Breaking News

शिवसेना नेत्यांच्या हकालपट्टीनंतर उध्दव ठाकरे म्हणाले, भाजपा कोंबड्याच्या झुंजी लावतेय… शिवसेनेतील फूटी मागे भाजपा

शिवसेनेत एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर आमदारांपाठोपाठ, नगरसेवक आणि खासदारांनंतर आता माजी खासदारही एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी होत आहेत. त्यातच काल उध्दव ठाकरे यांनी आनंदराव अडसूळ आणि रामदास कदम यांच्यावर हकालपट्टीची कारवाई केल्यानंतर आज शिवसेना भवनात आयोजित बैठकीत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे काय बोलणार याबाबत उत्सुकता होती. त्यानुसार शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी पहिल्यादाच भाजपावर थेट आरोप करत या शिवसेनेतील फुटीमागे भाजपाच असल्याचा गंभीर आरोप केला. तसेच भाजपा दोन कोंबड्यात झुंज लावत असल्याची टीका केली.

शिवसेना भवनात आयोजित उत्तर भारतीय एकता मंचच्या पदाधिकाऱ्यांसोबत आयोजित बैठकीत बोलताना उध्दव ठाकरे म्हणाले की, शिवसेनेत फूट बंडखोरांनी नव्हे तर भाजपाने पाडली. भाजपाच शिवसेना संपवत आहे. भाजपा दोन कोंबड्यांमध्ये झुंज लावत आहे. त्यातील एक कोंबडा मेला की दुसऱ्या कोंबड्याला जेलमध्ये टाकतील. अशाप्रकारे त्यांची इच्छा पूर्ण होईल असा आरोपही केला.

तुम्ही माझ्याकडचे कितीही बाण न्या, धनुष्य माझ्याकडेच असल्याचंही ते म्हणाले.

एकनाथ शिंदे यांनी बंडखोर आमदरांसोबत भाजपाच्या मदतीने सरकार स्थापन केल्यानंतर उद्धव ठाकरे सातत्याने बैठका घेत आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेना भवनमध्ये उत्तर भारतीय एकता मंच आणि शिवसेना व्यापारी संघटनेची बैठक आयोजित करण्यात आली होती. उद्धव ठाकरेंनी यावेळी पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना भाजपावर टीका केली.

उद्धव ठाकरेंनी यावेळी शिवसेनेतील फुटीवर बंडखोर आमदार नव्हे, तर भाजपा असल्याचा आरोप केला. ते म्हणाले की, भाजपाच शिवसेना संपवत आहे. भाजपा दोन कोंबड्यांमध्ये झुंज लावत आहे. त्यातील एक कोंबडा मेला की दुसऱ्या कोंबड्याला जेलमध्ये टाकतील. अशाप्रकारे त्यांची इच्छा पूर्ण होईल.

उद्धव ठाकरेंनी यावेळी शिवसेना संपवण्याचा प्रयत्न सुरु असून, सतर्क राहा असा इशारा देत माझ्या भात्यामधील कितीही बाण न्या, पण ते चालवण्यासाठी लागणारं धनुष्य माझ्याकडे असल्याचेही ते म्हणाले.

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यातील अनेक शिवसेनेतील नेते शिंदे गटाला समर्थन देत आहेत. मात्र इतक्या दिवस उध्दव ठाकरे हे बंडखोरांवरच टीका करत होते. तसेच त्यांच्या सत्ता लालसेवरूनही टीका करत होते. मात्र पहिल्यांदाच उध्दव ठाकरे यांनी भाजपाला जबाबदार धरले आहे.

Check Also

पंतप्रधान मोदींच्या आमंत्रणावर शरद पवार यांची स्पष्टोक्ती, …राजकिय असोसिएशन कधीही नाही

लोकसभा निवडणूकसाठी आजपर्यंत तीन टप्प्यात मतदान झाले. या तिन्ही टप्प्यातील मतदानाची आकडेवारी पाहिली तर ती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *