Breaking News

Tag Archives: arvind sawant

अरविंद सावंत म्हणाले, खरी शिवसेना कुणाला पाहायचंय, त्यांना ते कळेल… पोलिसांकडून शिवसैनिकांना अटक व सुटका, सदा सरवणकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल

गणेश विसर्जनाच्या दिवशी शिवसेना आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रभादेवी येथे राडा झाला. पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर हे प्रकरण शांत झालं. मात्र, दुसऱ्या दिवशी अर्थात शनिवारी शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी गोळीबार केल्याचा आरोप शिवसेना आमदार सुनील शिंदेंनी केला. त्यामुळे सरवणकर विरुद्ध शिंदे असा हा सामना सुरू असतानाच पोलिसांनी शिवसेना कार्यकर्त्यांवर …

Read More »

अरविंद सावंत यांचा सवाल, आता यांना पान्हा फुटला, मृतदेह देताना कुठे गेला होता? देवेंद्र फडणवीस यांच्यावर साधला निशाणा

मुंबईत १९९३ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटातील दोषी याकूब मेमनच्या कबरीला सुशोभित केल्याचं समोर आलं होते. त्यावरून भाजपाचे नेते सातत्याने शिवसेना पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला जात आहे. त्याला आता शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. तसेच, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना याकूबची शवयात्रा काढून का दिली, असा सवाल …

Read More »

महाराजांच्या लढाईच्या किस्स्यातून उध्दव ठाकरे यांनी सांगितले भास्कर जाधव यांच्या बढतीचे कारण अरविंद सावंत, भास्कर जाधव यांना नेते पदावर बढती

शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आमदार आणि खासदारांचा एक मोठा गट फुटून बाहेर पडला. त्यामुळे महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं आणि राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार अस्तित्वात आलं. एकीकडे शिंदे गट आणि भाजपाचं सरकार सत्तेत आल्यामुळे शिवसेना बॅकफूटवर गेल्याचं चित्र निर्माण झालेलं असताना …

Read More »

अमित शाह यांच्या आरोपाला अरविंद सावंतांचे प्रत्युत्तर, उपकाराची जाणीव ठेवा उध्दव ठाकरे आणि शिवसेनेवरील टीकेला दिले उत्तर

सध्या मुंबई दौऱ्यावर असलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उध्दव ठाकरे यांनी आपल्याला धोका दिल्याचा आरोप करत निवडणूकी आधी मोदी आणि फडणवीस यांच्या नावावर मते मागितली. निकाल हाती आल्यानंतर मात्र त्यांनी विश्वासघात केल्याचाही आरोप केला. तसेच मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाचं लक्ष्य १५० जागा जिंकण्याचं असेल, अशी घोषणा केली. तसेच …

Read More »

उध्दव ठाकरे म्हणाले, आता खरा भगवा कोणता? दाखवायची वेळ आलीय शिवडी येथील शाखेच्या उद्घाटनप्रसंगी केले सूचक वक्तव्य

सत्तास्थानी असताना शिवसेनेतील फुटीनंतर एकाबाजूला पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी मातोश्रीवर बैठकांचा सपाटा लावला आहे. तर दुसऱ्याबाजूला आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्याकडून राज्यातील विविध भागात जात महाराष्ट्राचा दौरा सुरु केला आहे. त्यामुळे आगामी काळात शिवसेना कोणाची याचे आणि स्थानिक पातळीवरील शिवसैनिक कोणासोबत याबाबत उत्सुकता निर्माण झाली असताना शिवसेना पक्षप्रमुख उध्दव …

Read More »

शिवसेना खासदार-आमदार म्हणाले मुख्यमंत्रीजी “हा कायदा आपल्या राज्यात नको” केंद्राचा आदर्श भाडेकरू कायदा राज्यात नको

मुंबई: प्रतिनिधी भाडेकरू नियंत्रण कायदा हा राज्य सरकारच्या अखत्यारीत असताना केंद्र सरकारने त्यात हस्तक्षेप करण्याची गरज नव्हती. तसेच केंद्र सरकारचा हा भाडेकरू कायदा राज्यात लागू केला तर २५ लाखाहून अधिक नागरीक रस्त्यावर येतील अशी भीती शिवसेनेच्या आमदारांनी व्यक्त करत हा कायदा राज्यात लागू करू नका अशी मागणी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे …

Read More »

अखेर अरविंद सावंतांच्या रूपाने शिवसेना एनडीएतून बाहेर भाजपाआधीच शिवसेनेकडून युती तुटल्याची अधिकृत घोषणा

नवी दिल्लीः प्रतिनिधी राज्यातील सत्ता स्थापनेसाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून घडामोडींना मोठा वेग आला आहे. त्यामुळे एनडीए अर्थात राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा घटक पक्ष म्हणून मोदी सरकारमध्ये सहभागी असलेल्या शिवसेनेचे अवजड उद्योग मंत्री अरविंद सावंत यांनी आज राजीनामा दिला. विशेष म्हणजे भाजपाने युतीसंदर्भात भूमिका जाहीर करण्यासाठी शिवसेनेला संध्याकाळी ७.३० वाजेपर्यंतची …

Read More »

शिवसेना-भाजपाच्या प्रचारातून केंद्रीय मंत्री अरविंद सावंत गायब? दक्षिण मुंबईतील सेना-भाजपाच्या उमेदवारांच्या जाहीरात फलकात फोटो दिसेना

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील विधानसभेच्या निवडणूकांची रणधुमाळी सुरू आहे. या रणधुमाळीत शिवसेनेचे दक्षिण मुंबईचे खासदार आणि केंद्रीय मंत्री अरविंद सावंत हे शिवसेना-भाजपा उमेदवारांच्या प्रचारातून गायब झाले आहेत. तसेच युतीच्या उमेदवारांच्या कोणत्याच फलक आणि जाहीरातीमध्ये त्यांचा फोटो वापरला जात नसल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. केंद्रात भाजपा आणि शिवसेनेचे सरकार आहे. तसेच …

Read More »

सेनेच्या वाट्याला अवजड, तर दानवे, धोत्रे, आठवले राज्यमंत्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून खाते वाटप जाहीर

नवी दिल्लीः प्रतिनिधी केंद्रात नव्याने स्थानापन्न झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्याचे खाते वाटप आज दुपारी जाहीर करण्यात आले. केंद्रीय मंत्रिमंडळात नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या शिवसेनेच्या वाट्याला अवजड उद्योग विभाग देण्यात आला आहे. तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, संजय धोत्रे यांना राज्यमंत्री पद बहाल करत रामदास आठवले यांना पुन्हा …

Read More »

उस्मानाबाद वगळता शिवसेनेकडून विद्यमान १७ खासदारांना संधी पहिली यादी जाहीर

मुंबईः प्रतिनिधी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येत होती. मात्र शिवसेनेकडून कोणतीच यादी जाहीर होत नसल्याने शिवसेनेचे उमेदवार जाहीर तरी होणार कधी असा सवाल उपस्थित होत होता. अखेर आज शुक्रवारी शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी पत्रकार परिषद घेत २१ जागांवरील उमेदवारांची यादी जाहीर करण्यात …

Read More »