसाठी धडपड- स्नेहालय संस्थेने पाठविलेली हकिकत

अहमदनगर : प्रतिनिधी “गर्भवती असलेल्या आपल्या सुनेची, शैलाची प्रसूती चालू कंटेनरमध्ये करावी लागली तर त्यासाठी नाळ कापायला दोन नवे ब्लेड ,कापूस,स्पिरीट आणि निरुपयोगी कपडे मिळतील का ? ” असे विष्णू यादव याने विचारले तेव्हा राहत केंद्रावरील सर्वजण सुन्न झाले. उत्तर भारतातील आपल्या घरांकडे पायी , सायकलिंद्वारे तसेच मिळेल त्या वाहनाने …

Read More »

संभावित संकटे-परिस्थितीवर शरद पवारांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री, मंत्र्यांची चर्चा लॉकडाऊनमधली आव्हाने, अर्थचक्र गतिमान करण्याला प्राधान्य

लॉकडाऊनची सध्याची परिस्थिती, आणि त्याच्या पुढील टप्प्यातील नियोजन तसेच राज्यात काही ठिकाणी आर्थिक व्यवहार सुरु करणे याबाबत आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दादर येथे एका बैठकीत आढावा घेतला. यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, आरोग्यमंत्री राजेश टोपे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, तसेच मुख्य …

Read More »

पॅकेज-२: राज्याच्या धर्तीवर स्थलांतरीत कामगार, शहरी गरीबांसाठी भाडेतत्वावरील घरे वन नेशन वन रेशन कार्ड योजना अंमलात आणणार असल्याची अर्थमंत्री सीतारामन यांची घोषणा

नवी दिल्ली-मुंबई: विशेष प्रतिनिधी कोरोना विषाणूला रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे संपूर्ण देशातील कामगार, सर्वसामान्य नागरिकांवर आर्थिक अडचणींची संक्रात आली. त्यामुळे येथून पुढे स्थलांतरीत आणि शहरी भागातील नागरिकांनासाठी भाडेतत्वावरील घरे उभारण्यात येणार असल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली. त्याशिवाय सर्वांसाठी घरे या योजनेतून बँकाकडून मिळणाऱ्या व्याज सूट मोहीमेला एक …

Read More »

कोरोना लढ्यासाठी देवस्थानातील १ ट्रिलियन किंमतीचे सोने ताब्यात घ्या काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी

मुंबई: प्रतिनिधी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन जाहीर केलेला आहे. त्यामुळे आर्थिक व्यवहार पूर्णपणे ठप्प झालेले आहेत. त्याचा फटका अनेकत कष्टकरी, कामगार आणि उद्योजकांना बसत असून सरकारची तिजोरीही रिकामी होत चालली आहे. यापार्श्वभूमीवर निधीची आवश्यकता भासणार असल्याने देशातील सर्व देवस्थानात पडून असलेले १ ट्रिलियन अर्थात ७६ लाख कोटी रूपये किंमतीचे …

Read More »

सरपंच, उपसरपंचांची निवड होणार, पण ग्रामसभा नाही ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी राज्यात काही ग्रामपंचायतींच्या रिक्त असलेल्या सरपंच व उपसरपंच पदांच्या निवडी होण्यासाठी आवश्यक असलेली ग्रामपंचायतींच्या या बैठका घेण्यास संमती देण्यात आली. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक सर्व सूचनांचे तंतोतंत पालन करुन घेण्यात याव्यात अशी सूचना जिल्हाधिकारी आणि प्रशासनाला करत ग्रामसभा घेण्यास त्यांनी परवानगी नाकारत असल्याचे राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन …

Read More »