Breaking News

Tag Archives: मुंबई महानगर पालिका

आशिष शेलार यांचा आरोप, ठाकरे सरकारमुळे …महापालिकेच्या ठेवी घटल्या

ठाकरे सरकारच्या काळात मुंबईतील बिल्डरांना केलेला ५०% प्रिमियम माफीमुळे मुंबई महापालिकेच्या ठेवींमध्ये घट झाली, असा आरोप मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांनी आज येथे केला. महायुतीतर्फे आज मुंबई उपनगराचा मेळावा रंग शारदा सभागृहात तर शहर विभागाचा मेळावा यशवंतराव चव्हाण सेंटरच्या सभागृहात पार पडला. यावेळी केलेल्या भाषणामध्ये मुंबई भाजपा …

Read More »

उदय सामंत म्हणाले, २०२७ पर्यंत बेस्ट उपक्रमात संपूर्ण बसगाड्या इलेक्ट्रिक

प्रवाशांच्या सोयीकरिता बेस्ट उपक्रमातील संपूर्ण बसताफा हा सन २०२७ पर्यंत इलेक्ट्रिकवर करण्याचे प्रस्तावित करण्यात येत असल्याचे मंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत सांगितले. बेस्ट बससेवेसंदर्भात सदस्य सुनिल शिंदे यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती, त्याला उत्तर देताना उदय सामंत बोलत होते. मंत्री उदय सामंत म्हणाले की, बेस्ट उपक्रमामार्फत सद्य:स्थितीत २१०० एकमजली व …

Read More »

मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त २६ हजार रूपये सानुग्रह अनुदान महापालिका कर्मचाऱ्यांना पाच लाख रूपयांपर्यंत गटविमा योजना लागू करण्याचाही निर्णय

मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना यावर्षी दिवाळीनिमित्त २६ हजार रूपये सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केली. त्याचबरोबर महापालिका कर्मचाऱ्यांना पाच लाख रूपयांपर्यंत गटविमा योजना लागू करण्याचा निर्णयही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला. वर्षा निवासस्थानी मुंबई महापालिकेच्या विविध कर्मचारी आणि कामगार संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. यावेळी महापालिका आयुक्त …

Read More »

मुंबई महापालिकेचे भूखंड व उद्याने दत्तक देण्याचे धोरण रद्द करा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची मागणी

महानगरपालिका प्रशासन पुन्हा एकदा मुंबईतील मनोरंजन मैदाने व क्रीडांगणे दत्तक तत्वावर देण्याबाबत धोरण आणत आहे. मात्र हे धोरण रद्द करण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. यासंदर्भात जयंत पाटील यांनी पालिका आयुक्तांना पत्र लिहिले आहे त्यात ते म्हणतात की, मैदाने व क्रीडांगणे यांची देखभाल पालिकेला …

Read More »

पाणी टंचाई : मुंबईच्या सात तलावात फक्त ८३ टक्के पाणी साठा ! पाणी जपून वापरण्याचे मुंबई महापालिकेचे आवाहन

83 percent water storage in seven lakes of Mumbai

मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांपैकी कोणताही प्रमुख तलाव सध्या ओव्हरफ्लो नाही. तसेच जुलै महिन्याच्या तुलनेत ऑगस्ट महिन्यात पावसाचे प्रमाण कमी झाले असल्याने मुंबईची पाण्याची चिंता मिटली असे म्हणणे वस्तुस्थितीला धरून होणार नाही अशी माहिती महापालिकेच्या जलविभागाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईकरांवर पाणी टंचाईची चिंता कायमच राहणार असल्याची शक्यता …

Read More »

शिवसेना ठाकरे गटाकडून मुंबई पालिकेवर मोर्चा काढत केला राडा

मुंबई महापालिकेकडून काही भागांमध्ये दूषित पाण्याचा पुरवठा सुरू आहे. याविरोधात आज शिवसेनेच्या ठाकरे गटाने मुंबई महापालिकेच्या (बीएमसी) कार्यालयावर जन आक्रोश मोर्चा काढला. आमदार अनिल परब यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा मुंबई महापालिकेच्या एच पूर्व कार्यालयात पोहोचल्यानंतर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्याला मारहाण करत राडा केल्याचा प्रकार समोर आला …

Read More »

सरकारची मोठी घोषणाः सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये लवकरच ‘ज्युनिअर आणि सीनियर केजी’चे वर्ग

शिशूवर्गापासूनच मुलांचा बौद्धिक आणि शैक्षणिक विकास व्हावा यासाठी लवकरच राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये कनिष्ठ आणि वरिष्ठ शिशूवर्गाचे (सिनियर केजी, ज्युनियर केजी) शिक्षण दिले जाणार आहे, असे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या दहिसर (पश्चिम) येथील सखाराम तरे मुंबई पब्लिक स्कूल इमारतीचे …

Read More »