Breaking News

Tag Archives: congress

गुजरात मॉडेल खोटा असल्यानेच भिंत बांधण्याची मोदी सरकारवर पाळी जाहीर निषेध करत काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांची टीका

मुंबईः प्रतिनिधी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अहमदाबाद भेटीवेळी तिथली गरिबी ट्रम्प यांना दिसू नये म्हणून मोठी भिंत बांधून गरिबी लपवण्याचा केविलवाणा प्रयत्न मोदी सरकारकडून केला जात आहे. गुजरात विकासाचे मॉडेल म्हणून ढोल पिटणाऱ्या मोदींनीच गरीबी दिसू नये यासाठी केलेले मोदी सरकारचे हे कृत्य अमानवी असून काँग्रेस त्याचा जाहीर निषेध …

Read More »

पवार म्हणाले, काँग्रेस राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यातील आश्वासने पूर्ण करा आगामी निवडणुकांवर लक्ष केंद्रित करण्याचे आदेश दिल्याची राष्ट्रीय प्रवक्ते मलिक यांची माहिती

मुंबईः प्रतिनिधी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचा जाहीरनाम्यात जे मुद्दे होते. त्या मुद्द्यांची अंमलबजावणी करण्यासाठी ज्या मंत्र्याकडे कामे होती. त्यावर उपाययोजना करण्यात यावी आणि त्यातील आश्वासने पूर्ण करावी अशी स्पष्ट सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षाच्या मंत्र्याना केल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे …

Read More »

दलित, आदिवासी, मागासवर्गीयांना विरोध भाजपच्या डीएनएमध्येच काँग्रेस सरचिटणीस मल्लिकार्जून खर्गे यांची टीका

मुंबईः प्रतिनिधी दलित, आदिवासी, मागासवर्गींयांना असलेला भाजपाचा विरोध हा त्यांच्या डीएनएमध्येच आहे. त्याच मानसिकतेतून आरक्षण संपुष्टात आणण्यास त्यांनी सुरुवात केली. परंतु काँग्रेस पक्ष मागासर्गीयांच्या पाठीशी भक्कमपणे उभा असून भाजपाचा हा डाव हाणून पाडण्यासाठी कोणताही संघर्ष करण्यास मागेपुढे पाहणार नसल्याचा इशारा अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जून खर्गे …

Read More »

अर्थमंत्री पवारांचा विरोध डावलून पाच दिवसांचा आठवडा होणार सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार दिलासा

मुंबईः प्रतिनिधी मागील अनेक वर्षापासून केंद्राच्या धर्तीवर राज्यातही ५ दिवसाचा आठवडा करावा अशी मागणी शासकिय कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांकडून करण्यात येत होती. आता ही मागणी फलद्रुप होण्याची चिन्हे दिसत असून या प्रस्तावास अर्थमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा तीव्र विरोध असला तरी हा प्रस्ताव राज्य सरकारकडून मान्य करण्यात येणार असल्याची …

Read More »

भाजपाच्या संबित पात्राला काँग्रेस शिकविणार कायदेशीर धडा काँग्रेस नेते नसीम खान यांचा इशारा

मुंबईः प्रतिनिधी भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी सोशल मीडियावर खोटा व्हिडिओ शेअर करुन आपली तसेच काँग्रेस पक्षाची बदनामी करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी त्यांना कायदेशीर धडा शिकवणार असल्याचा इशारा काँग्रेस नेते नसीम खान यांनी देत त्यांच्या विरोधात मुंबई पोलीस आयुक्त, साकीनामा पोलीस स्टेशन, निवडणूक आयोगाकडेही यासंदर्भात तक्रार दाखल केल्याचे त्यांनी सांगितले. …

Read More »

बांधकाम क्षेत्रातल्या एका “बॉस” ची मंत्रालयात चलती पक्षश्रेष्ठींशी संबधित असल्याने मंत्र्याकडूनही त्यांचे आगतस्वागत

मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्याचा कारभार हाकणाऱ्या मंत्रालयात सध्या विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या उत्तुंग व्यक्तीमत्वांची आवकजावक वाढली आहे. त्यातच राज्य मंत्रीमंडळातील गृहनिर्माण विभागाच्या एका वरिष्ठ मंत्र्याने त्यांच्या पक्षश्रेष्ठींच्या जवळच्या व्यक्तीला त्याच्या मर्जीने शासकिय निर्णय घेण्यास सुरुवात केल्याने या बॉस नामक व्यक्तीच्या इशाऱ्यावर विभागाचा कारभार चालणार की जनतेसाठी चालणार असा प्रश्न मंत्रालयातील …

Read More »

हेगडेंच्या त्या वक्तव्यप्रकरणी भाजपा नेत्यांनीच माफी मागावी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची मागणी

मुंबईः प्रतिनिधी भाजपचे खासदार अनंतकुमार हेगडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल केलेले वक्तव्य अत्यंत आक्षेपार्ह आहे. भाजपा व संघ परिवाराकडून महात्मा गांधींबद्दल वारंवार अशी अपमानजनक वक्तवे केली जात असताना त्यांना भाजपचे शिर्षस्थ नेतृत्व पाठीशीच घालत असल्याचे दिसते. हेगडेंचे आजचे वक्तव्यही संतापजनक आणि निषेधार्ह आहे. या वक्तव्यप्रकरणी भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनीच माफी …

Read More »

राजकिय नेत्यांचे फोन टॅपिंग प्रकरण ६ आठवड्यात तपासणार गृहमंत्री अनिल देशमुख यांची ग्वाही

मुंबईः प्रतिनिधी राजकिय फायद्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांचे फोन टॅप करण्याचे काम तत्कालीन सरकारने केले. यासंदर्भातच्या तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी तक्रारी केल्यानंतरच चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार ६ आठवड्यात याची चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. मंत्रालयातील विधिमंडळ व मंत्रालय वार्ताहर संघात आयोजित …

Read More »

बिदरच्या धर्तीवर मुंबईतील शाळा चालकांवरही देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांची मागणी

मुंबईः प्रतिनिधी बिदरमधील विद्यार्थ्यांनी सुधारित नागरिकता कायद्याविरोधात (सीएए) नाटक सादर केल्यावरुन त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला जात असेल तर त्याच धर्तीवर मुंबईतील शाळकरी मुलांना सीएएच्या समर्थनासाठी वेठीस धरणारे शाळा व्यवस्थापन, आयोजक यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे, अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. भाजपशासित राज्यात सीएएविरोधात …

Read More »

शाह-जी व्हिडीओवरून महाराष्ट्रात रणकंदन शिवसेना, छत्रपतींच्या वंशजाच्या नाराजीनंतर भाजपकडून खुलासा

मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्याचे प्रेरणास्थान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना केल्याप्रकरणीचा वाद नुकताच क्षमला. तोच दिल्ली निवडणूकीच्या निमित्ताने तान्हाजी चित्रपटाच्या ट्रेलरचा वापर करत पुन्हा एकदा नरेंद्र मोदीं आणि अमित शाह यांच्या फोटोचा वापर छत्रपती शिवाजी आणि तान्हाजी स्वरूपात केल्याने केल्याने एका नव्या वादाला तोंड फुटले. …

Read More »