Breaking News

मलिकांना देशद्रोही ठरविण्याचा डाव देवेंद्र फडणवीसांच्याच अंगाशी, अजित पवारांना पत्र…

राज्यात शिवसेनेपाठोपाठ शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडण्यात यशस्वी ठरलेल्या भाजपाच्या धुरिणांना मोठा आनंद झाला होता. मात्र उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री आपला संबध “त्या” एका गायिकेने काढलेल्या ड्रग्ज माफियांशी काढलेल्या फोटोचा संबध जोडून राजकिय जीवन कलंकित करण्याचा प्रयत्न करू पहात असल्याच्या आणि ड्रग्ज माफिया आणि केंद्र सरकारच्या तपास यंत्रणेसोबतचे साटेलोटे उघडकीस आणण्याच्या मुद्यावरून तत्कालीन मविआ सरकारमधील मंत्र्याला थेट देशद्रोही ठरविण्याचा राजकिय डाव विरोधकांच्या आक्रमक भूमिकेमुळे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच अगलंट आल्याचे चित्र विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आल्याचे पहायला मिळाले.

राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आजपासून नागपूरात सुरु झाले. तसेच सध्या न्यायालयाच्या आदेशानुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि तत्कालीन महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री नवाब मलिक हे अजित पवार यांनी शरद पवार यांच्यापासून राजकिय फारकत घेतल्यानंतर लगेच दोन महिन्याच्या जामीनावर वैद्यकीय आजारपणाच्या आधारावर बाहेर आले. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर नवाब मलिक हे कोणत्या गटात जाणार याबाबत शरद पवार यांनी काही भाष्य केले ना अजित पवार यांनी केले. परंतु भाजपामुळे तुरुंगवास भोगाव्या लागलेल्या राष्ट्रवादीच्या विद्यमान आमदारांना अजित पवार गटात प्रवेश करण्यासंदर्भात अनेक तडजोडी अमिषे दाखविण्यात आल्याविषयीच्या चर्चा राजकिय वर्तुळात चवीनं चर्चिल्या जात होत्या. मात्र पहिल्यांदाच नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा सार्वजनिक राजकिय जीवनात प्रवेश करत विधानसभेत सत्ताधारी बाकावरील सदस्यांसोबत बसल्याचे चित्र दिसले.

या मुद्यावरून विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते तथा शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर चांगलाच हल्लाबोल केला. यावेळी सभागृहात हल्लाबोल करताना अंबादास दानवे म्हणाले, कोणे एकेकाळी भाजपाचे नेते म्हणत होते की देशद्रोह्यांच्या मांडीला मांडी लावून बसणार नाही. एकवेळ सत्ता गेली तरी बेहत्तर म्हणणारे देवेंद्र फडणवीस यांना आता सत्तेसाठी देशद्रोह्यांसोबत बसायला काही वाटत नाही असा हल्लाबोल केला.

त्यावर देवेंद्र फडणवीस यांनीही पलटवार करत म्हणाले की, जर नवाब मलिक हे देशद्रोही होते तर तुमच्या सरकारच्या काळात त्यांना तपास यंत्रणांनी अटक केल्यानंतर मंत्रिमंडळातून बडतर्फ का केले नाही असा सवाल केला. तसेच नवाब मलिक यांच्यावरील कथित आरोपावरून लंगडा प्रतिवाद करण्याचा प्रयत्नही केला. अखेर देवेंद्र फडणवीस यांनाच त्यांच्या लंगड्या प्रतिवादावरून माघार घ्यावी लागल्याचे चित्र विधिमंडळात पाह्यला मिळाले.

हे ही वाचा-

अजित पवार गटाच्या बड्या नेत्याची खुली ऑफर, या ईडी-सीबीआयची लफडी…

अजित पवारांवर अनिल देशमुख यांचा पलटवार, पाच तास माझ्या घरी….

त्यामुळे अखेर उपमुख्यमंत्री नंबर १ देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री २ अजित पवार यांना पत्र लिहित नवाब मलिक यांना महायुतीत नको, सध्या ते वैद्यकीय कारणास्तव जामिनावर बाहेर असून त्यांच्यावर असलेले देशद्रोह्यांशी संबध असल्याचे आरोप त्यांच्यावर सिध्द झाले नसतील तर त्यांचे स्वागतच असल्याचे पत्रात नमूद करत पण त्यांच्यावर तसे आरोप असताना त्यांना महायुतीत सहभागी करून घेणे योग्य होणार नाही, असे आमचे स्पष्ट मत आहे. तसेच देशद्रोह्यांशी संबध असल्याच्या आरोपावरून अटक झाली तरी त्यांना मंत्रिपदावर कायम ठेवणाऱ्या महाविकास आघाडी सरकारच्या विचारांशी आम्ही सहमती दर्शविणार नाही असे सांगत आमच्या भावनांची योग्य नोंद घ्याल अशी शेवटी टीपण्णी वजा सल्ला देत देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःची आणि भाजपाची सुटका करून घेण्याचा प्रयत्न करत केला तरी विरोधकांच्या आक्रमकतेपुढे देवेंद्र फडणवीस यांची चांगलीच कोंडी झाल्याचे चित्र आज पहायला मिळाले.

नवाब मलिक यांच्यावरून देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना लिहिलेले हेच ते पत्र

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

नव्या न्यायसंहिता आणि टेलिकम्युनिकेशन कायद्याला राष्ट्रपतींची मंजूरी

संसदेच्या हिवाळी अधिवेशना दरम्यान संसद सुरक्षेचा भंग करत ११ डिसेंबर रोजी दोन देशातील तरूणांनी थेट …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *