Breaking News

Tag Archives: cm uddhav thackeray

डॉक्टर दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा देत व्यक्त केल्या या भावना डॉक्टर्समुळे कोविडविरुद्धच्या लढ्याचा गोवर्धन पेलणे झाले शक्य

मुंबई : प्रतिनिधी १ जुलै या राष्ट्रीय डॉक्टर दिनाच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्व डॉक्टर्सना शुभेच्छा दिल्या आहेत. येणाऱ्या काळातही तुमची सेवा, तुमचे समर्पण, तुमचे कौशल्य आम्हाला हवे आहे असे सांगून डॉक्टर्समुळेच  कोविडविरुद्धच्या लढ्याचा गोवर्धन पेलणे शक्य झाले अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी कृतज्ञता व्यवत केली. सर्व डॉक्टर्सना उद्देशून दिलेल्या पत्रात मुख्यमंत्री ठाकरे म्हणतात …

Read More »

युनोतून परतलेले प्रविण परदेशी आता या विभागाचे अप्पर मुख्य सचिव ७ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील भाजपाच्या नेतृत्वाखालील देवेंद्र फडणवीस यांचे सरकार जावून महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर प्रविण परदेशी यांची मुंबई महापालिकेच्या आयुक्त पदी नियुक्ती करण्यात आली. मात्र तेथूनही त्यांची बदली करण्यात आल्याने त्यांनी राज्याच्या सेवेत राहण्याऐवजी युनोत प्रतिनियुक्तीवर जाणे पसंत केले. त्यासाठी त्यांनी केंद्र सरकारकडे थेट अर्जही केला. त्यानुसार एक वर्षाच्या प्रतिनियुक्तीवर …

Read More »

फडणवीसांच्या त्या मागण्यांवर “उचित कारवाई”चे राज्यपालांचे मुख्यमंत्र्यांना आदेश राजभवनाकडून पाठविलेले पत्र व्हायरल

मुंबई: विशेष प्रतिनिधी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरून राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन दोन दिवसाचे घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. मात्र विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांना भेटून अधिवेशनाचा कालावधी वाढविणे, ओबीसी आरक्षण, विधानसभा अध्यक्षाची निवडणूक घेणे आदी  महत्वाच्या प्रश्नावर निवेदन दिले. त्यावर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी या मागण्यांचा संदर्भ …

Read More »

सार्वजनिक गणेशोत्सव २०२१ साजरा करायचाय, तर हे नियम जाणून घ्या गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचना जारी

मुंबई : प्रतिनिधी कोविड-१९ मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता या वर्षीचा सार्वजनिक गणेशोत्सव(२०२१) साध्या पध्दतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याअनुषंगाने गृहविभागाने  मार्गदर्शक सूचना जारी  केल्या आहेत. ‘ब्रेक दि चेन’च्या अनुषंगाने लागू करण्यात आलेल्या निर्बंधपातळीबाबत (Level of Restrictions for Break the Chain) वेळोवेळी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार इतर निर्बंध कायम राहतील. त्यामध्ये …

Read More »

कृषी कायद्याच्या विरोधात शेतकरी नेत्यांनी घेतली शरद पवार, अजित पवारांची भेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मंत्रालयात भेट

मुंबई : प्रतिनिधी केंद्राच्या कृषी कायद्याच्या विरोधात राज्य सरकारने ठाम भूमिका मांडावी यासाठी आज शेतकरी आणि सामाजिक संघटनांच्या शिष्टमंडळाने राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. त्यावर शरद पवार यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेवून विविध संघटनांच्या मागण्यावर चर्चा घडवून आणणार …

Read More »

मुंबईत २४ जुलैपर्यंत शस्त्र व जमावबंदी पोलिसांकडून आदेश जारी

मुंबई : प्रतिनिधी कोरोनाच्या ३ ऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सर्वच शहर आणि जिल्ह्यात देण्यात आलेल्या सवलती रद्द करत सरसकट सर्वच जिल्ह्यांमध्ये संध्याकाळी ४ वाजेपर्यंत सर्व आस्थापना, दुकाने-अनावश्यक दुकाने सुरु ठेवण्यास परवानगी देत सांयकाळी ५ वाजल्यापासून जमावबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला. मात्र मुंबई हद्दीत शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, …

Read More »

UPSC च्या परिक्षार्थींसाठी राज्य सरकारकडून असा ही मदतीचा हात दिल्लीत मुलाखतीसाठी येणाऱ्यांना ७ दिवस मोफत राहण्याची सोय

मुंबई : प्रतिनिधी UPSC अर्थात केंद्रीय लोकसेवा आयोगाची परिक्षा देवून सनदी अधिकारी बनण्याकडे सध्या राज्यातील तरूणांचा कल वाढ आहे. मात्र लेखी परिक्षेत पास झाल्यानंतर मुलाखसाठी नवी दिल्लीला जावे लागते. तेव्हा राज्यातील परिक्षार्थी विद्यार्थ्यांना राहण्यासाठी वणवण भटकावे लागते, तसेच खाजगी ठिकाणी जास्तीचे पैसे द्यावे लागत असल्याने लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या …

Read More »

भाजपाचा मुख्यमंत्र्यांना सवाल, निर्बंधांमुळे सामान्य माणसांनी जगायच कसं ? अस्वस्थता दडपण्यासाठी राज्य सरकारकडून कोरोनाच्या नावाखाली सामाजिक आणीबाणी- प्रवक्ते केशव उपाध्ये

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्रात गेल्या १५ महिन्यांत वेगवेगळ्या पध्दतीने लाँकडाऊन कडक निर्बध सुरू असून या निर्बंधांमुळे सामान्य माणसापुढे जगायचं कसं प्रश्न उभा राहिला असल्याने समाजात मोठा असंतोष पसरत आहे. हा असंतोष प्रकट होईल या भीतीपोटी राज्यातील आघाडी सरकारने कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची दहशत पसरवत सामाजिक आणिबाणी लागू केली जात आहे. तिसऱ्या …

Read More »

पदोन्नतीतील आरक्षण प्रश्न आणखी रखडणार मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीला दोन महिन्यांची मुदतवाढ

मुंबई: विशेष प्रतिनिधी राज्य सरकारच्या सेवेत कार्यरत असलेल्या मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना पदोन्नतीत आरक्षण मिळण्यास आणखी कालावधी लागणार असून यासंदर्भात मुख्य सचिवांच्या अध्यतेखाली स्थापन करण्यात आलेल्या समितीला आणखी दोन महिन्याची मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे पुढील काही काळ तरी याप्रश्नी निर्णय होणार नसल्याने हा विषय रखडण्याची शक्यता निर्माण झाली …

Read More »

#BreakTheChain अंतर्गत सोमवारपासून फक्त या गोष्टींना परवानगी ! कोविड-19 निर्बंधांशी संबंधित विविध बाबींचे स्पष्टीकरण

मुंबई : प्रतिनिधी राज्य आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वास विभागामार्फत ‘ब्रेक दि चैन’ अंतर्गत ४ जून २०२१ पासून लागू करण्यात आलेल्या निर्बंधांमध्ये विस्तार करताना जमाव व मेळावे, धार्मिक स्थळ,खाजगी प्रशिक्षण वर्ग कौशल्य केंद्रे, हॉटेल, पर्यटन स्थळासंदर्भात काही क्षेत्रांचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे, जेणेकरून निर्बंधांची अंमलबजावणी करताना त्यात गैरसमज किंवा अस्पष्टता  येणार नाही. जमाव/ मेळावे 1- जमावाची व्याख्या ‘एका सामुहिक कारणासाठी …

Read More »