Breaking News

राजकारण

महाविकास आघाडीच्या विरोधात भाजपा प्रदेश कार्यसमितीची गुरुवारी पहिली बैठक प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी भारतीय जनता पार्टीच्या नवनियुक्त प्रदेश कार्यसमितीची पहिली बैठक गुरुवार ८ ऑक्टोबर रोजी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून बैठकीत राज्याच्या राजकीय परिस्थिती सोबत महिलांवरिल वाढत्या अत्याचाराच्या घटनांबाबत चर्चा करण्यात येईल. शेतकरी व कामगारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने केलेल्या कायद्यातील ऐतिहासीक सुधारणांबाबत बैठकीत ठराव संमत करण्यात …

Read More »

अल्पसंख्याकांचे शासकीय सेवेतील प्रमाण वाढविण्यासाठी योजना : शासन निर्णय जाहीर कौशल्य विकास आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी अल्पसंख्याक समाजाचे शासकीय सेवेतील प्रमाण वाढावे याकरीता राबविण्यात येत असलेल्या युपीएससी स्पर्धापूर्व प्रशिक्षण योजनेंतर्गत प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात प्रति महिना २ हजार रुपयांवरुन ४ हजार रुपये इतकी वाढ करण्यात आल्याची माहिती कौशल्य विकास आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली. यासंदर्भातील शासन निर्णय आज निर्गमित करण्यात आला. …

Read More »

सुशांतसिंग राजपुतप्रकरणातील फेसबुक आणि ट्वीटर फेक अकाऊंटचे मालक कोण? राष्ट्रवादी काँग्रेसचा सवाल

मुंबई : प्रतिनिधी फेसबुक आणि ट्वीटरने फेक अकाऊंटचे मालक कोण? ही फेक अकाऊंट कुठल्या आयपी अड्रेसवरून करण्यात आली याची माहिती द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी पत्रकार परिषदेत केली. महाविकास आघाडी सरकारला आणि मुंबई पोलिसांना बदनाम करण्याचा प्रयत्न भाजपाच्या आयटी सेलच्या माध्यमातून करण्यात आल्याचा आरोप करत …

Read More »

क्लार्क पदांची भरती प्रक्रिया एमपीएससीमार्फत करण्याचा विचार सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील शासकीय विभागांची सर्व लिपिक संवर्गातील पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून भरण्याच्या अनुषंगाने सकारात्मक विचार करण्यात येईल, असे सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले. महाराष्ट्र लोकसेवा अयोगाशी (एमपीएससी) निगडित बाबींची आढावा बैठक भरणे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झाली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस आमदार रोहित पवार, …

Read More »

आशिष शेलार यांच्या याचिकेवर उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला दिले हेआदेश ४ नोव्हेंबर २०२० पर्यत प्रतिज्ञा पत्र सादर करण्याचे आदेश

मुंबई: प्रतिनिधी कोरोना बाधित रुग्णांवर शासकिय रूग्णालयात उपचार सुरु असताना त्या रूग्णांची पुरेशी काळजी घेतली नसल्याच्या १० घटनांप्रकरणी भाजपा आमदार आशिष शेलार यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. या होत असलेल्या बेजबाबदारी प्रकरणी राज्य सरकारला ४ नोव्हेंबर पर्यत प्रतिज्ञा पत्र सादर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने आज दिले. मुख्य न्यायाधीश दिपंकर दत्ता …

Read More »

वाचा, दिवाळीनंतर शाळेचे कोणते वर्ग सुरु होणार कोणते नाही शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांची माहिती

अचलपूर : प्रतिनिधी एकाबाजूला कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चाललेला असला तरी दुसऱ्या बाजूला राज्यातील शाळा सुरु करण्यासंदर्भात केंद्र सरकारने राज्य सरकारंना परावनगी दिली. त्यामुळे राज्यातील शाळा कधी सुरु होणार याकडे साऱ्या पालकांचे लक्ष लागून राहीले. अखेर शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिवाळीनंतर ९ वी ते १२ वी पर्यंतच्या शाळा सुरु …

Read More »

महाराष्ट्र शासन संचालित होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालय सुरु करणार वैद्यकिय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांची माहिती

बीड : प्रतिनिधी महाराष्ट्र शासन संचालित होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालय सुरू व्हावे यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले. सोनाजीराव होमिओपॅथीक वैद्यकीय कॉलेज तर्फे “केशरबाई सोनाजी क्षीरसागर” उर्फ “केशरबाई काकू” यांच्या स्मृती प्रित्यर्थ वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. या वेबिनारला वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख प्रमुख …

Read More »

‘बेटी बचाओ’चा नारा देणारे पंतप्रधान मूग गिळून गप्प का? हाथरस पीडित कुटुंबियांना न्याय देण्याच्या मागणीसाठी सोमवारी काँग्रेसचा सत्याग्रह: थोरात

मुंबई: प्रतिनिधी उत्तर प्रदेशातील हाथरसच्या घटनेने देशाला शरमेनं मान खाली घालायला लावली पण भाजपाच्या योगी आदित्यनाथ सरकारची थोडीही संवेदना जागी झाली नाही. हे प्रकरण अत्यंत बेजबाबदारपणे व हुकुमशाही पद्धतीने हाताळण्यात आले. पीडित कुटुंबाला न्याय देण्याऐवजी त्यांना धमक्या देण्यापर्यंत उत्तर प्रदेश सरकारची मजल गेली. पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेस पक्ष …

Read More »

विद्यार्थ्यांनो घाबरू नका, परिक्षा पुन्हा घेणार उच्च शिक्षण व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांचे आश्वासन

मुंबई : प्रतिनिधी अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परिक्षा घेण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर राज्यातील अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परिक्षा घेण्याच्या अनुषंगाने राज्य सरकारने तयारी केली. तसेच कोरोनापासून विद्यार्थ्यांचा बचाव व्हावा यादृष्टीकोनातून या परिक्षा ऑनलाईन घेण्याचा निर्णय सर्व विद्यापीठांनी घेतला. मात्र ऑनलाईनमधील तांत्रिक कारणामुळे अनेकांना परिक्षाच देता आली नसल्याने हवालदिल झालेल्या विद्यार्थ्यांना उच्च …

Read More »

आता बिअर बार आणि रेस्टॉरंट सुरु केल्यानंतर हे नियम पाळावे लागणार पर्यटन विभागाकडून नियमावली जारी

मुंबई : प्रतिनिधी Missionbeginagain अंतर्गत अनलॉक-५ नुसार राज्यातील रेस्टॉरंट ५ ऑक्टोंबरपासून सुरु करण्यास राज्य सरकारने नुकतीच परवानगी देत यासंदर्भातील नियमावली जाहीर करणार असल्याचे स्पष्ट केले. त्यानुसार रेस्टॉरंट सुरु करण्यासंदर्भातील नियमावली राज्याच्या पर्यटन विभागाकडून आज जारी करण्यात आली. जाहीर करण्यात आलेली नियमावली खालील प्रमाणे.. बिअर बार, फुड कोर्ट, रेस्टॉरंट आदी गोष्टी …

Read More »