Breaking News

राजकारण

Missionbeginagain अंतर्गत १५ ऑक्टोंबरपासून या गोष्टी सुरु होणार राज्य सरकारकडून अद्यादेश जारी

मुंबई: प्रतिनिधी राज्यात Missionbeginagain अंतर्गत अनेक गोष्टी पुन्हा सुरु करण्यासाठी परवानगी देण्यात येण्यात येणार होती. तसेच १५ ऑक्टोंबरपासून मुंबईची जीवन वाहिनी असलेली लोकल सेवा पुन्हा सुरु करण्यात येणार असल्याची चर्चाही मागील काही दिवसांपासून सुरु होती. मात्र या लोकल रेल्वे वगळता घाटकोपर ते अंधेरी-वर्सेाव्हा दरम्यान प्रवास करणाऱ्या मुंबईकरांना राज्य सरकारने दिलासा …

Read More »

राज्यपाल कोश्यारींना बडतर्फ करा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव नरसय्या आडम यांची मागणी

सोलापूर : प्रतिनिधी संविधानातील ‘धर्मनिरपेक्षता’ या पायाभूत तत्त्वाचा उपहास करून महाराष्ट्राच्या राज्यपालांनी संविधानाचा घोर औचित्यभंग केला आहे. राज्याला महामारीने ग्रासलेले असताना मंदिरासारखी सार्वजनिक आणि हमखास गर्दीची ठिकाणे उघडण्याचा अनाठायी सल्ला राज्यपालांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पत्राने दिला. इतकेच नव्हे, तर ते पत्र जाहीर केले. त्या पत्रातील भाषा सभ्यतेच्या मर्यादा ओलांडणारी आहेच, त्याशिवाय, …

Read More »

कांजूर मार्गची जागा अद्यापही वादातच; राज्याच्या तिजोरीवर परिणाम होणार विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची आरोप

मुंबई: प्रतिनिधी नियोजित आरेच्या जंगलातील मेट्रो कारशेड कांजूर मार्गला हस्तांतरीत करण्याचा निर्णय झाल्यानंतर सदरचा निर्णय पुर्णपणे चुकिचा असल्याचा पुन:रूच्चार करत हा कारशेड हलविण्याबाबत महाविकास आघाडी सरकारने स्थापन केलेल्या तज्ञ समितीने कांजूर मार्गची जमिन योग्य नसल्याचा निर्वाळा देत ही जमिन कायद्याच्या कचाट्यात असल्याचा अहवाल सादर केला असून त्यामुळे निर्माण होणाऱ्या आर्थिक …

Read More »

महाराष्ट्र घरेलु कामगार कल्याण मंडळ पुनर्जिवीत करणार महिला व बालकल्याण मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी कोरोना काळात घरगुती काम करणाऱ्या महिलांना बेरोजगारीचा, आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. या असंघटित क्षेत्रातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी राज्य शासनाचा भाग असलेले महाराष्ट्र घरेलु कामगार कल्याण मंडळ पुनर्जिवीत होणे गरजेचे असून त्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. त्यादृष्टीने तसेच मंडळाचे बळकटीकरण करुन या मंडळाद्वारे नव्या योजना राबविण्यासाठी अधिकाऱ्यांनी कृतीआराखडा तयार …

Read More »

ओबीसी आरक्षणाबाबत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली ही ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी मेळावा कार्यक्रमात

मुंबई : प्रतिनिधी ओबीसी आरक्षणाला धक्का लावणार आहे असा गैरसमज विरोधकांकडून पसरवला जातोय. मात्र धक्का लावलेला आम्हीही सहन करणार नाही हे लक्षात घ्या असे सांगतानाच महाराष्ट्रात अशा कोणत्याही कृतीला किंवा घटनांना राष्ट्रवादी पाठबळ देणार नाही असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज ओबीसी सेलच्या आढावा बैठकीत स्पष्ट केले. ओबीसीचे …

Read More »

काँग्रेसमुळे बिहारमधील निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर खासदार प्रफुल पटेल यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसने बिहार निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार प्रफुल पटेल यांनी प्रदेश कार्यालयात माध्यमांना दिली. काँग्रेस आणि राजदसोबत एकत्र निवडणूक लढण्याची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतली होती. बिहार काँग्रेसचे प्रभारी शक्ती सिंह गोहिल, वरिष्ठ नेते अहमद पटेल, तसेच राजदचे तेजस्वी यादव यांच्याशी …

Read More »

शेलार म्हणाले, मुख्यमंत्र्यांना देवभूमीतल्या राज्यपालांच्या प्रमाणपत्राचीच गरज: ऐका त्यांचा व्हिडिओ राज्यपाल कोश्यारींच्या मदतीला पुन्हा भाजपा धावली

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील मंदिरे, देवळे उघण्यासाठी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी पाठविलेल्या पत्राचा समाचार मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी घेत त्यांच्याच शब्दात उलट भाषेत उत्तर दिले. त्या उत्तराने राज्यपालांची ढासळत चाललेली प्रतिमा सावरण्यासाठी आता पुन्हा भाजपाच्या नेत्यांनी धाव घेतली. देवभूमीतून आलेल्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हिंदूत्वाच्या प्रमाणपत्राचीच खरी गरज मुख्यमंत्री ठाकरे यांना …

Read More »

राज्यपालांना मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिल्यानंतर भाजप आक्रमक म्हणे, संयमाची परीक्षा पाहू नका भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील

शिर्डी-मुंबई: प्रतिनिधी संत, महंत, वारकरी मंडळींच्या संयमाची आणखी परीक्षा न पाहता महाआघाडी सरकारने राज्यातील मंदिरे आणि अन्य धर्मियांची प्रार्थना स्थळे उघडण्यास त्वरीत परवानगी द्यावी. संत, महंत, वारकरी संप्रदायातील मंडळींवर मंदिरांत जबरदस्तीने घुसण्याची वेळ आणू नका, असा इशारा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी दिला. राज्यात मंदिरे आणि अन्य धार्मिक स्थळे उघडण्यास परवानगी द्यावी या मागणीसाठी …

Read More »

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे राज्यपाल कोश्यारींना तडाखेबंद उत्तर; वाचा त्यांच्याच शब्दात पाकव्याप्त काश्मीर म्हणविणाऱ्यांचे स्वागत करणाऱ्या आपणासारख्याकडून हिदुत्वाचे प्रमाणपत्र नको

राज्यातील मंदीरे उघडण्याबाबत भाजपासह त्यांच्या अंकित संस्थांनी राज्य सरकारच्या विरोधात आंदोलने केली. मात्र कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे राज्यातील मंदीरे सुरू करण्याबाबत राज्य सरकारकडून आस्ते कदम उलण्यात येत आहेत. यापार्श्वभूमीवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांना भाजपअंकित संघटनांच्या शिष्टमंडळांनी दिलेल्या पत्राचे संदर्भ पाठवित राज्यातील मंदीरत उघडण्याची सूचना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना केली. परंतु …

Read More »

मुंबईत वीजपुरवठा खंडीत होणे ही शरमेची बाब माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्यातील सद्यपरिस्थिती पाहता मुंबई शहरामध्ये सकाळपासून वीज पूरवठा खंडीत होणे ही महाराष्ट्राच्या इतिहासातील दुर्भाग्यपूर्ण घटना आहे. अशा घटना केवळ जबाबदार व्यक्तीच्या हलगर्जीपणामुळे घडतात अशी टीका माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. मुंबई शहरात २ हजार मेगावॅटच्या वीज वाहिन्या बंद पडल्यामुळे कोरोना रूग्णांना, लोकांना अतोनात हाल सहन …

Read More »