बी सुदर्शन रेड्डी यांचे चंद्राबाबू नायडू यांना आवाहन, राष्ट्रहितासाठी योग्य निर्णय घ्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणूकीसाठी एनडीएमधील घटकपक्षांना चुचकारण्याचा प्रयत्न

विरोधी पक्षाचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांनी शनिवारी टीडीपी प्रमुख चंद्राबाबू नायडू यांचे वर्णन “देशातील सर्वात मोठ्या नेत्यांपैकी एक” असे केले. तसेच आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांवर “राष्ट्रहितासाठी योग्य निर्णय” घेण्याचा विश्वास असल्याचे सांगितले.

चंद्राबाबू नायडू, ज्यांचा तेलुगू देसम पक्ष एनडीएचा प्रमुख सहयोगी आहे, त्यांनी आधीच सत्ताधारी गटाचे उमेदवार महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले आहे, तथापि, बी सुदर्शन रेड्डी यांनी असे सुचवले की आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी “राजकारणाला अनेक वळणे दिली आहेत” असल्याचे सांगितले.

बी सुदर्शन रेड्डी म्हणाले की, चंद्रबाबू नायडू हे एक दूरदर्शी नेते आहेत, देशातील सर्वात मोठ्या नेत्यांपैकी एक आहेत आणि त्यांना काय करायचे हे माहित आहे. मला खात्री आहे की ते राष्ट्रीय हितासाठी योग्य निर्णय घेतील. त्यांनी यापूर्वीही अनेक वेळा असे केले होते. त्यांनी भारतीय राजकीय घडामोडींना अनेक वळणे दिली,” असे मुलाखतीत सांगितले.

बी सुदर्शन रेड्डी यांनी असेही सांगितले की, ते एनडीए किंवा इंडिया ब्लॉकशी जुळलेल्या नसलेल्या अनेक पक्षांच्या संपर्कात होते. “त्यांच्याशी चर्चा सुरू आहे, त्यापैकी काही थेट माझ्याशी बोलत आहेत आणि त्यांच्या पद्धतीने मला पाठिंबा देत आहेत. कारण सोपे आहे – मी कोणत्याही राजकीय पक्षाचा नाही,” असेही सांगितले.

सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश बी सुदर्शन रेड्डी यांनी युक्तिवाद केला की, ज्या विरोधी पक्षाने त्यांना उमेदवारी दिली होती तो बहुसंख्य भारतीयांचे प्रतिनिधित्व करतो. “या देशातील विरोधी पक्ष लोकसंख्येच्या सुमारे ६६-६७% लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करतो. याचा अर्थ मी या देशातील बहुसंख्य लोकसंख्येने प्रायोजित उमेदवार आहे, असेही सांगितले.

बी सुदर्शन रेड्डी पुढे म्हणाले की, एनडीए संख्यात्मकदृष्ट्या मजबूत दिसत असले तरी, निवडणूकीतील फरक “खूपच कमी” होता आणि बदलत्या युतींमुळे निकाल बदलू शकतो. उपराष्ट्रपती पद ही राजकीय भूमिका नाही तर एक संवैधानिक भूमिका आहे.

शेवटी बोलताना बी सुदर्शन रेड्डी म्हणाले की, “संविधानासोबतचा माझा प्रवास १९७१ मध्ये सुरू झाला जेव्हा मी बारमध्ये प्रवेश केला आणि त्याच्या नावाने शपथ घेतली. नंतर, न्यायाधीश आणि नंतर मुख्य न्यायाधीश म्हणून, मी पुन्हा एकदा ते कायम ठेवण्याची शपथ घेतली. सध्याचे पद ज्यासाठी मी निवडून येण्याची आशा करतो ते त्याच प्रवासाचा भाग आहे. मला वाटत नाही की उपराष्ट्रपती पद हे राजकीय पद आहे. ते एक उच्च संवैधानिक पद असल्याचे सांगितले.

About Editor

Check Also

राहुल गांधी यांचा पंतप्रधान मोदी यांना सवाल, पार्थ पवार महार वतन जमिनप्रकरणी गप्प का? महार वतन जमिन खरेदीवरून राहुल गांधी यांचा मोदी यांना आवाहन

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी महार वतनाची १८०० कोटी रूपये किंमतीची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *