Breaking News

उद्धव ठाकरे यांचा इशारा, …गद्दारांना गाडायचेय शिर्डीचे माजी खासदार भाऊसाहेब वाघचौरे यांचा ठाकरे गटात प्रवेश

शिवसेनेतून एकनाथ शिंदे यांनी बंडाचे निशाण फडकाविल्यानंतर मुळ शिवसेनेतून अनेक आमदार-खासदार आणि इतर शिवसैनिक मोठ्या प्रमाणावर बाहेर पडले. या बाहेर पडणाऱ्यांमध्ये शिर्डीचे माजी खासदार भाऊसाहेब वाघचौरे हे ही होते. मात्र वाघचौरे यांनी झालेली चुक दुरूस्त करत पुन्हा उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले, आजवर अनेकांनी शिवसेना सोडली. मात्र, शिवसेना संपवण्याचा प्रयत्न केला नाही. आता हे पापी, गद्दार शिवसेना संपवायला निघाले आहेत. शिवसेना संपवायला निघालेल्या गद्दारांना आपल्याला गाडायचे आहे, असा हल्लाबोल निर्वाणीचा इशारा दिला.

शिर्डीचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी बुधवारी मातोश्री निवासस्थानी स्वगृही परतले. दरम्यान, त्यांनी शिंदे गटाचा चांगलाच समाचार घेतला. शिवसैनिकांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी देत, परिसर दणाणून सोडला.

उद्धव ठाकरे म्हणाले की, वाकचौरे यांच्या परतल्याने नगर जिल्ह्यात ताकद वाढली आहे. शिर्डीची जागा आपली आहे. आपल्याला ती निवडून आणायची आहे. वाकचौरे यांनी शिवसेना सोडली. परंतु, कधीही त्यांनी शिवसेना संपण्याचा प्रयत्न केला नाही. या झालेल्या चुकीबद्दल त्यांनी माफी ही मागितली. माझ्याऐवजी, शिवसैनिकांची माफी मागा, असे ठणकावल्याचे यावेळी सांगत तसेच चुकीला माफी आहे. मात्र हे पापी, गद्दार शिवसेना संपवायला निघाले आहेत. या पापी, गद्दारांना आपल्याला गाडायचे आहे असा निर्धार उद्धव ठाकरे म्हणाले, शिवसेना संपवण्याची भाषा करणाऱ्यांनी आता निवडणुकीच्या मैदानात उतरावे, आमचे शिवसैनिक त्यांचा बदला घेतील, असा गर्भित इशाराही दिला.

चमत्कार घडणारच

शिवसेनेशी गद्दारी केलेल्यांची मस्ती उतरण्यासाठी आणि पापी गद्दारांना गाडण्यासाठी तुम्ही तयार आहात, असे सांगताना आयुष्यात श्रद्धा आणि सबुरी गरजेची आहे. मात्र, गद्दारांकडे ना श्रद्धा, ना सबुरी आहे, असा अप्रत्यक्ष टोला शिंदे गटाला लगावला. लवकरच शिर्डीला भेट देऊन साईबाबांचे आशीर्वाद घेऊन जाहीर सभा घेईन, अशी घोषणा ठाकरेंनी केली. तसेच येत्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीत चमत्कार घडणारच, असा विश्वासही उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

Check Also

तिसऱ्या टप्प्यात ११ लोकसभा मतदारसंघात ५ वाजेपर्यंत ५३ टक्के मतदान

लोकसभा निवडणूकीत महाराष्ट्रासह देशभरात ९४ लोकसभा मतदारसंघात आज मतदान पार पाडले. महाराष्ट्रातील ११ मतदारसंघातील मतदानाची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *