Breaking News

विधानसभेत चर्चा मुंबईवरची मात्र वाद नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्यावरून

मुंबईतील पायाभूत सुविधांबरोबर मोकळ्या भूखंडाप्रकरणी आणि परवडणाऱ्या दरातील घरांचा प्रश्नी विधानसभेत सत्ताधारी पक्षाच्यावतीने विधानसभेत सादर करण्यात आला. यावेळी काँग्रेसच्या आमदार वर्षा गायकवाड यांनी मुंबईतील विविध विकास प्रकल्प आणि त्याच्या जमिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मित्र अदानी यांना दिल्या जात असल्याचा गंभीर आरोप केला. त्याच्या उद्घाटनाला मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बोलाविले जाते आणि त्याचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले जात असल्याचा मुद्दा उपस्थित केला. वर्षा गायकवाड यांच्या वक्तव्यावर अमित साटम आणि नितेश राणे या भाजपाच्या आमदारांनी हरकत घेत राहुल गांधी यांचा मुद्दा उपस्थित केला. त्यामुळे अखेर विधानसभेचे तालिका अध्यक्ष चव्हाण यांनी भाजपाने मांडलेल्या हरकतीनुसार तो शब्द वगळून कामकाज पुढे चालविले.

विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासानंतर मुंबईवरील पायाभूत सुविधांवर आणि परवडणाऱ्या दरातील घरांच्या मुद्यावरील चर्चेचा प्रस्ताव सत्ताधारी सदस्यांकडून मांडण्यात आला. त्यावेळी भाजपाच्या आमदार आशिष शेलार यांनी मुंबईतील विकास कामांचे श्रेय सत्तेतील भाजपाला देत, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमुळे मागील दोन-अडीच वर्षात अनेक विकास कामांना ब्रेक लागला. याशिवाय मुंबई महापालिकेवर मागील २५ वर्षापासून ठाकरे गटाचीच सत्ता असूनही महापालिकेकडून मुंबईच्या विकासासाठी कामेच झाली नाहीत. उलट प्रत्येक गोष्टीत टेंडर आणि टेंडरच्या माध्यमातून टक्केवारीचे कमिशन यातच त्यावेळच्या सत्ताधाऱ्यांकडून काम करण्यात आल्याचा आरोप केला.

परंतु विधानसभा तालिका अध्यक्षांनी भाजपाच्या आमदारांनी केलेल्या आरोपावर आक्षेप घेत कोणतेही पुरावे नसताना अशा स्वरूपाचे आरोप आणि विषयाशिवाय असंबध्द बडबड करायची नाही अशी सांगत फक्त मुंबईच्या प्रश्नावर चर्चा करण्याविषयीचा प्रस्ताव असून त्यावरच सदस्यांनी आपली मते मांडावीत अशी समज भाजपा आमदारांना दिली.

त्यानंतर काँग्रेसच्या आमदार वर्षा गायकवाड यांनी मुंबईतील झोपट्टीवासियांचा आणि धारावीकरांचा प्रश्न उपस्थित करत सत्ताधारी भाजपावर हल्ला चढविला. यावेळी बोलताना वर्षा गायकवाड म्हणाल्या की, मुंबईतील जेवढी विकास कामांचे उद्घाटन किंवा प्रकल्पांच्या जमिनी फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मित्र अदानी यांना दिले जात असल्याचा गंभीर आरोप केला.

काँग्रेस आमदार वर्षा गायकवाड यांच्या या वक्तव्यावर भाजपाचे आमदार मनोज कोटक आणि निलेश राणे हे मध्येच उठून उभे रहात म्हणाले की, राहुल गांधी हे वेगवेगळ्या ठिकाणी जातात आणि प्रसारमाध्यमांसमोर तमाशा उभा करतात, मस्ती करतात अशी टीका करत हे मी आताच्या आता सप्रमाण सांगू शकतो असे सांगत काँग्रेसच्या आमदार वर्षा गायकवाड यांना आव्हान दिले. तसेच काँगेसचे सदस्य जे बोलतात ते चुकीचे बोलतात असे सांगत तसे दाखले देतात त्यामुळे त्यांचे वक्तव्य काढून टाकावे अशी मागणी केली.

त्यानंतर भाजपाच्या इतर सहकारी आमदारांनीही हरकतीचा मुद्दा उपस्थित करत वर्षा गायकवाड यांचे ते वक्तव्य काढून टाकण्याची मागणी केली. सुरुवातीला तालिका अध्यक्षांनी सत्ताधारी आमदारांच्या सततच्या हरकतींकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला. परंतु सत्ताधारी बाकावरील सदस्य अधिकच आक्रमक होत असल्याचे पाहून काँग्रेसचे अमिन पटेल यांनी विरोधकांकडून जाणीवपूर्वक अडथळे आणण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला.

परंतु तालिका अध्यक्षांनी वर्षा गायकवाड यांना बोलण्याची संधी देत तुमचे म्हणणे पूर्ण करा अशी सूचना केली. पुन्हा वर्षा गायकवाड यांनी चर्चेला सुरुवात केल्यानंतर पुन्हा एकदा भाजपाच्या आमदारांनी आक्षेप घेण्यास सुरुवात केली. त्यावर वर्षा गायकवाड यांनी बोलताना अदानी नावाचा घेतलेला संदर्भ कामकाजातून काढून टाकण्यात येत असल्याचे जाहिर केले. त्यास वर्षा गायकवाड यांनीही सहमती दर्शविली आणि वर्षा गायकवाड यांनी अखेर आपले भाषण पूर्ण केले.

दरम्यान, आशिष शेलार यांनी वर्षा गायकवाड यांनी मांडलेल्या मुद्यावर नुसते चुकिचे आणि असंबध्द असलेलेले संदर्भ असलेले भाषण अशी टीका खाली बसूनच केली.

तत्पूर्वी भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी पुन्हा याप्रकरणी हरकतीचा मुद्दा उपस्थित करत कोणी चुकिची माहिती देत असेल, संदर्भ देत असेल किंवा असंबध्द बडबड करत असेल तर त्यावर आम्ही आक्षेप घ्यायचा नाही का असा मुद्दा उपस्थित केला. तसेच यासंदर्भात तुम्हीच सूचना केलेली आहे, असे असतानाही अशाच प्रकारचे मुद्दे उपस्थित करण्यात येत आहेत ही बाब निदर्शनास आणून दिली.

Check Also

नाना पटोले यांची टीका, गुवाहाटीच्या गद्दारांना राहुल गांधींवर बोलण्याचा अधिकार नाही

लोकसभेच्या निवडणुकीचा दुसराच टप्पा होत असताना भारतीय जनता पक्ष व त्यांच्या मित्रपक्षांची घाबरगुंडी उडाली आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *