सुप्रिया सुळे यांची भीती, राज्यात प्रचंड अस्वस्थ करणारी परिस्थिती संसदेत मांडणार हा विषय मांडणार

राज्यातील सरकार कबुली देतंय की ४०० कोटी रुपयांचा पीक विम्याचा घोटाळा झाला आहे आणि त्याच सरकारमधील आमदार म्हणतायत की ४०० नव्हे तर ५००० कोटीचा झालाय. हा खूप गंभीर विषय असून तो मी, संसदेत मांडणार आहे. तसेच सरकारने हार्वेस्टरमागे ८ लाख रुपये मागितले हे अतिशय गंभीर आहे स्वतः भ्रष्टाचार होतो हे मंत्रीच कबूल करत असल्याची धक्कादायक माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनी इंदापूर येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना देत हा विषय संसदेत मांडणार असल्याचे सांगितले.

सुप्रिया सुळे पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, महाराष्ट्रात सातत्याने भ्रष्टाचार होतोय हे महाराष्ट्र सरकारचे कॅबिनेट मंत्री कबूल करतायत मग त्याची चौकशी का होत नाही? असा सवाल उपस्थित करत हे मी संसदेच्या अधिवेशनात मांडणार असल्याचे सांगितले. लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही मला दिल्लीला पाठवलंय. त्यामुळे काळ्या मातीशी इमान राखणं आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणं हे माझं कर्तव्य आहे. संसदेमध्ये महाराष्ट्रातील विविध प्रश्नांसाठी न्याय मागणार. या अधिवेशनानंतर महाराष्ट्राला न्याय मिळाला नाही तर आम्हाला आंदोलन करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही असा इशाराही यावेळी दिला.

पुढे बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था राहिली नाही, याबाबत जर पत्रकारच अस्वस्थ होऊन विचारत असतील तर त्यांच्या प्रश्नातच माझं उत्तर आहे. लोकांची भावना आहे की महाराष्ट्रात वर्दीची भीतीच राहिली नाही. हे अतिशय चिंताजनक आहे. राज्यात कायदा सुव्यवस्था काही राहीली नाही. सरकारला दोन महिने झाले. ते १०० दिवसांचा प्रोग्राम देणार होते, आज ६० दिवस झाले आहेत. इंदापूरवर अन्याय झाला आहे. पालकमंत्रीपद दिले नाही. मी सरकारला बोलणार आहे. सरकार स्थापन होऊन ६० दिवस झाले तरी कोणतेच काम झाले नाही, असेही यावेळी सांगितले.

सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या की, निधी नसल्यामुळं निरा भीमा नदी जोड प्रकल्प ठप्प आहे. निधी का मिळत नाही? निधी नसल्यामुळं शेतकऱ्यांचा डीपी बसवला जात नाही. विधानसभा निवडणुकीत हर्षवर्धन पाटील यांच्या पराभवाला अनेक कारणं आहे. उत्तम जानकर निवडून आले तरी त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यामुळं मला निवडणुकीच्या पारदर्शकतेवर प्रश्न पडला आहे. लोक बॅलेटवर निवडणुका घेण्याची मागणी करत आहेत. माझं म्हणणं आहे की समाजामध्ये जर अस्वस्थता असेल आणि जर लोकांची मागणी असेल की निवडणुका बॅलेट पेपरवर व्हाव्यात. यात अडचण काय ? असा सवालही यावेळी केला.

पुढे बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, जितेंद्र आव्हाड, रोहित पवार, बजरंग सोनवणे, संदीप क्षीरसागर, सुरेश धस, अंजली दमानिया, नमिता मुंडदा हे लोक आणि काँग्रेसचे लोक सातत्याने वाल्मिक कराड यांच्यावर ३०२ मध्ये आरोपी करा हा मुद्दा मांडत आहेत. राज्यातील ६ पक्ष सातत्याने मागणी करत आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी याचे उत्तर दिले पाहिजे. सरकार का खुनी लोकांना लपवत आहे असा सवालही यावेळी केला.

सुप्रिया सुळे पुढे बोलताना म्हणाल्या की, बदलापूर घटनेतील आरोपी अक्षय शिंदे यांच्या एनकाउंटरवरून न्यायालयाने पोलिसांना दोषी ठरवलं आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नेमली आहे, आज-काल जेल ऑफ चॉईस ही नवीन स्कीम सरकारने काढली आहे. प्रचंड अस्वस्थ करणारी परिस्थिती राज्यात आहे. एवढा मोठा जनाधार या सरकारला मिळाला आहे. सातत्याने सर्वसामान्य माणसांना फसवल्याचा फिल का येतोय असा सवालही यावेळी केला.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती, मनसेसोबतच्या युतीसंदर्भात अद्याप कोणतीही चर्चा नाही नगरपालिका निवडणुकांसाठी काँग्रेसकडे ३५ हजार इच्छुक उमेदवारांचे अर्ज; १२ तारखेच्या पार्लमेंटरी बोर्डाच्या बैठकीत निर्णय

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबरोबर युती वा आघाडीसंदर्भात अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *