कर्जत येथील मंथन शिबीरात पक्ष कार्यकर्त्ये आणि पदाधिकारी यांच्यासमोर अजित पवार यांनी बाजू मांडताना भाजपासोबत जाण्याच्या सर्व बैठकांना अनिल देशमुख हे उपस्थित होते. मात्र मंत्रिमंडळात मंत्री पद मिळणार नाही असे सांगताच अनिल देशमुख यांनी मंत्री पद नाही तर मी तुमच्यासोबत नाही असे जाहिर करत आमच्यासोबत येण्यास नकार दिल्याचा गौप्यस्फोट अजित पवार यांनी केला होता.
अजित पवार यांच्या या आरोपावर अनिल देशमुख यांनी आज पत्रकार परिषद घेत पलटवार केला.
अनिल देशमुख म्हणाले की, मला कोणत्याही परिस्थितीत भाजपासोबत जायचे नव्हते. मला त्रास देणाऱ्या भाजपासोबत तर मुळीच नाही. त्यामुळेच हसन मुश्रीफ हे भाजपासोबत जाण्यासाठी मनधरणी करण्यासाठी पाच तास घरी येऊन बसले होते, असा खुलासा केला.
तसेच पुढे बोलताना अनिल देशमुख म्हणाले, भाजपानं मला खोट्या प्रकरणात फसवलं. त्यामुळे त्यांच्यासोबत जाण्याचा प्रश्नच नव्हता. मला पाहिजे ते खातं देण्याची तयारी होती. पण मला त्रास देणाऱ्यांबरोबर जायचं नव्हतं. आणि शरद पवार यांची साथ सोडणारं नव्हतो असेही स्पष्ट केले.
अखेर मराठी ई-बातम्याचे वृत्त खरे ठरले
मागील महिन्यात फडणवीस-शिंदे यांनी अजित पवार यांच्या अधिकाऱावर कात्री लावत शरद पवार समर्थक आमदारांचे काय झाले असा सवाल भाजपाच्या दिल्लीतील श्रेष्ठींनी अजित पवार यांना केला. त्यानंतर अजित पवार यांनी केंद्रीय निवडणूक आयोगासमोरील सुनावणीत आणि सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीत आपली बाजू कमी पडू नये यासाठी शरद पवार यांचे खंदे समर्थक असलेल्या जून्या नेत्यांना मंत्र्यांशी संपर्क साधून गटात सहभागी करून घेण्याची तयारी दर्शविल्याचे वृत्त सर्वात प्रथम मराठी ई-बातम्याच्या संकेतस्थळाने सर्वप्रथम दिले होते. तसेच अनिल देशमुख यांच्या भेटीसाठी झालेला नागपूर दौरा आणि मुंबईतील माजी मंत्री राहिलेल्या नवाब मलिक यांच्या भेटीसाठी अजित पवार हे स्वतः गेल्याचे वृत्त ही प्रसारीत केले होते. त्यामुळे अनिल देशमुख यांनी केलेल्या खुलाश्याने मराठी ई-बातम्या संकेतस्थळाचे वृत्त खरे ठरले.
हे ही वाचाः- सर्वात पहिले वृत्त मराठी ई-बातम्याचे वृत्त
अजित पवार गटाच्या बड्या नेत्याची खुली ऑफर, या ईडी-सीबीआयची लफडी…