Breaking News

Tag Archives: cm uddhav thackeray

१२ ऑगस्टला ‘वंचित’कडून लॉकडाऊन विरोधात डफली बजाव वंचित आघाडी प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांची घोषणा

पुणे : प्रतिनिधी केंद्र व राज्य सरकार लॉकडाऊन उठवायला तयार नसून ते काहीही सवलत द्यायला तयार नाहीत, याचा निषेध म्हणून वंचित बहुजन आघाडीच्यावतीने राज्यभर डफली वाजवण्याचा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. राज्यातील एसटी सेवा व महानगरातील सार्वजनीक बससेवा सुरू झाल्याच पाहिजे या प्रमुख मागणीला घेऊन हे आंदोलन करण्यात येणार असल्याचे वंचित …

Read More »

मंत्र्यांनी पत्र लिहिले मुख्यमंत्र्यांना परंतु पदोन्नतीप्रश्नी सामाजिक न्याय विभाग गप्प का? महाविकास आघाडीत सुरुवातीला एकमत आता मात्र फक्त बघण्याचा कार्यक्रम

मुंबई: विशेष प्रतिनिधी राज्य सरकारी सेवेतील अनुसूचित जाती-जमातीसह सर्वच मागासवर्गीय प्रवर्गातील कर्मचाऱ्यांना पदोन्नतीत आरक्षण देण्याबाबतची याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. मात्र याप्रश्नी राज्य सरकारची बाजू कोण मांडणार यासाठी अद्यापपर्यंत ज्येष्ठ विधिज्ञाची नियुक्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे सर्व मागासवर्गीयांच्या पदोन्नतीतील आरक्षणाच्या प्रश्नी राज्याचे सामाजिक न्याय विभाग आणि त्या विभागाचे मंत्री धनंजय …

Read More »

मुख्यमंत्री महोदयांनी वाहतूक सेनेच्या मागणीची केंद्राकडे शिफारस करावी कर्जफेडीसाठी अतिरिक्त ४ महिन्याचा कालावधी वाढवून देण्याची मागणी

मुंबई : प्रतिनिधी कोरोना महामारीने देशभरातील सर्वच उद्योगक्षेत्रांना मोठा आर्थिक फटका बसला असून मार्चअखेर सरकारने टाळेबंदीचे कडक आदेश दिल्याने जवळपास सर्वच उद्योग व्यवसाय हे आजतागायत पूर्णत ठप्प आहेत. या पार्श्वभूमीवर आर्थिक संकटात सापडलेल्या उद्योगक्षेत्रांना काही अंशी दिलासा देण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने कर्जफेडीसाठी अतिरिक्त ४ महिन्यांची (डिसेंबर २०२० पर्यंत) मुदतवाढ देण्याची …

Read More »

सोमवार पासून भाजप किसान मोर्चातर्फे बँकांमध्ये ठिय्या आंदोलन मोर्चा अध्यक्ष डॉ. अनिल बोंडे याचा इशारा

मुंबई: प्रतिनिधी खरीप हंगाम अर्ध्यावर आला असताना सुद्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व राष्ट्रीय बँका शेतकऱ्यांना कर्ज देण्याकरीता दिरंगाई करत असून अनावश्यक कागदपत्रांची मागणी करून शेतकऱ्यांना नाहक त्रास देत असल्याचा आरोप भारतीय जनता पार्टीचे किसान मोर्चाचे अध्यक्ष व माजी कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी केला आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे कर्ज …

Read More »

रूग्णांची लूट करणाऱ्या रूग्णालयांवर कारवाईसाठी भरारी पथके स्थापन करा आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचे निर्देश

मुंबई : प्रतिनिधी राज्यात कोरोनाच्या उपचारासाठी खासगी रुग्णालयांकडून आणि रुग्णवाहिकांकडून वाजवी शुल्क आकारण्याबाबत राज्य शासनाने वेळोवेळी निर्देश दिले आहेत. यासर्व निर्देशांची अंमलबजावणीसाठी आणि तपासणीसाठी राज्यात भरारी पथक नेमण्यात आले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे दिली.  यासंदर्भात आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, …

Read More »

टाळेबंदी हटवा अन्यथा दहा ऑगस्ट नंतर रस्त्यावर येवू वंचित बहुजन आघाडीचा इशारा!

मुंबई: प्रतिनिधी राज्य सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वाधित संसर्ग असलेल्या भागांना हॉटस्पॉट म्हणून घोषित केले. मात्र, सरकारने हॉटस्पॉट घोषित केलेल्या भागांमध्ये यावर्षा पेक्षा गेल्यावर्षी म्हणजेच २०१९साली जास्त लोकांचा मृत्यू झाला. केंद्रीय आरोग्य विभागाची ही माहिती आहे. त्यामुळे राज्य सरकारने पूर्णपणे टाळेबंदी हटावावी आणि खऱ्या अर्थाने अनलॉक करावा. अन्यथा दहा ऑगस्ट नंतर …

Read More »

राज्यातल्या पावसाची पंतप्रधान मोदींनी घेतली मुख्यमंत्री ठाकरेंकडून माहिती मुंबई, कोकण आणि कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी, नियंत्रण कक्षांशी थेट मुख्यमंत्री संपर्कात

मुंबई : प्रतिनिधी मुसळधार वृष्टी आणि जोरदार वारे यामुळे मुंबई, मुंबई परिसर तसेच कोकणातील जिल्हे त्याचप्रमाणे विशेषत: कोल्हापूरमध्ये उद्भवलेल्या परिस्थिती संदर्भात मुख्यमंत्री सातत्याने आढावा घेत असून ते संबंधित जिल्हाधिकाऱ्यांशी व नियंत्रण कक्षांमध्ये स्वत: बोलत आहेत. कोरोनाशी मुकाबला सुरु असतांना अतिवृष्टीमुळे संपूर्ण काळजी घेऊन मदत कार्य करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. काल …

Read More »

२.३ कोटी मुलांच्या शिक्षणासाठी देशातील पहिला गुगलचा क्लासरूम महाराष्ट्रात पहिलं राज्य असल्याचा सार्थ अभिमान-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : प्रतिनिधी सगळे जग विचित्र परिस्थितीला सामोरे जात असतांना आणि आपले आयुष्य मास्क आणि घरात बंदिस्त झालेले असतांना कोरोनाने आपल्याला काय शिकवले असा विचार आपण केला तर कोरोनाने उद्याच्या गोष्टींची आज आपल्याला ओळख करून दिली. उद्याचे जग, उद्याची माध्यमे, उद्याचे शिक्षण कसे असेल याची आजच जाणीव करून दिली. त्यामुळे …

Read More »

जे तत्कालीन सरकारला जमले नाही ते विद्यमान “मुख्यमंत्र्यांनी करून दाखविले” दुधाच्या भुकटी सरकारच्या दुसऱ्या विभागाला देण्याचा निर्णय

मुंबई: विशेष प्रतिनिधी मागील काही दिंवसापासून राज्यातील दूध उत्पादक शेतकरी आणि दूधाच्या भुकटीला अनुदान देण्याच्या प्रश्नांवरून सातत्याने आंदोलन केले जात आहे. मात्र या प्रश्नांचे मूळ तत्कालीन सरकारने याबाबत निर्णय न घेतल्याने ही परिस्थिती निर्माण झाली. परंतु जे तत्कालीन सरकारला जमले नाही ते विद्यमान मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी करून दाखविल्याची माहिती …

Read More »

आणि मंत्रालयात अधिकारी-कर्मचाऱ्यांना पुन्हा करावा लागला मुक्काम कालच्या पावसामुळे सगळीकडेच पाणी

मुंबई: प्रतिनिधी राज्याचे मुख्यालय असलेल्या मंत्रालयात ४७ वर्षातील रेकॉर्ड ब्रेक पाऊस काल पडला. तसेच मंत्रालयातील प्रमुख तीन प्रवेशद्वारावर निसर्गाने अवकृपा दाखविल्याने अनेक अधिकारी-कर्मचाऱ्यांना बाहेरच पडता आले नाही. त्यामुळ‌े अखेर या १५ टक्के उपस्थिती राहीलेल्या बहुतांष अधिकारी-कर्मचाऱ्यांना रात्री मंत्रालयातच मुक्काम ठोकावा लागला. काही महिन्यापूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे तिन्ही मार्गावरच्या उपनगरीय रेल्वे …

Read More »