Breaking News

Tag Archives: cm uddhav thackeray

अनुसूचित जाती-जमातीच्या शासकिय कर्मचाऱ्यांची माहिती २ दिवसात सादर करा सामान्य प्रशासन विभागाचे सर्व विभागांना आदेश

मुंबई: प्रतिनिधी राज्य सरकारच्या सेवेत असलेल्या अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील नागरिकांना देण्यात येत असलेल्या पदोन्नती विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रलंबित आहे. त्याची पुढील सुणावनी लवकरच होणार असल्याने सध्या शासकिय विभागात कार्यरत असलेल्या या दोन्ही प्रवर्गासाठीची मंजूर पदे, कार्यरत पदे आणि रिक्त पदांची माहिती दोन दिवसात अर्थात २० ऑगस्ट पर्यत सामान्य प्रशासन …

Read More »

देशाचा मृत्यूदर १.९२ टक्के, तर मुंबईचा मृत्यूदर ऑगस्टमध्ये ५.४० टक्के मुंबईत संसर्गाचे प्रमाणही १९.७२ टक्के, चाचण्या वाढविण्याची विरोधी पक्षनेते फडणवीसांची मागणी

मुंबई: प्रतिनिधी देशाचा मृत्यूदर १.९२ टक्क्यांवर आहे. मात्र, मुंबईतील ऑगस्टमधील १७ दिवसांत मुंबईचा मृत्यूदर ५.४० टक्क्यांवर गेला आहे. मुंबईत चाचण्या वाढविण्याची नितांत गरज आहे. ही मागणी करणारे आणखी एक पत्र  विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना नुकतेच पाठविले. सातत्याने आग्रह करून सुद्धा मुंबईत चाचण्यांची संख्या मर्यादित ठेवण्याचे कारण आता कळेनासे झाले …

Read More »

कॅप्टन अमोल यादव यांच्या विमान प्रकल्पास राज्य सरकार देणार जमिन उद्योग मंत्री सुभाष देसाई यांची ग्वाही

मुंबई : प्रतिनिधी कॅप्टन अमोल यादव यांनी भारतीय बनावटीचे विमान तयार केले आहे. त्यांच्या पुढील प्रकल्पासाठी महाराष्ट्र शासनाच्यावतीने सर्व प्रकारचे सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज येथे दिली. कॅप्टन अमोल यादव यांनी मोठ्या कष्टाने भारतीय बनावटीचे विमान तयार केले आहे. त्यांचे प्रात्यक्षिकदेखील यशस्वी झाले आहे. यापुढे …

Read More »

मुख्यमंत्री ठाकरे यांनी मंत्री अशोक चव्हाणांवर सोपविली ही जबाबदारी मराठा समाजाच्या इतर मागण्यांबाबत तोडगा चव्हाण काढणार

मुंबई: प्रतिनिधी मराठा समाजाच्या विविध मागण्यांच्या पाठपुराव्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीकडे सोपवण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. मुख्यमंत्र्यांच्या निर्णयानुसार मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात संबंधित विभागाचे मंत्री व सचिवांची बैठक घेऊन शासनाला प्रस्ताव सादर करण्याची जबाबदारी अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील उपसमितीकडेच सोपवण्यात …

Read More »

आढावा बैठकीत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांनी दिल्या या सूचना कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही याची दक्षता घेत साधेपणाने गणेशोत्सव साजरा करावा

मुंबई : प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येणारा गणेशोत्सव हा सामाजिक भान राखत शांततेने साजरा करावा. याकाळात गर्दी होणार नाही, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही याची दक्षता घ्यावी असे आवाहन करतानाच कोरोना युद्धाच्या मध्यावर आपण काही ठिकाणी शिखराकडे गेलो तर काही ठिकाणी जात आहोत, त्यामुळे गाफील न राहाता आतापर्यंत ज्या उपाययोजना सुरू आहेत …

Read More »

पावसाळी अधिवेशन १४ दिवस चालणार विधिमंडळाकडून तात्पुरती कामकाज पत्रिका तयार

मुंबई : प्रतिनिधी कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मागील दोन महिन्यापासून सतत पावसाळी अधिवेशनाची तारीख पुढे ढकलण्यात येत होती. मात्र विधिमंडळ प्रशासनाने सध्या निश्चित करण्यात आलेल्या पावसाळी अधिवेशनाच्या ७ सप्टेंबर २०२० पासूनच्या तात्पुरती कामकाजाची पत्रिका तयार केली असून व अधिवेशनाचे कामकाज प्रत्यक्ष १० दिवसाचे चालणार आहे. तर एकूण १४ दिवस कामकाजाचा कालावधी …

Read More »

बदल्यांची सीआयडी चौकशी करा अन्यथा न्यायालयात दाद मागणार भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा इशारा

मुंबई : प्रतिनिधी कोरोना महामारीमुळे राज्य गंभीर संकटात असूनही बदल्यांना परवानगी देताना राज्य सरकारने मनमानीपणे आपलेच धोरण बदलले, कोरोनाच्या उपाययोजनात सातत्य न राहिल्याने जनतेचे जीवित संकटात आले, बदली कायद्याचा भंग झाला, राज्याचे आर्थिक नुकसान झाले व बदल्यांचा बाजार मांडून मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार झाले आहेत. बदल्यांच्या सीआयडी चौकशीचा आदेश द्यावा, …

Read More »

एस.ए.तागडे सामाजिक न्यायचे प्रधान सचिव तर डॉ. देशमुख पुणे जिल्हाधिकारी अन्य ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील सहा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून राज्याच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या प्रधान सचिव पदी एस.ए.तागडे यांची नियुक्ती करण्यात आली. तर हाफकिन औषध निर्माण महामंडळाचे व्यवस्थापकिस संचालक डॉ.राजेश देशमुख यांची पुण्याच्या जिल्हाधिकारी पदी नियुक्ती राज्य सरकारकडून करण्यात आली. सनदी अधिकारी पराग जैन यांची नियुक्ती सचिव …

Read More »

जय जवान, जय किसान, जय कामगार आपल्या राज्याचे ध्येय राहणार शेतकऱ्यांना स्वतःच्या पायावर उभे करणार , कामगारांचे हित जोपासणार असल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही

मुंबई : प्रतिनिधी आरोग्य या विषयाकडे  प्राधान्याने लक्ष दिले जाणार असून राज्यातील खेड्यापाड्यांमध्ये तसेच दुर्गम भागात उत्तम दर्जाच्या आरोग्य सुविधा आणि वैद्यकीय सुविधा पोहोचण्यास शासनाचे सर्वोच्च प्राधान्य असेल असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. भारतीय स्वातंत्र्याच्या ७३ व्या वर्धापन दिनानिमित्त आज मंत्रालयात झालेल्या मुख्य शासकीय समारंभात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण …

Read More »

खुशखबर: एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी एसटी सुरु होणार कोचिंग क्लास आणि स्पर्धा परिक्षा केंद्रांबाबतही पुढील आठवड्यात निर्णयाची शक्यता- विजय वडेट्टीवार

मुंबई: प्रतिनिधी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी आंतरजिल्हा एसटी प्रवासावर घालण्यात आलेली बंदी पुढील आठवड्यात उठविण्याची शक्यता आहे. त्यामुळे मागील चार-पाच महिने इच्छा असूनही एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाता आले नाही अशांना आता दिलासा मिळणार असून याबाबत पुढील आठवड्यात निर्णय होणार असल्याची माहिती राज्याचे मदत व पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी …

Read More »