Breaking News
Madurai Train Fire

Madurai Train Fire : रेल्वेच्या भीषण आगीत १० ठार मदुराई रेल्वे यार्डात घडला भीषण अपघात

तामिळनाडूच्या मदुराई येथे आज, शनिवारी ट्रेनला भीषण (Madurai Train Fire) आग लागल्याची घटना घडली. या घटनेत १० जण ठार झाले असून २० प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. लखनऊ-रामेश्वरम् गाडी मदुराई रेल्वे यार्डात उभी असताना गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती पुढे आलीय.

यासंदर्भातील माहितीनुसार लखनऊ-रामेश्वरम एक्स्प्रेस तामिळनाडूच्या मदुराई स्थानकानजीक रेल्वे यार्डात उभी असताना एका सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळे गाडीच्या कोचने अचानक पेट घेतला. यात १० प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला असून मृतकांमध्ये उत्तरप्रदेशातील 8 प्रवाशांचा समावेश आहे. अपघाताच्या वेळी या डब्यात ६५ प्रवासी होते त्यापैकी सुमारे २० जण गंभीर जखमी झाल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली.

दरम्यान या दुर्घटनेची माहिती मिळताच तत्काळ अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन विभागाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले. परंतु, तोपर्यंत १० जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. ज्या डब्याला ही आग लागली तो टुरिस्ट कोच होता. या डब्यातील प्रवासी धार्मिक पर्यटनासाठी १७ ऑगस्ट रोजी उत्तरप्रदेशातील लखनऊ येथून प्रवासाला निघाले होते. रामेश्वरम् ला जाण्यासाठी हा डबा सदर गाडीला जोडण्यात आला होता. दरम्यान दक्षिण रेल्वेने या घटनेतील मृतकांच्या वारसांना प्रत्येकी १० लाख रुपयांच्या मदतीची घोषणा केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *