Breaking News

Tag Archives: राज्य सरकार

सुनिल तटकरे यांचे आवाहन, मराठा समाजातील तरुणांनो…सहकार्य करा राज्य सरकारने दिलेले आरक्षण टिकले पाहिजे, कायद्याचा आधार असला पाहिजे

सकल मराठा समाजाने शांततेच्या मार्गाने अनेक मोर्चे काढले. त्यावेळी कुठे गालबोट लागले नाही मात्र आज जे काही घडत आहे ते दुर्दैवी आहे. सरकारने आरक्षण मिळावे यासाठी पाऊले टाकली आहेत, आरक्षणासाठी राज्य सरकार सकारात्मक आहे. त्यामुळे मराठा समाजातील तरुणांनो राज्य सरकारने दिलेले आरक्षण टिकले पाहिजे, कायद्याचा आधार असला पाहिजे त्यासाठी सहकार्य …

Read More »

मनोज जरांगे पाटील यांची सरकारवर टीका, आम्हाला येडे समजता का?….. २५ तारखेपासून पाणी, अन्न आणि औषधे न घेता कडक आमरण उपोषण करणार

मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी १७ दिवस उपोषण केले. त्यानंतर मराठावाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यामध्ये दौरा केले. त्यानंतर आज आंतरावली सराटी येथे आयोजित मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांशी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, सरकारने आम्हाला एक महिना मागितला आम्ही ४० दिवस दिले. त्याची मुदत उद्या २४ तारखेला संपत आहे. …

Read More »

सूतगिरण्यांच्या कर्जाचे व्याज राज्य सरकार भरणार राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

राज्यातील सूतगिरण्या सुरळीतपणे चालविण्यासाठी पुढील पाच वर्षे कर्जावरील व्याज शासनाने भरण्याची योजना सुरु ठेवण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. विशेष म्हणजे भाजपाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री पदी असताना दिवाळखोरीत आणि तोट्यात चालणाऱ्या सूत गिरण्याच्या नव्या कर्जाला व जून्या कर्जाला कोणत्याही …

Read More »

आदित्य ठाकरे यांचा आरोप, मेट्रो ६, ३ आणि ४ चा इंटिग्रेटेड कार डेपोमध्ये जमीन घोटाळा या घोटाळयांची कॅग,लोकायुक्तकडे करणार तक्रार

महाराष्ट्रातील मिंधे-भाजपाच्या बेकायदेशीर राजवटीतील मेट्रो कांजूर जमीन घोटाळा आणि रस्ते घोटाळयांला मुबंई महापालिकेन स्थगिती दिलीय असे शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी सांगत सत्याचा विजय झालाय असून जे आम्ही बोलत होतो ते आज उघड झाल्याचा दावाही आदित्य ठाकरे यांनी केला. आदित्य ठाकरे पुढे बोलताना म्हणाले, कांजुरमार्गला मेट्रो ६ चा …

Read More »

नाना पटोले यांची टीका, राज्यातील भाजपाप्रणित सरकार गुजरातच्या आऊट सोर्सिंगवर पोलिसांची कंत्राटी भरती करून तरुणांच्या भविष्याचा आणि सुरक्षेचा खेळखंडोबा करु नका

राज्यातील भाजपाप्रणित शिंदे सरकारने तरुणांच्या सरकारी नोकरीच्या स्वप्नावर पाणी फेरले असून कंत्राटी पद्धतीने पोलीस भरती सुरु करुन आरक्षणवरही घाव घातला आहे. सरकारचा हा निर्णय अत्यंत घातक व सुरक्षेच्यादृष्टीने गंभीर आहे. राज्यातील भाजपाप्रणित सरकार गुजरातच्या आऊट सोर्सिंगवर चालत आहे पण पोलीस भरती कंत्राटी पद्धतीने करुन तरुणांसोबतच महाराष्ट्राच्या सुरक्षेचा खेळखंडोबा करु नका, …

Read More »

नाना पटोले यांची तंबी, …. जिल्हा परिषदेच्या शाळा बंद कराल तर याद राखा काटकसरीसाठी शाळा बंद करण्यापेक्षा सरकारने स्वतःची उधळपट्टी बंद करा

कमी पटसंख्येच्या नावाखाली जिल्हा परिषद शाळा बंद करण्याच्या हालचाली मनुवादी भाजपा सरकारने सुरु केल्या आहेत. शिक्षण हक्क कायद्यानुसार मुलांना घरापासून जवळ शिक्षण उपलब्ध करुन देणे हे सरकारचे कर्तव्य आहे परंतु २० किलोमीटरच्या परिसरातील जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करुन एकच शाळा सुरु ठेवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. सरकारचा हा निर्णय बहुजन समाजातील …

Read More »

राज्य सरकार बदलताच सरकारच्या प्रशासनाची भावनाही बदलली का? मंत्रालयातील अधिकाऱ्यांकडून माहिती अधिकार कायद्याखालील माहिती देण्यास टाळाटाळ

राज्यात तीन पक्षांचे असलेली महाविकास आघाडी सरकार जावून पुन्हा दुसऱ्या तीन पक्षांचे महाशक्तीच्या पाठिंब्याचे अर्थात महायुतीचे सरकार राज्यात स्थानापन्न झाले. मात्र हे सरकार स्थानापन्न होऊन राज्य सरकारच्या अखत्यारीत असलेल्या विभागात गेलास अनेक अधिकाऱ्यांकडून वेगवेगळी उत्तरे देण्यात येत असून माहिती अधिकार कायद्याखाली अर्ज देऊनही त्यास साधे उत्तर देण्याचे सौजन्यही त्या त्या …

Read More »

हेक्टरी या दरानुसार अवकाळी नुकसानग्रस्त २६ लाख ९० हजार शेतकऱ्यांना मिळणार भरपाई

गेल्या वर्षी सन २०२२ मधील पावसाळी हंगामात अतिवृष्टीच्या निकषाबाहेरील अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीकरिता सुमारे १५.९६ लाख हेक्टर बाधित क्षेत्रातील २६ लाख ५० हजार ९५१ शेतकऱ्यांना १५०० कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय १३ जून २०२३ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला होता, हा निधी वितरित करण्यात येणार आहे. शेतपिकांच्या नुकसानीकरिता …

Read More »

तूर, उडीद डाळींच्या साठामर्यादा आदेशाचे उल्लंघन केल्यास आता राज्य सरकार कारवाई करणार किंमती वाढविल्या तर थेट कारवाई करा

तूर आणि उडीद डाळींच्या किमतीवर सातत्याने लक्ष ठेवण्याचे, साठ्याच्या स्थितीची पडताळणी करण्याचे आणि साठामर्यादा आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्याचे निर्देश, ग्राहक व्यवहार विभागाच्या अतिरिक्त सचिव निधी खरे यांनी राज्यांना दिले. तूर आणि उडीद डाळींचा साठा जाहीर करण्यासंदर्भात आणि राज्य सरकारांकडून साठा मर्यादेच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी राज्यांचे अन्न आणि नागरी …

Read More »

आर्थिक साक्षरता, सायबर संरक्षणबाबत राज्य शासनाचा त्रिपक्षीय करार मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत करार

गुंतवणुकदारांची गुंतवणूक सुरक्षित राहण्यासाठी काय खबरदारी घ्यावी, सायबर गुन्ह्यांपासून संरक्षण कसे करावे, याबाबत राज्यात विशेष अभियान राबविण्यात येणार आहे. यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभाग, नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि मनी बी प्रा. लि. यांच्यात आज त्रिपक्षीय सामंजस्य करार करण्यात आला आहे. सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, …

Read More »