Breaking News

Tag Archives: chief minister

विजय वडेट्टीवार यांनी पत्राद्वारे दिला मुख्यमंत्र्यांना इशारा, …अशी पळवाट सरकारने

वैधानिक विकास महामंडळामुळे विदर्भ, मराठवाडा आणि इतर मागास भागाला हक्काचा निधी मिळत होता. आता वैधानिक विकास महामंडळ अस्तित्वात नाही, तज्ञ, अभ्यासक यांच्या नियुक्त्या नाहीत, त्यामुळे अनुशेषाचा अहवालच सादर होत नाही. वैधानिक विकास महामंडळ नसल्यामुळे आज अनुशेषाचे मोजमाप करता येत नाही. सरकारने अनुशेष नाही अशी पळवाट न काढता तात्काळ विदर्भ व …

Read More »

“शासन आपल्या दारी” म्हणणाऱ्या मुख्यमंत्री शिंदेंना “शेतकरीपुत्राचे रक्तपत्र”

आमचा शेतकरी बाप रात्रं-दिवस शेतात राबतो. दिवसा वीज नसल्याने रात्री साप, विंचूंना न घाबरता पिकांना पाणी देण्यासाठी रात्रभर शेतात जागतो. इतके करूनही अतिवृष्टीने हातातोंडाशी आलेला घास हिरावला. कापूस, सोयाबीनचा बाजारातील भाव कोसळले. आर्थिक अडचण वाढल्याने आत्महत्येशिवाय पर्याय नाही. ही व्यथा आहे यवतमाळ जिल्ह्याच्या वाईरूई येथील कुणाल जतकर या शेतकरी पुत्राची. …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांची स्पष्टोक्ती, दावोसमधून १ लाख ३७ हजार पैकी ७६ टक्के…

दावोस येथे होणाऱ्या जागतिक आर्थिक परिषदेत (वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम) महाराष्ट्रासाठी मोठ्या गुंतवणूक संधी उपलब्ध होणार आहेत. त्यासाठी महाराष्ट्रात येऊ इच्छिणाऱ्या जगभरातील उद्योगांशी उत्तम संपर्क, समन्वय राखा. परिषदेत ‘मॅग्नेटिक महाराष्ट्राचे’ प्रभावी ब्रॅण्डिंग करा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. स्वित्झर्लंडमध्ये दावोस येथे १५ ते १९ जानेवारी या कालावधीत …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा, ‘स्मार्ट पीएचसी’ चा सातारा पॅटर्न राज्यभर राबविणार

राज्यातील सर्वसामान्य जनतेला दर्जेदार आरोग्य सुविधा देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असून सातारा जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे सुसज्ज करण्यासाठी सुरू करण्यात आलेला ‘स्मार्ट पीएचसी’चा सातारा पॅटर्न राज्यभर राबविण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते जिल्ह्यातील ४९ स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्रांचा (स्मार्ट पीएचसी) व अन्य उपक्रमांचा …

Read More »

मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले “हे” आदेश

राज्य मागासवर्ग आयोगामार्फत मराठा आरक्षणासंदर्भात करण्यात येणाऱ्या सर्व्हेक्षणास प्राधान्य द्यावे तसेच हे काम बिनचूकरित्या आणि कालबद्ध पद्धतीने पूर्ण झाले पाहिजे हे पाहण्याचे स्पष्ट निर्देश आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि पालिका आयुक्तांना बैठकीत दिले. मराठा आरक्षणासंदर्भात आज मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथिगृह येथे झालेल्या मराठा आरक्षण व सुविधा …

Read More »

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी कीर्तन-प्रवचनाच्या माध्यमातून प्रबोधनाचे कार्य

शासनाने शेतकऱ्यांसाठी बनविलेल्या टास्क फोर्सचे पुनर्गठन लवकरच केले जाणार आहे. विविध संत-महात्मे या राज्यात समाज प्रबोधनाचे काम करतात. राज्यातील ज्या भागात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण जास्त आहे, त्या भागात आपले प्रबोधनाचे कार्य कीर्तन-प्रवचनाच्या माध्यमातून व्हावे. शेतकऱ्यांच्या मनात सकारात्मक विचार यावेत, त्यांच्यात विचार परिवर्तन व्हावे, यासाठी आपण प्रयत्न करावेत, यासाठी शासन सर्वतोपरी …

Read More »

नाशिकला १२ जानेवारीपासून राष्ट्रीय युवा महोत्सव; पंतप्रधानाच्या हस्ते उद्घाटन

राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी नाशिकची निवड झाल्याने महाराष्ट्राला संधी मिळाली आहे. त्याच्या आयोजनात कुठलीही कमतरता भासू देऊ नका. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणारा हा महोत्सव यशस्वी करा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. राज्यभरातील युवकांनी यात सहभागी होण्याचे आवाहनही यावेळी मुख्यमंत्र्यांनी केले. सह्याद्री अतिथीगृह येथे राष्ट्रीय …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा, स्वच्छ माझा महाराष्ट्र अभियान राज्यभरः पण दिवा येथे कधी ?

मागील काही महिन्यांपासून राज्यातील वाढते प्रदुषण आणि शहरातील घाणीच्या प्रश्नी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेत मुंबईतील अनेक भागात सकाळपासून प्रदुषण रोखण्यासाठी आणि स्वच्छ मुंबईसाठी रस्त्यावर उतरले आहेत. मात्र ठाणे शहराचा भाग असलेल्या दिवा शहरात मुख्यमंत्री शिंदे हे कधी स्वच्छता मोहीम राबविणार असा सवाल दिवा येथील रहिवाशांकडून उपस्थित करण्यात येत …

Read More »

डॉ अमोल कोल्हे यांचा हल्लाबोल, सरकार मध्ये एक फूल, दोन डाउनफूल…

मागील काही दिवसांपासून केंद्रातील भाजपा सरकार मोठमोठ्या उद्योगपतींचे कर्ज माफ करत आहे. तर सातत्याने दुष्काळी परिस्थिती आणि सततच्या हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. याप्रश्नावरून शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी हल्लाबोल केला. राज्यातील शेतकरी आणि महिला, बेरोजगारी या मुद्यावर आयोजित राष्ट्रवादीचे खासदार …

Read More »

नव्या वर्षात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद कोणाकडेः मध्यावधी निवडणूकांचे स्पष्ट संकेत

२०१४ मध्ये लोकसभेचा पाच वर्षाचा कालावधी पूर्ण होत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मार्च आणि एप्रिल महिन्यात निवडणूक तारखांची घोषणा करण्याची तयारी सुरु केली. तसेच काहीही करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवायचे असा चंग भाजपाने आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बांधला आहे. परंतु महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्येही …

Read More »