Breaking News

Tag Archives: cm uddhav thackeray

मुख्यमंत्र्यांचा सवाल, आरक्षणप्रश्नी वर्षभर पंतप्रधानांनी वेळ का दिला नाही? न्यायालयाने वरंवटा फिरविला

मुंबई: प्रतिनिधी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे स्वागत करता येणार नाही. पण यानिमित्ताने कुणी महाराष्ट्राचे वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करु नयेत. जनतेने उगाच डोकी भडकवून घेवू नये. मराठा आरक्षणाबाबत कायद्याची लढाई विजय मिळेपर्यंत सुरुच राहणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मराठा समाजाला देत भाजपाचेच खासदार असलेले छत्रपती संभाजीराजे हे गेल्या वर्षभरापासून …

Read More »

मुख्यमंत्री म्हणाले, त्या “विकास”ने आपल्याला तोंड दाखवायला जागा ठेवली नाही मिशन ऑक्सिजन स्वावलंबन, कोविड केंद्रांची संख्याही वाढवणार

मुंबई : प्रतिनिधी विकास होत राहील. पण जीव वाचले, तर विकासाला खरा अर्थ आहे. आपण विकास, म्हणून ज्याच्या मागे धावत होतो. त्या विकासाने आपल्याला तोंड दाखवायला जागा ठेवलेली नाही. आपल्याला ऑक्सिजनच्या मागे धावावे लागत आहे असल्याची अप्रत्यक्ष टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केली. कोरोनाने …

Read More »

महाराष्ट्राला ऑक्सिजनचा २०० मेट्रीक टन वाढीव पुरवठा करा मुख्य सचिवांची केंद्रीय मंत्रिमंडळ सचिवांकडे मागणी

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला तोंड देत असून राज्यातील १६ जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या वाढत असल्याने त्यांच्या उपचारासाठी ऑक्सिजनची देखील आवश्यकता भासत आहे. त्यामुळे राज्यात ऑक्सिजन मागणी वाढत असून केंद्र शासनाकडून सध्या होत असलेल्या पुरवठ्यात २०० मेट्रीक टन ऑक्सिजनचा वाढीव पुरवठा करण्यात यावा. लिक्विड ऑक्सिजनच्या वाहतुकीसाठी १० टॅंकर्स महाराष्ट्राला उपलब्ध …

Read More »

राज्यातील दिव्यांग व्यक्तींसाठी राज्य सरकारने घेतले हे महत्वाचे निर्णय कोरोना चाचणी, उपचार, लसीकरणासाठी रांगेत थांबावे लागणार नाही

मुंबई : प्रतिनिधी दिव्यांग व्यक्तींना कोरोना तपासणी, लसीकरण तसेच आवश्यक असल्यास उपचार यासाठी तिष्ठत उभे रहावे लागू नये; तसेच कोरोनाचा संभाव्य धोका कमी व्हावा यासाठी या सर्व ठिकाणी त्यांना रांगेत उभे न राहता प्राधान्य दिले जावे, तसेच राज्य शासनाच्या सेवेतील दिव्यांग अधिकारी- कर्मचाऱ्यांना कार्यालयात उपस्थित राहण्यापासून सूट देण्याचा तसेच ‘वर्क फ्रॉम होम’ची मुभा …

Read More »

सर्व काही केंद्रावर ढकलणार, मग तुम्ही काय करणार ? भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

मुंबई : प्रतिनिधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी रात्री राज्याला उद्देशून केलेल्या संवादात ऑक्सिजन, रेमडिसिवर, कोरोना लस अशा प्रत्येक बाबतीत केंद्रावर जबाबदारी ढकलण्याचा प्रयत्न केला. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी सर्व काही केंद्र सरकारनेच करायचे असेल तर राज्य सरकार स्वतःहून काय करणार? असा सवाल भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला. …

Read More »

राज्यपाल म्हणाले, संकटावर मात करत राज्याच्या प्रगतीसाठी आघाडी सरकारचे कार्य नवीन, बलशाली महाराष्ट्र घडविण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन

मुंबई : प्रतिनिधी गेल्या सुमारे सव्वा वर्षाहून अधिक काळ आपण कोविड संसर्गाविरोधात एकजूटीने लढत आहोत. महाराष्ट्र शासनाने या साथीला आटोक्यात आणण्यासाठी विविध उपाय योजले आहेत. कोविड-१९ च्या संकटावर मात करीत असताना राज्याची अर्थव्यवस्था सांभाळत वंचित-उपेक्षित, शेतकरी, महिलांना न्याय देतानाच राज्याच्या प्रगतीचा आलेख उंचावला जाईल यासाठी महाराष्ट्र शासन कार्य करीत आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या …

Read More »

केंद्र मोफत लस देणार म्हणणाऱ्यांनी माहिती तपासून घ्या; १८ ते ४४ ची जबाबदारी राज्यांवर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा विरोधकांना टोला लगावत ग्वाही

मुंबई: प्रतिनिधी महाराष्ट्रासह देशातील कोरोना विषाणूला रोखण्यासाठी लसीकरणाची मोहिम हाती घेण्यात आली आहे. मात्र काहीजण केंद्र सरकार सर्वांचे मोफत लसीकरण करणार असल्याची चुकिची माहिती पसरवत आहेत. त्यामुळे त्यांनी माहिती तपासून घ्यावी असा टोला भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता लगावत १८ ते ४४ वयोगटातील नागरीकांच्या लसीकरणाची जबाबदारी राज्यांवर …

Read More »

राज्यात पुन्हा BreakTheChain अंतर्गत १५ दिवसांसाठी कडक निर्बंध १ मे रोजीपासून सकाळी ७ ते १५ मे रोजी सकाळी ७ पर्यत निर्बंध

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील वाढत्या कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी १४ एप्रिल २०२१ रोजीपासून ब्रेक द चेन अंतर्गत कडक निर्बंध लागू करण्यात आले. तरीही राज्यातील कोरोनाच्या संख्येत सातत्याने वाढच होत असल्याचे दिसत असल्याने पुन्हा एकदा १५ दिवसांसाठी राज्यात कडक निर्बंध लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्यानुसार १ मे पासून १५ मे …

Read More »

गुन्हे दाखल होवू लागल्याने सरकार विरोधात परमबीर सिंग पुन्हा न्यायालयात पोलिस महासंचालक संजय पांडे यांनाही ओढले न्यायालयात

मुंबई: प्रतिनिधी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी १०० कोटी रूपयांची खंडणी गोळा करण्यास सांगितल्याच्या आरोपावरून सर्वोच्च आणि उच्च न्यायालयात धाव घेतलेले आयपीएस अधिकारी तथा होमगार्डचे पोलिस महासंचालक परमबीर सिंग यांच्या विरोधात गुन्हे दाखल होवू लागल्याने त्यांनी आता पुन्हा राज्य सरकारच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र यावेळी त्यांनी थेट …

Read More »

काँग्रेस आमदार १ महिन्याचे तर मंत्री थोरात वर्षाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला आमदारांच्या वेतनाचे २ कोटी रुपये, काँग्रेस कमिटी ५ लाख तर अमृत उद्योग समूहाच्या ५ हजार कर्मचाऱ्यांचा खर्चही देणार

मुंबई : प्रतिनिधी कोरोना संकटामुळे राज्य अडचणीत असतानाही राज्यातील नागरिकांच्या आरोग्याला प्राधान्य देत महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने राज्यातील सर्व नागरिकांचे मोफत लसीकरण करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या संकटकाळात एका जबाबदार राजकीय पक्षाचा नेता आणि लोकप्रतिनिधी म्हणून राज्य सरकारच्या या कामात थोडीशी मदत म्हणून आपण आपल्या एक वर्षाच्या वेतनाची आणि …

Read More »