Breaking News

Tag Archives: cm uddhav thackeray

सर्वोच्च न्यायालयानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले कौतुक केंद्र सरकार करीत असलेल्या सहकार्याबद्धल मुख्यमंत्र्यांनी मानले आभार

मुंबई : प्रतिनिधी सध्या कोरोनाच्या दुसरी लाटेचा सामना करण्यासाठी महाविकास आघाडी सरकार आणि प्रशासन अतिशय चांगल्या पध्दतीने सामना करत असल्याच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेचे उदाहरण देशासमोर ठेवले. त्याच आधारे राज्यातही कोरोनाचा सामना सक्षमपणे करण्यात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना फोन करत महाराष्ट्राचे कौतुक …

Read More »

शस्त्रक्रियेनंतर शरद पवार फिट अँड फाईन: कामकाजाला केली सुरुवात आदरातिथ्य क्षेत्रातील व्यावसायिकांना दिलासा द्यावा ;शरद पवारांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र

मुंबई: प्रतिनिधी पोटदुखी व तोंडातील वाढलेल्या अल्सरच्या शस्त्रक्रियेनंतर काही दिवस आराम केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपण फिट अँड फाईन असल्याचा संदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांबरोबर आणि विरोधकांना देण्यासाठी आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना आज पत्र लिहीत आपल्या कामकाजाचा पुनच्च: हरी होम केला. तसेच खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबत मुंबईतील …

Read More »

सरकारी कर्मचाऱ्यांना पुढील आदेश होईपर्यत पदावनत न करता पदोन्नती मिळणार सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नतीच्या रिक्त जागा भरणार

मुंबई: विशेष प्रतिनिधी राज्य सरकारी सेवेतील मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना पदोन्नतीत आरक्षण देण्याच्या निर्णयाबाबत सर्वोच्च न्यायालयाने अद्याप कोणताच निर्णय दिलेला नसल्याने राखीव आणि खुल्या प्रवर्गातील सर्व जागा सेवाज्येष्ठतेनुसार भरण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तसेच सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नतीच्या यादीत वरच्या स्थानी आलेल्या कर्मचारी-अधिकाऱ्यांना पदावनत न करण्याचा निर्णयही राज्य सरकारने घेतला असून त्यासंबधीचा आदेश …

Read More »

आरोग्य विभागाची १६००० पदांची नोकरभरती : आठभरात प्रक्रिया पूर्ण होणार आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर पडणारा ताण लक्षात घेऊन आरोग्य विभागातील १०० टक्के पदभरतीला मान्यता मिळाल्याचे सांगतानाच विविध संवर्गातील १६ हजार पदे तातडीने भरण्यात येतील, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे सांगितले. राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्याचबरोबर तिसऱ्या लाटेबाबत वर्तविलेल्या …

Read More »

जिथं रूग्णसंख्या जास्त तिथे मागील वर्षासारखा लॉकडाऊन लावा मुंबई उच्च न्यायालयाची राज्य सरकारला सूचना

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील पुण्यासह ज्या ठिकाणी रुग्णसंख्या वाढत आहे तिथे मागील वर्षीप्रमाणे कडक लॉकडाऊन लावण्याची सूचना मुंबई हायकोर्टाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना करत पुण्यातील स्थिती अद्यापही गंभीर असून आम्हाला आदेश द्यायला लावू नका असा इशाराही न्यायालयाने यावेळी राज्य सरकारला दिला. राज्यातील करोना स्थितीचा आढावा मुंबई उच्च न्यायालयातडून घेण्यात येत असून …

Read More »

लसीचे दोन्ही डोस सर्वाधिक नागरिकांना देणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्र प्रथम २८ लाख ६६ हजार नागरिकांचे लसीकरण पूर्ण

मुंबई : प्रतिनिधी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात केवळ लसीचे सर्वाधिक डोस देण्यात महाराष्ट्र अव्वल नाही तर राज्यातील २८ लाख ६६ हजार ६३१ नागरिकांना दोन्ही डोस देऊन त्यांना संरक्षित करण्याकामीही महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे. आजपर्यंत लसीकरण मोहिमेत १ कोटी ६७ लाख ८१ हजार ७१९ डोस देण्यात आले आहेत. दरम्यान, काल ५ मे रोजी …

Read More »

महाविकास आघाडीसरकारवर भाजपा प्रदेशाध्यक्ष पाटील आणि फडणवीसांची टीका महाविकास आघाडी सरकारच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे आरक्षण रद्द

पुणे-नागपूर: प्रतिनिधी मराठा आरक्षणाचा सर्वोच्च न्यायालयात बचाव करण्यात राज्यातील शिवसेना – काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्ताधारी आघाडी सरकारला पूर्ण अपयश आले असून आघाडी सरकारमुळे मराठा समाजाने शिक्षण व नोकरीतील आरक्षण गमावले आहे. यामुळे मराठा तरूण तरुणींच्या आयुष्यात अंधार निर्माण झाला असून मराठा समाज महाविकास आघाडी सरकारला माफ करणार नाही, अशी …

Read More »

मराठा आरक्षणाची लढाई संपलेली नाही, राष्ट्रपती, पंतप्रधान अनादर करणार नाहीत मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी व्यक्त केली आशा

मुंबई : विशेष प्रतिनिधी राज्यातील मराठा समाजाला आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने आज दिलेला निकाल जरी निराशाजनक असला तरी अद्याप लढाई संपलेली नाही असे स्पष्ट करत न्यायालयाने सांगितल्याप्रमाणे मागासप्रवर्ग ठरविण्याचा अधिकार राष्ट्रपती, पंतप्रधान यांना आहेत. त्यानुसार आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र लिहिणार असून आवश्यकता असेल तर आपण …

Read More »

न्यायालयाने मराठा बांधवांना जे नाकारले, त्याची भरपाई राज्य सरकार करणार उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आश्वासन

मुंबई : प्रतिनिधी “सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणासंदर्भात आज दिलेला निर्णय अनपेक्षित, अनाकलनीय, निराश करणारा आहे. राज्य सरकार आणि मराठा समाज संघटनांनी न्यायालयात बाजू भक्कमपणे मांडली. मागील भाजप-शिवसेना युती सरकारच्या काळातील कायदेतज्ञांच्या जोडीने नवीन तज्ञ वकिलांची फौज आपण न्यायालयात उभी केली. मागासवर्गीय आयोगाचा अहवाल आणि शिफारस असूनही असा निर्णय येणे धक्कादायक आहे. …

Read More »

सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्ग ठरविण्याचे अधिकार राज्यांना नाहीत सर्वोच्च न्यायालयाचा मराठा आरक्षणप्रश्नी निर्णय

नवी दिल्ली-मुंबई: प्रतिनिधी राज्यातील मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात राज्य सरकारने घेतलेला निर्णय अयोग्य ठरवित एखाद्या जातीला आणि जमातील सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास असल्याचे ठरविण्याचे अधिकार १०२ व्या घटनादुरूस्तीनुसार राज्य सरकारला नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाच्या ५ सदस्यीय खंडपीठाने ३:२ या मताने निर्णय दिला. त्यामुळे राज्य सरकारने दिलेले मराठा आरक्षण आता संपुष्टात आले. …

Read More »