Breaking News

व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयांतर्गत ७७२ पदाकरींता भरती संचालक दिगांबर दळवी यांची माहिती

व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयांतर्गत गट – ‘क’ संवर्गातील विविध ७७२ पदे भरण्याकरिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. ही पदभरती अत्यंत पारदर्शक पद्धतीने करण्यात येत असल्याचे व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दिगांबर दळवी यांनी कळविले आहे.

व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयांतर्गत राज्यातील विविध शासकीय संस्था, कार्यालयातील गट-क संवर्गातील विविध ७७२ पदे भरण्याकरिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्याबाबत १६ फेब्रुवारी २०२३ रोजी www.dvet.gov.in या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. उमेदवारांना त्यांच्या शैक्षणिक अर्हता व अनुभवानुसार जास्तीत जास्त पदांकरिता अर्ज करण्याची संधी उपलब्ध व्हावी, केवळ परीक्षा शुल्कामुळे उमेदवारांची संधी वाया जाऊ नये, याकरिता पदाच्या शैक्षणिक अर्हतेनुसार जाहिरातीमधील पदांची ग्रुप ए, बी आणि सी मध्ये विभागणी करण्यात आली असून प्रत्येक पदाकरिता स्वतंत्र परीक्षा शुल्क न आकारता ग्रुपनिहाय परीक्षा शुल्क आकारण्यात आले आहे. शैक्षणिक अर्हता व अनुभवानुसार किती पदांकरिता अर्ज करावयाचे यांचे संपूर्ण स्वातंत्र्य उमेदवारास होते. विहित परीक्षा शुल्कासह विहित कालावधीत ऑनलाईन अर्ज सादर केलेल्या सर्व उमेदवारांना प्रमाणपत्र पडताळणीच्या अधिन राहून १६ एप्रिल २०२३ रोजी घेण्यात आलेल्या सामायिक परीक्षेकरिता (CBT) परवानगी देण्यात आली होती.

जाहिरातीमधील निदेशक (पूर्व व्यावसायिक अभ्यासक्रम) पदांकरिता व्यावसायिक चाचणी (CBT-2) असल्याने ही पदे वगळता उर्वरित सर्व पदांची (Group-B व Group-C) तात्पुरती गुणवत्ता यादी (Provisional Merit List) दिनांक 01/08/2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. ज्या उमेदवारांनी एकापेक्षा जास्त पदांकरिता अर्ज केलेले आहेत, अशा उमेदवारांनी त्या-त्या गटा (Group) करिता असलेली सामायिक परीक्षा (CBT) स्वतंत्रपणे दिलेली असल्याने अशा उमेदवारांचा त्यांच्या गुणवत्तेनुसार संगणकीकृत पद्धतीने तयार करण्यात आलेल्या तात्पुरत्या गुणवत्ता यादीत समावेश आहे. उमेदवारांची निवड सूची प्रसिद्ध करुन निवड सूचीतील उमेदवारांच्या प्रमाणपत्र/कागदपत्र पडताळणी (Documents Verification) ची कार्यवाही करण्यात येणार आहे. तात्पुरत्या गुणवत्ता यादीतील प्राधान्यक्रम हा उमेदवाराने ऑनलाईन अर्ज सादर करताना भरलेल्या माहितीच्या आधारे निश्चित करण्यात आला आहे. तथापि, प्रमाणपत्र तसेच कागदपत्र पडताळणी दरम्यान उमेदवाराने ऑनलाईन अर्जात चुकीची माहिती सादर केल्याचे आढळून आल्यास चुकीची कागदपत्रे खोटे अथवा बनावट आढळून आल्यास त्यास पुढील भरती प्रक्रियेकरिता अपात्र ठरविण्यात येणार आहे. याबाबत उमेदवाराची कोणतीही तक्रार विचारात घेतली जाणार नाही.

पडताळणीअंती वैध ठरतील, अशा उमेदवारांनाच नियुक्ती आदेश निर्गमित करण्यात येतील. एखादा उमेदवार एकापेक्षा जास्त पदांकरिता पात्र ठरला, तरी उमेदवार ज्या पदांकरिता पात्र ठरला आहे, त्यापैकी ज्या पदावर रुजू होण्यास तो इच्छुक असेल, त्या पदाचेच नियुक्ती आदेश निर्गमित करण्यात येतील.

प्रमाणपत्र तसेच कागदपत्रे पडताळणी दरम्यान उमेदवाराने सादर केलेली प्रमाणपत्र, कागदपत्र खोटी अथवा बनावट आढळल्यास त्यास पुढील भरती प्रक्रियेतून बाद ठरविण्यात येते. या पदभरतीच्या अनुषंगाने अद्याप उमेदवारांच्या प्रमाणपत्र, कागदपत्र पडताळणीची (Documents Verification) कार्यवाही झालेली नसल्याने प्रमाणपत्र, कागदपत्र पडताळणी दरम्यान उमेदवाराने सादर केलेली प्रमाणपत्र,कागदपत्र खोटी अथवा बनावट आढळल्यास त्यास पुढील भरती प्रक्रियेतून बाद ठरविण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. पदभरतीमधील प्रमाणपत्र अथवा कागदपत्र पडताळणीची प्रक्रिया अद्याप झालेली नसताना तत्पूर्वीच काही उमेदवाराची नांवे गुणवत्ता यादीतून कमी करण्याबाबतची माहिती चुकीची आहे. तरी पदभरतीसंदर्भात चुकीची व दिशाभूल करणारी माहिती प्रसिद्ध न करण्याचे तसेच अशा अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाकडून करण्यात येत आहे.

Check Also

राज्यात १९१ वेठबिगार कामगारांची मुक्तता

राज्यात वेठबिगारी निर्मुलनासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत असून यात जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समित्यांची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *