Breaking News

चंद्रावर चंद्रायान-३ चे यशस्वी सॉफ्ट लँडींगः इस्त्रोचे अभिनंदन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून दक्षिण आफ्रिकेतून इस्त्रोच्या शास्त्रज्ञांचे केले कौतुक

चंद्राच्या दक्षिण प्रांतावर रशियाच्या लुना या यानाची अयशस्वी मोहिम ठरल्यानंतर भारताकडून आखण्यात आलेल्या चंद्रयान-३ मोहिमेकडे साऱ्या जगभराचे लक्ष लागून राहिले होते. त्यानुसार गतवेळची चूक दुरूस्त करत चंद्रयान-३ मोहिमेनुसार आखलेल्या योजनेनुसार भारताच्या चंद्रयान- ३ चे चंद्राच्या दक्षिण प्रांतात सॉफ्ट लँडींग यशस्वी झाले. भारताच्या गतवेळची मोहिम अयशस्वी ठरल्यानंतर आणि रशियाच्या दोन दिवस आधीच्या चंद्रवारी लुना यान अयशस्वी झाल्यानंतर भारताच्या चंद्रयान-३ मोहिम इस्त्रोने यशस्वी ठरल्यामुळे संबधल देशभरातील सर्वचस्तरातून इस्त्रोच्या शास्त्रज्ञांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

 

 

चंद्रावरील लँडींगची शेवटची १५ मिनिटे या सॉफ्ट लँडीगसाठी महत्वाची ठरणार होती. त्यानुसार १०० मीटरच्या अंतावर यानाने चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला. त्यानंतर यानाने स्लो लँडींगच्या क्रियेस सुरुवात केली. तसेच या यानाच्या कॅमेऱ्याने चंद्राच्या जसजसे जवळ जाईल तसेच तेथील पृष्ठभागाची छायाचित्रे पाठविण्यास सुरुवात केली.

नेमक्या त्याचवेळी इस्त्रोमधून नियंत्रण करणाऱ्या शास्त्रज्ञांची धाकधुक वाढलेली होती. अखेर शेवटच्या काही सेकंदात यानाचे लँडींग होताच इस्त्रोच्या शास्त्रज्ञांनी एकच जल्लोष करण्यास सुरुवात केली. त्याचबरोबर टाळ्यांच्या कडकडात या यानाशी संबधित सर्व शास्त्रज्ञ आणि संबधित व्यक्तींचे एकमेकांनी अभिनंदन करत कौतुक केले.

 

चंद्राच्या दक्षिण प्रांतात स्लो लँडींग करणारा भारत हा पहिला देश ठरला आहे. तसेच भूभागाचे निरिक्षण करून चंद्राच्या त्या भागात पाण्याचा अंश आहे का याची माहितीही या भूभागावरून अर्थात चंद्रावरून भारताला मिळणार आहे.
आम्ही चांद्रयान २ च्या अपयशातून खूप काही शिकलो आहोत असं वैज्ञानिकांनी म्हटलं आहे. याबाबत इस्रोने थेट प्रक्षेपणास सुरुवात केले होते.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ब्रिक्स देशांच्या बैठकीसाठी दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर असून तेथून ते चंद्रावर होणारे सॉफ्ट लँडींग पाहिले आणि इस्त्रोच्या शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले.

Check Also

मंत्री पदावरून आमदारांनी घातला मुख्यमंत्री शिंदेंना वर्षावर घेरावः इकडे अधिकारी मात्र ताटकळत रायगडचा पालकमंत्री भरत शेठ, अध्यक्ष पद नकोय मंत्री पद हवय आमदारांनी धरला हट्ट

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आपल्याच काकाच्या अर्थात पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या विरोधात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *