Breaking News

Tag Archives: congress

नाना पटोले यांचा इशारा, भ्रष्ट भाजपाचा राज्यभर भांडाफोड… मणिपूर, ब्रिजभूषण शरण सिंह व अदानीवरील मौन देशासाठी घातक :- बाळासाहेब थोरात

राहुल गांधी यांच्यावर लावण्यात आलेले आरोप खोटे व चुकीचे आहेत, त्यापाठीमागे भाजपाचा हात आहे हे सर्वांना माहित आहे. राहुल गांधी यांनी कोणताही गंभीर स्वरुपाचा गुन्हा केलेला नसताना केवळ राजकीय द्वेषातून त्यांच्यावर कारवाई करत खासदारकी रद्द केली व त्यांना बेघर करण्यात आले. जनतेची भावना संसदेत मांडणाऱ्या निरपराध राहुल गांधी यांच्यावरील अन्यायाविरोधात …

Read More »

अतुल लोंढे यांची टीका, मोदी देशासाठी तर देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रासाठी हानिकारक फॉक्सकॉनने माघार घेतल्याने मायक्रॉन सेमीकंडक्टर प्रकल्पावरही संशयाचे ढग

वेदांता-फॉक्सकॉन हा सेमीकंडक्टर प्रकल्प पुण्याजवळ प्रस्तावित होता, पण गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय फायद्यासाठी तो गुजरातला पळवण्यात आला. पण आता हा प्रकल्प गुजरातमध्ये साकार होणार नाही. वेदांताबरोबरच्या भागिदारीतून फॉक्सकॉनने माघार घेतल्याने हा प्रकल्प बारगळला आहे. हा प्रकल्प पुण्यात होणार होता, त्याची सर्व प्रक्रिया पार पडली होती, मविआ सरकारनेही सर्व सवलती …

Read More »

नाना पटोले यांची टीका, शिंदे आणि पवार यांची भाषा म्हणजे मोदी-शाह यांची स्क्रिप्टच गद्दारांना सर्व गद्दारच दिसतात, काँग्रेसमध्ये कोणीही गद्दार नाही

राज्यात फोडाफोडीचे राजकारण सुरु असून त्यामागे भारतीय जनता पक्षच आहे. दिल्लीतून मोदी व शहा जशी स्क्रिप्ट लिहून देतात तीच भाषा बोलली जात आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेना सोडल्यावर जी भाषा वापरली तशीच भाषा अजित पवार वापरत आहेत, हा काही योगायोग नाही तर दिल्लीतून मोदी-शहांनी दिलेली स्क्रिप्टच आहे. शिवसेना व राष्ट्रवादी …

Read More »

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन १७ जुलैपासून कामकाजाचे १५ दिवस चालणार

राज्य विधिमंडळाचे सन २०२३ चे पावसाळी अधिवेशन १७ जुलै ते ४ ऑगस्ट २०२३ या कालावधीत मुंबई येथे होणार आहे. याबाबतची घोषणा विधानसभा कामकाज सल्लागार समितीच्या आज झालेल्या बैठकीत विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी, तर विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली. विधानभवनात पार पडलेल्या …

Read More »

गुजरात न्यायालयाच्या निर्णयावर नाना पटोले यांचा सवाल, ललित मोदी, नीरव मोदी हे…? राहुल गांधींवरील कारवाई राजकीय द्वेषातून, सर्वोच्च न्यायालयात जाऊ

राहुल गांधी यांच्याविरोधात खोटी तक्रार करुन राजकीय द्वेषातून जाणीवपूर्वक कारवाई केलेली आहे. राहुल गांधी यांनी कोणत्याही समाजाचा अपमान केलेला नाही परंतु राहुल गांधी यांना घाबरवण्याचा प्रयत्न भाजपा गलिच्छ राजकारणातून करत आहे. देशातील कायदे सर्वांना समान आहेत व काँग्रेसचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. कोर्टाच्या निकालावर प्रतिक्रिया देता येत नाही, परंतु राजकीय द्वेषातून …

Read More »

पंकजा मुंडे म्हणाल्या, पक्षानं आधी फॉर्म भरायला लावला अन…नंतर सांगितलं गरज नाही मी भाजपामध्येच राहणार पण पक्षानंही माझ्या चर्चेवर बोलावं

नुकतेच बीड जिल्ह्यातील साखर कारखान्याच्या निवडणूकीच्या निमित्ताने पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या भावा-बहिणीत समझौता झाल्याची चर्चा ऐकायला मिळाली. नेमक्या त्याच कालावधीत बीआरएस, एमआयएम आणि महादेव जानकर यांनीही रासपची ऑफर दिली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीच्या नाट्यानंतर राज्य मंत्रिमंडळात पुन्हा एकदा मंत्री झालेले धनंजय मुंडे हे मंत्री झाल्यानंतर पुन्हा बहिणीच्या घरी …

Read More »

नाना पटोले यांची टीका, मोदी-शहा यांनी लिहून दिलेल्या स्क्रिप्टनुसार महाराष्ट्रात राजकीय फोडाफोडी महाविकास आघाडी भाजपाविरोधात सक्षमपणे व एकजुटीने लढा देईल :- एच. के. पाटील

महाराष्ट्रात एक असंवैधानिक सरकार सत्तेवर असून अपात्रतेच्या मुद्द्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. अशा परिस्थितीत महाराष्ट्रात पुन्हा फोडाफोडीचे राजकारण करण्यात आले आहे. भारतीय जनता पक्षाच्या ऑपरेशन कमळचा हा प्रकार जनतेला आवडलेला नाही. कर्नाटकच्या जनतेने भाजपाला घरी बसवले आहे. महाराष्ट्रात आधी उद्धव ठाकरे यांना व आता शरद पवार यांना काही आमदार सोडून …

Read More »

नितेश राणे यांची टीका, राष्ट्रवादीच सामील झाल्याने ‘मविआ’ नामशेष संजय राऊत यांचे आता काँग्रेस लक्ष्य

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच शिवसेना – भाजपा सोबत सरकारमध्ये सामील झाल्याने आता महाविकास आघाडी पूर्णपणे नामशेष झाली आहे अशी टीका भारतीय जनता पार्टीचे आमदार नितेश राणे यांनी सोमवारी केली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भाजपा प्रदेश माध्यम विभाग प्रदेश प्रवक्ते अभिषेक मिश्रा,ओमप्रकाश चौहान उपस्थित होते. अजित पवार …

Read More »

नाना पटोले यांचा खोचक टोला, एकनाथ शिंदेंचे हिंदुत्व आता राष्ट्रवादीच्या फुटीर गटासोबत…. महाराष्ट्रात लोकशाहीचे वस्त्रहरण, सत्तापिपासु भाजपाकडून पुन्हा तोडफोडीचे महाभारत

महाराष्ट्रात पुन्हा एकदा भारतीय जनचा पक्षाने तोडफोडीचे राजकारण करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका गटासोबत घरोबा केला आहे. जनसमर्थन घटत असल्याने सत्तेसाठी काहीही करण्याचा हा भाजपाचा विकृत पॅटर्न आहे. महाराष्ट्राची जनता हा सत्तेचा खेळ उघड्या डोळ्यांनी पहात असून लोकशाही व संविधान धाब्यावर बसवून खुर्चीचा खेळ सुरु आहे. महाराष्ट्रात लोकशाहीचे वस्त्रहरण सुरु असून …

Read More »

नाना पटोले यांची मागणी, … ईडी सरकारवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा ५४ हजार कोटी रुपये खर्चून जनतेच्या माथी मृत्युचा महामार्ग

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग मोठा गाजावाजा करुन ईडी सरकारने घाईघाईत पंतप्रधानांच्या हस्ते खुला केला. हा महामार्ग सुरु झाल्यापासून दररोज अपघात होत आहेत. या महामार्गाबद्दल अनेक तक्रारीसुद्धा येत आहेत पण शिंदे फडणवीस सरकार त्याची दखल घेताना दिसत नाही. बुलढाण्याजवळ खाजगी बसला अपघात होऊन २६ जणांचा होरपळून मृत्यू झाला, हा अपघात नसून सरकारी …

Read More »