Breaking News

Tag Archives: bjp

जितेंद्र आव्हाड, आमची लढाई ही लोकशाही टिकवण्यासाठी शरद पवार साहेबांचाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खरा

लोकशाही विरोधात असलेल्या विचारधारे विरोधात लढल्याशिवाय लोकशाही टिकणार नाही. आमची ही लढाई लोकशाही टिकवण्यासाठी आहे असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना म्हटले आहे. जितेंद्र आव्हाड पुढे म्हणाले की भाजपा लोकशाही उध्वस्त करण्याच काम करत आहे. विचार धारे विरोधात लढावं लागतं कारण त्याशिवाय लोकशाही …

Read More »

सर्वोच्च न्यायालयः शिंदे-ठाकरे प्रकऱणी विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांना नोटीस दोन आठवड्यात उत्तर देण्याचे न्यायालयाचे निर्देश

साधारणतः दोन महिन्यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सविस्तर निकाल देताना विधानसभा अध्यक्षांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ जणांच्या अपात्रतेवर विहीत कालावधीत निर्णय घ्यावा असे आदेश दिले होते. परंतु दोन महिने झाले तरी त्यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले नसल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाकडून करत त्यासंदर्भात …

Read More »

सत्तेच्या साठमारीत मुंबईतली ‘धारावी’ अदानी प्रॉपर्टीजची शिंदे-फडणवीस-पवार सरकारकडून काल रात्री उशीरा शासन निर्णय जारी

राज्यात एकाबाजूला आगामी निवडणूकीच्यादृष्टीने महाराष्ट्रातील विरोधकांमध्ये फूट पाडून स्वतःची सत्ता मजबूत करू पाहणाऱ्या भाजपा प्रणित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मदतीने मजबूत कऱण्याच्या प्रयत्नात असलेल्या राजकिय ड्रामेबाजीच्या गदारोळात मुंबईतील महत्वकांक्षी असलेल्या धारावी झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प अखेर दुबईच्या सेखलिंक कंपनीऐवजी पंतप्रधान नरेंद्र …

Read More »

देवेंद्र फडणवीस म्हणाले, अमित शाह यांनी सांगितले अपमान सहन कर पण… पोहरा देवीची खोटी शपथ उद्धव ठाकरे यांनी घेतली

उद्धव ठाकरेंनी नुकताच विदर्भाच्या दौऱ्याची सुरुवात करताना पोहरा देवीचं दर्शन घेतलं. त्यावेळी त्यांनी भाषण करताना सांगितलं की, पोहरा देवीची शपथ घेऊन सांगतो भाजपाने फसवलं. त्यावर आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना उत्तर देताना म्हणाले, उद्धव ठाकरेंनी पोहरा देवीची खोटी शपथ घेतली असेल आणि नंतर माफी मागितली असेल असं म्हणत २०१९ …

Read More »

अंबादास दानवे यांची भन्नाट मागणी, ‘अर्थ’ शिंदेंना द्या! पवारांना `मुख्य` करा रखडलेल्या खाते वाटपावर आणि मंत्रिमंडळ विस्तारावर भाजपाला सल्ला

राज्याच्या तिजोरीच्या चाव्या आपल्याकडेच असाव्या यासाठी अर्थ खात्यावरून चाललेला गोंधळ पाहता अजित पवार यांना मुख्यमंत्री करा, एकनाथ शिंदे यांच्याकडे अर्थखाते द्या आणि हा तिढा सोडवा, असा खोचक सल्ला ठाकरे गटाचे नेते विधान परिषद विरोधी पक्षनेते तथा ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी शिंदे-फडणवीस सरकारला दिला. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार मागच्या वर्षभरापासून …

Read More »

अजित पवारांच्या बंडानंतरही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, भाजपातील मोठ्या पक्षप्रवेशासाठी योजना तयार भाजपा आणि महायुती लोकसभेच्या ४५, विधानसभेच्या २०० पेक्षा अधिक जागा जिंकेल

भारतीय जनता पार्टी आणि महायुती लोकसभेच्या ४५ पेक्षा अधिक आणि विधानसभेच्या २०० पेक्षा अधिक जागा जिंकेल असा विश्वास भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी व्यक्त केला. भिवंडी (जि.ठाणे) येथे प्रदेश भाजपातर्फे आयोजित महाविजय २४ कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत बावनकुळे बोलत होते. प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी, …

Read More »

…राष्ट्रपती राजवट लागू करा, नाना पटोले यांनी केली मागणी राज्यात अलिबाबा ४० चोरांसारखी परिस्थिती, जनता उपाशी सरकार मात्र तुपाशी

राज्यातील राजकीय वातावरण गढूळ झाले असून भाजपाच्या सत्तापिपासू वृत्तीने राज्यात शासन व प्रशासनही ठप्प आहे. जनतेला वाऱ्यावर सोडून देऊन मलाईदार खात्यासाठी साठमारी सुरु आहे. राज्यात अलिबाबा ४० चोरांसारखी परिस्थिती असून जनतेची तिजोरी लुटली जात आहे. राज्यपाल व महामहिम राष्ट्रपती यांनी यात हस्तक्षेप करुन राज्यात तातडीने राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी …

Read More »

जयंत पाटील यांची टीका, नव्या सहकाऱ्यांसोबत सत्ताधाऱ्यांचे अद्याप एकमत नाही प्रशासन ठप्प झाले आहे, लवकर निर्णय घ्या, राज्याचा कारभार सुरू करा

शपथविधी झाल्यानंतर त्याच दिवशी खाते वाटप होतात, असा आतापर्यंतचा प्रघात आहे. मात्र अद्यापही सत्तेत आलेल्या नव्या सहकाऱ्यांचा खातेवाटप झालेला नाही. त्यामुळे नव्या सहकाऱ्यांसोबत सत्ताधाऱ्यांचे अद्याप एकमत नाही असे दिसते अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सत्ताधाऱ्यांवर केली. राज्यात अभूतपूर्व राजकीय नाट्यानंतर अद्यापही राज्याचा प्रशासकीय कारभार सुरळीतपणे सुरू …

Read More »

नाना पटोले यांचा इशारा, भ्रष्ट भाजपाचा राज्यभर भांडाफोड… मणिपूर, ब्रिजभूषण शरण सिंह व अदानीवरील मौन देशासाठी घातक :- बाळासाहेब थोरात

राहुल गांधी यांच्यावर लावण्यात आलेले आरोप खोटे व चुकीचे आहेत, त्यापाठीमागे भाजपाचा हात आहे हे सर्वांना माहित आहे. राहुल गांधी यांनी कोणताही गंभीर स्वरुपाचा गुन्हा केलेला नसताना केवळ राजकीय द्वेषातून त्यांच्यावर कारवाई करत खासदारकी रद्द केली व त्यांना बेघर करण्यात आले. जनतेची भावना संसदेत मांडणाऱ्या निरपराध राहुल गांधी यांच्यावरील अन्यायाविरोधात …

Read More »

दस्तुरखुद्द मंत्री आणि सीएमओ कार्यालयातील अधिकाऱ्यांकडून एकच शोधः “काही निरोप” घोषणा करणारा मंत्रीच लागलाय यादी-आदेशाची शोधाशोध

राष्ट्रवादीच्या अजित पवार यांच्यासह ९ जणांच्या शपथविधी वेळी जितकी गुप्तता बाळगली गेली, तितकीच गुप्तता नव्या मंत्र्यांच्या खाते वाटपाबाबत आणि चवथ्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पाळत आहेत. त्यामुळे नव्या मंत्र्यांना कोणती खाती मिळणार, चवथा मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार कोणाची नावे यादीत आदी गोष्टींची विचारपूस सत्ताधारी शिंदे-भाजपा …

Read More »