पुण्यातील माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो तीनच्या मार्गावरील शिवाजीनगर ते औंध दरम्यानच्या कामास गती देण्यासाठी सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी तसेच इतर शासकीय सुट्ट्यांच्या दिवशी गर्डर टाकण्याच्या कामास पोलीसांनी परवानगी द्यावी. या मार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाच्या खालील रस्ते सुव्यवस्थित ठेवण्याची काळजी घ्यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार …
Read More »ठाणे मध्ये विविध समाजासाठी एकाच इमारतीत १२ समाज भवन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण,भूमीपूजन
एकाच इमारतीत १२ राज्यातील १२ समाजासाठी जागा दिली जात असून अशा प्रकारचे समाज भवन प्रथमच साकारले जात असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कासार वडवली येथील समाज भवनाच्या भूमीपूजन समारंभात केले. मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते ठाणे महापालिका क्षेत्रातील, ओवळा-माजिवडा भागातील आमदार प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नांनी साकारलेल्या विविध प्रकल्पांचे लोकार्पण आणि …
Read More »पिंपरी चिंचवड ते निगडी मेट्रोचे भूमिपूजन रुबी हॉल ते रामवाडी मेट्रोला हिरवा झेंडा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पिंपरी – चिंचवड महानगरपालिका ते निगडी, पुणे मेट्रोचे भूमीपूजन करण्यात आले. यावेळी रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी, पुणे मेट्रोला पंतप्रधान मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवला. पंतप्रधान यांनी कोलकाता येथून विविध प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन केले. यावेळी त्यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील या मेट्रो प्रकल्पांची दूरदृश्य …
Read More »पंतप्रधान मोदी यांनी वेळ न दिल्याने अखेर नवी मुंबईची मेट्रो उद्घाटनाविनाच धावणार
राजकिय श्रेयनामावलीत आपलेही नाव जोडले जावे या उद्देशाने नवी मुंबई मेट्रोचे काम पुर्ण झालेले असतानाही केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वेळ मिळत नसल्याने अखेर नवी मुंबईची मेट्रो उद्घाटनाविनाच धावणार असल्याचे खात्रीलायक माहिती नगरविकास विभागातील एका उच्च पदस्थ अधिकाऱ्याने दिली. तर सिडको प्रशासनाने मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार मेट्रो मार्गक्रमनाचा अधिकृत उद्घाटनाचा कार्यक्रम न …
Read More »आदित्य ठाकरे यांचा आरोप, मेट्रो ६, ३ आणि ४ चा इंटिग्रेटेड कार डेपोमध्ये जमीन घोटाळा या घोटाळयांची कॅग,लोकायुक्तकडे करणार तक्रार
महाराष्ट्रातील मिंधे-भाजपाच्या बेकायदेशीर राजवटीतील मेट्रो कांजूर जमीन घोटाळा आणि रस्ते घोटाळयांला मुबंई महापालिकेन स्थगिती दिलीय असे शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी सांगत सत्याचा विजय झालाय असून जे आम्ही बोलत होतो ते आज उघड झाल्याचा दावाही आदित्य ठाकरे यांनी केला. आदित्य ठाकरे पुढे बोलताना म्हणाले, कांजुरमार्गला मेट्रो ६ चा …
Read More »मेट्रो, मुंबई, मुद्रांक शुल्कच्या अनुषंगाने राज्य मंत्रिमंडळात घेतले हे महात्वाचे निर्णय मेट्रो कारशेडसाठी मोघरपाडातील जागा एमएमआरडीएला हस्तांतरीत
मेट्रो प्रकल्पांना ब्रीज लोन घेण्याबाबत उच्चाधिकार समिती मेट्रो कारशेडसाठी ठाण्यातील मोघरपाडा येथील जागा एमएमआरडीएला हस्तांतरीत करण्याचा त्याचप्रमाणे राज्यातील मेट्रो प्रकल्पांना ब्रीज लोन साठी शासन हमी देण्यासंदर्भात निर्णय घेण्याकरिता उच्चाधिकार समिती नेमण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. मुंबई मेट्रो टप्पा-4, 4अ, 10 आणि …
Read More »एमएमआरडीएची अशी ही बनवाबनवी, RTI मधून उघडः कागदपत्रे वाचायला विसरू नका मेट्रोने वांद्रे आणि कुर्ला रेल्वे स्टेशन जोडण्याची खोटी माहिती देत रद्द करण्यात आले कुर्ला - वांद्रे रेल्वेचा जोडमार्ग
कुर्ला – वांद्रे रेल्वे मार्गाचे रेखन आणि ई व जी ब्लॉकमधील रेल्वे स्टेशनाचा प्रस्ताव रद्द करत खाजगी विकासकास फायदा करुन देण्यासाठी वांद्रे आणि कुर्ला रेल्वे स्टेशनला मेट्रो जोडण्याची खोटी माहिती देत शासनाची आणि मुंबईकरांची फसवणूक करणा- या एमएमआरडीए अधिकारी वर्गाची चौकशी करत गुन्हा दाखल करणे आणि रद्द केलेला कुर्ला – …
Read More »मेट्रोच्या भुर्दंडाचे दहा हजार कोटी ठाकरेंकडून वसूल करा
उद्धव ठाकरे आणि त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांच्या बालिश हट्टामुळेच मेट्रो कारशेडचे काम रखडल्यामुळे मुंबईकरांवर दहा हजार कोटींचा वाढीव बोजा पडल्याचे स्पष्ट झाले आहे. हा मुंबईद्रोह असून राज्याबद्दल उद्योगक्षेत्रात संशयाचे वातावरण तयार करून आता महाराष्ट्र द्रोह केला जात आहे, असा थेट आरोप प्रदेश भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी बुंधवारी …
Read More »आशियाई बँकेने सांगितले मुख्यमंत्र्यांना या प्रकल्पांना अर्थसहाय्य सुरु
सामाजिक आर्थिक उन्नतीसाठी समुह विकास प्रकल्पांसोबतच राज्यातील पायाभूत सुविधांचे प्रकल्प, पर्यावरण स्नेही नवीन महाबळेश्वर प्रकल्प, पर्यटनाला चालना देणारा मुंबई-सिंधुदूर्ग सागरी महामार्ग प्रकल्प तसेच नदीजोड प्रकल्प, नाशिक, ठाणे आणि पुणे मेट्रो प्रकल्पांना आशियाई विकास बँक (एशियन डेव्हलपमेंट बँक) च्या माध्यमातून आर्थिक सहाय्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. आशियाई …
Read More »भंडारा शहरातही धावणार मेट्रो
भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द (ता. पवनी) राष्ट्रीय सिंचन प्रकल्पामुळे बाधीत होणाऱ्या भंडारा विधानसभा क्षेत्रातील २६ गावांच्या पुनर्वसनाबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली या गावांच्या पुनर्वसनाच्या मागणीबाबत बैठक झाली. बैठकीस आमदार नरेंद्र भोंडेकर, जलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव दीपक कपूर, मदत व पुनर्वसन विभागाचे …
Read More »