Breaking News

दिल्लीत पांढरी वाघीण सीताच्या दोन बछड्यांचा पहिला वाढदिवस थाटात साजरा नॅशनल झूलॉजिकल पार्कतर्फे उपस्थित प्रत्येक विद्यार्थ्याला एक रोपटे भेट देण्यात आले आणि त्या माध्यमातून पार्कने पर्यावरणीय शाश्वततेप्रती आपल्या बांधिलकीचा परिचय घडवला

दिल्लीच्या नॅशनल झूऑलॉजिकल पार्कमध्ये सर्वांची लाडकी पांढरी वाघीण, सीता’चे जुळे बछडे, अवनी आणि व्योम यांचा पहिला वाढदिवस मोठ्या आनंदात आणि थाटामाटात साजरा झाला. या समारंभासाठी पाहुणे होते, पर्यावरण आणि वन तसेच हवामान बदल विभागाचे महसंचालक चंद्र प्रकाश गोयल, आणि केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाचे सदस्य सचिव डॉ. एस.के. शुक्ला. ह्या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे केक कापून समारंभपूर्वक नागरिक आणि वन्यजीव यांच्यातील संबंध अधिक दृढ करण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला.

११ व्या इयत्तेतील विद्यार्थ्यांना या समारंभासाठी आमंत्रित करण्यात आले होते. या कार्यक्रमाने विद्यार्थ्यांना वाघांबद्दल आणि जैवविविधता संवर्धनातील त्यांच्या महत्त्वाच्या भूमिकेबद्दल जाणून घेण्याची अनोखी शैक्षणिक संधी उपलब्ध करून दिली.

नॅशनल झूलॉजिकल पार्कतर्फे उपस्थित प्रत्येक विद्यार्थ्याला एक रोपटे भेट देण्यात आले आणि त्या माध्यमातून पार्कने पर्यावरणीय शाश्वततेप्रती आपल्या बांधिलकीचा परिचय घडवला तसेच त्यांच्या सहभागाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. शिवाय भविष्यातील पिढ्यांमध्ये पर्यावरणाबाबत जबाबदारीची भावना निर्माण करणे हाही त्यामागचा उद्देश होता.

अवनी आणि व्योम यांच्या पहिल्या वाढदिवसाचा हा उत्सव, प्राणीसंग्रहालयाच्या मानव आणि निसर्ग यांच्यातील सुसंवादी सहअस्तित्व वाढवण्याच्या प्रयत्नांचा एक भाग होता.

सध्या राष्ट्रीय प्राणीशास्त्र उद्यानात दोन जातींचे १२ वाघ आहेत आणि त्यापैकी सात पिवळे पट्टेदार वाघ तर पाच पांढरे वाघ आहेत.

Check Also

एक स्वप्न नव्या भारत जोडो न्याय यात्रेचे ; शिखराच्या पायथ्याशी असलेल्या युतीचे

केवळ राजकारण करून भाजपा-आरएसएसचा पराभव करू शकत नाही. त्यात राजकारण आणि विचारधारा असणे आवश्यक आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *