Breaking News

आदित्य ठाकरे यांचा आरोप, मेट्रो ६, ३ आणि ४ चा इंटिग्रेटेड कार डेपोमध्ये जमीन घोटाळा या घोटाळयांची कॅग,लोकायुक्तकडे करणार तक्रार

महाराष्ट्रातील मिंधे-भाजपाच्या बेकायदेशीर राजवटीतील मेट्रो कांजूर जमीन घोटाळा आणि रस्ते घोटाळयांला मुबंई महापालिकेन स्थगिती दिलीय असे शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी सांगत सत्याचा विजय झालाय असून जे आम्ही बोलत होतो ते आज उघड झाल्याचा दावाही आदित्य ठाकरे यांनी केला.

आदित्य ठाकरे पुढे बोलताना म्हणाले, कांजुरमार्गला मेट्रो ६ चा कारडेपो करणार आहेत. आमचे सरकार असताना आम्ही मेट्रो ६ मेट्रो ३ आणि ४ चा इंटिग्रेटेड कार डेपो करणार होतो. मात्र खोके सरकारने मेट्रो ३ चा कारडेपो आरे मध्ये नेला. यामध्ये आमचा कुठलाही इगो नव्हता. आपण ४ डेपो एकत्र केले असते तर ४ जागा वेगळ्या कराव्या लागल्या नसत्या. १० हजार कोटी यामध्ये वाचले असते. इंटिग्रेटेड कारडेपो करत असताना पैसे वाचले असते. घटनाबाह्य मुख्यमंत्री दबावाखाली काम करत आहेत असा आरोप करत कॉन्ट्रॅक्ट देण्याचा काम फक्त सरकार करत आहे असा आरोप केला.

पुढे बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, आम्ही जेव्हा म्हणालो की कांजूरमार्गची जागा राज्य सरकारची आहे. तर केंद्र सरकार या विरोधात कोर्टात गेले. राधाकृष्ण विखे-पाटील यांनी उत्तर दिले की, कांजुर मार्ग ची जागा राज्य सरकारची आहे. अधिवेशनात उत्तर दिल्याचे सांगितले.

तसेच आदित्य ठाकरे म्हणाले की, आम्ही जे काम करणार होतो ते योग्य होतं. इंटिग्रेटेड कारडेपो करणे हे योग्य होत. आमची मागणी आहे. कांजूरमार्गची जागा मेट्रो ६ ला जर घेत असाल तर मेट्रो ४ आणि मेट्रो १४ लाइन साठी येथेच कारडेपो करा जेणेकरून पैस कमी लागतील. कॉन्ट्रॅक्टर कमी लागतील अशी सूचनाही केली.

आदित्य ठाकरे पुढे बोलताना म्हणाले, दुसरा विषय रस्त्याच्या काँट्रॅक्टचा, जानेवारी मध्ये भूमिपूजन केलं. त्याच पुढे काय झालं. रोडची काम कधी करता असा सवाल राज्य सरकारला करत १ ऑक्टोबर ते ३० जून या मध्ये काम केलं जातं. आज बातम्या बघा ! अजूनही एकही रस्त्याची काम सुरू केली नाहीत. मुख्यमंत्र्यांच्या मर्जीतली हे कंत्राटदार आहेत. १५ दिवसात उत्तर देण्याची नोटीस दिली आहे की आम्ही तुमचा कॉन्ट्रॅक्ट रद्द का करू नये ? हा घोटाळा आहे, मुख्यमंत्री यांना काम करता येत नाहीये असा आरोपही यावेळी केला.

अधिकाऱ्यांनी सांगितले की या काँट्रॅक्टरला पावसाळ्यात नोटीस देणार होतो पण कोणाच्या तरी नातेवाईकामुळे कारवाई झाली नव्हती. आता १ ऑक्टोबर होऊन गेली तरी रस्त्याची कामे सुरूच नाहीत. जिथे आम्ही सांगतो चुकीच होताय त्यांनी आमचा थोडं तरी ऐकायला हवं. मी सरकारला प्रश्न विचारतोय. तुम्हाला मुंबईवर एवढा द्वेश का आहे ? का एवढा भ्रष्टाचार करताय? असा सवालही आदित्य ठाकरे यांनी यावेळी केला.

आदित्य ठाकरे म्हणाले, दिड वर्ष हे सरकार चाललं. यामध्ये एवढे घोटाळे झाले आहेत असा आरोप करत अध्यक्षांचा सुनावणी मध्ये टाइम पास सुरू आहे. निर्णय त्यांनी लवकर घ्यावा. कॉट्रॅक्टर चे नाव घेणार नाही. मी त्यांना भेटणार नाही. सेटल होणारे सीएम कार्यालयात बसतात मातोश्री वर बसत नाहीत. आम्ही जेलमध्ये पाठवल्या शिवाय राहणार नाही असा निर्धारही यावेळी व्यक्त केला.

पुढे बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, आम्ही या सगळ्या घोटाळ्याविरोधात लोकायुक्त कडे जाणार आहोत. ३३ देशांनी खोके सरकार ची नोंद घेत आहेत. नवी मुंबईत रखडलेले प्रकल्प आहेत. मुख्यमंत्री हे दिल्लीत असतात. त्यांनी तिथून उदघाटन करा. बाथरूम चे उदघाटन झालं तरी मुख्यमंत्री यांचे फोटो लागतात. तुम्हाला वेळ नाही म्हणून उदघाटन थांबवू नका असा उपरोधिक टोलाही लगावला.

शेवटी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, तुम्ही मेट्रो कारडेपो कुठेही करा कांजूरमार्गला करा किंवा ठाण्यात करा पण एकत्रित करा असा सल्ला देत ज्यांनी सहज रित्या नागरिकांना वेगवेगळ्या लाइन ने प्रवास करता येईल आणि पैसे सुद्धा या सगळ्या कामांमध्ये वाचतील अशा सरकारचे धोरण आज खरे होत असल्याचेही सांगितले.

Check Also

निवडणूक आयोगाकडून राज्यात ४२१ कोटींचा मुद्देमाल जप्त

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यात १६ मार्चपासून आदर्श आचारसंहिता लागू आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार केंद्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *