Breaking News

राजकारण

महाविकास आघाडी सरकार विरोधातील याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली मागणी राष्ट्रपतींना ऐकवा सांगत याचिकाकर्त्यांना फटकारले

नवी दिल्ली: प्रतिनिधी बॉलीवूड अभिनेता स्व. सुशांतसिंग राजपूत यांच्या आत्महत्याप्रकरणी करण्यात आलेल्या तपासात योग्य पध्दतीने करवाई झालेली नसल्याने महाराष्ट्रातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार बरखास्त करुन राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी करणारी याचिका आज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. तसेच अशा पध्दतीची मागणी करायची असेल तर ती …

Read More »

मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित म्हणाले, ओला दुष्काळ जाहीर करून तातडीने मदत द्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची मागणी

मुंबई : प्रतिनिधी परतीच्या पावसाने मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक नुकसान झाले असून, या नुकसानीची व्याप्ती पाहता ओला दुष्काळ जाहीर करून तातडीने शेतकर्‍यांना थेट मदत देण्यात यावी, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून केली. गेल्या ३/४ दिवसांत परतीच्या पावसाने मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये अक्षरश: …

Read More »

भाजपाची ती मागणी म्हणजे राजकीय द्वेष आणि तेढ पसरवण्यासाठीच अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचा पलटवार

मुंबई : प्रतिनिधी सुडबुद्धीने… राजकीय द्वेष पसरवण्यासाठी… जनतेमध्ये तेढ निर्माण करण्यासाठी भाजपाची लोकं मदरशाचे अनुदान बंद करण्याची मागणी करत आहेत असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला. वर्षभरापूर्वी आणि त्याआधी पाच वर्षे तुमची सत्ता असताना ही संकल्पना का सुचली नाही याचं उत्तर जनतेला …

Read More »

नैसर्गिक आपत्तीत केंद्र सरकारने महाराष्ट्राला भरीव आर्थिक मदत द्यावी राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी - महसूल मंत्री थोरात

मुंबई : प्रतिनिधी यावर्षीच्या मान्सूनने आधी विदर्भात पूरस्थिती निर्माण केली होती तर आता परतीच्या पावसाचाही मोठा फटका सोलापूर, उस्मानाबाद, पुणे, सांगलीसह राज्याच्या इतर भागालाही बसला आहे. अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतातील उभी पिकंही वाया गेली आहेत. या नैसर्गिक आपत्तीच्या वेळी राज्य सरकार शेतकऱ्यांचा पाठीशी खंबीरपणे उभे असून नुकसानीचे …

Read More »

…तर रूग्णालयांवर कारवाई करा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

पुणे : प्रतिनिधी कोरोनाबाधित रुग्ण म्हणून खासगी रुग्णालयात दाखल झाल्यानंतर काही रुग्णालये महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यास टाळाटाळ करीत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहे. त्यामुळे अशा रुग्णालयावर कार्यवाही करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले. तसेच ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेचा दुसरा टप्पा …

Read More »

सिनेमागृहे सुरु करण्याबाबत विचार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आश्वासन

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील सिनेमागृहे सुरु करण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभागाने पुढाकार घेऊन याबाबत एसओपी (आदर्श कार्यपद्धती) तयार केल्या आहेत. या एसओपी निश्चित झाल्यावर सिनेमागृहे सुरु करण्याबाबत विचार करण्यात येईल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. कोविड – 19 मुळे राज्यातील सिनेमागृहे गेल्या सहा महिन्यांहून अधिक काळ बंद असून याअनुषंगाने मुख्यमंत्री …

Read More »

इतक्या शाळांना मिळणार अनुदान अनुदानामुळे शिक्षक, कर्मचाऱ्यांना लाभ

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील विनाअनुदानित प्राथमिक व उच्च माध्यमिक शाळांना पुन्हा एकदा अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यानंतर सध्याच्या कोरोना काळामुळे हे अनुदान मिळणे अशक्य वाटत होते. मात्र या शाळांना २० टक्के अनुदान वितरीत करण्याचा निर्णय सरकारने घेतला असून या निर्णयाचा एकूण २१६५ शाळांना २० टक्के देण्याचा निर्णय घेतला असून …

Read More »

राज्यातील विद्यापीठांमधील शिक्षकेत्तर कर्मचा-यांना ७ वेतन आयोग लागू राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील अकृषी विद्यापीठांमधील शिक्षकेत्तर कर्मचा-यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.  सुधारित वेतनश्रेणी १ नोव्हेंबर २०२० पासून लागू होईल. राज्यातील अकृषी विद्यापीठांमधील शिक्षकेत्तर कर्मचा-यांना पाचव्या व सहाव्या वेतन आयोगानुसार ज्या पदांची वेतनश्रेणी अचूक आहे तसेच ज्या पदांची पाचव्या वेतन आयोगाची वेतनश्रेणी …

Read More »

कोविडमुळे सहकारी संस्थांना मिळाले हे खास अधिकार संचालक मंडळ बनले शक्तीशाली

मुंबई: प्रतिनिधी कोविडमुळे सहकारी संस्थांची वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यास मार्च २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्याची कार्यवाही सुरु आहे.  मात्र, या मुदतवाढीमुळे महत्त्वाच्या विषयांना मंजुरी देण्याबाबत विलंब लागू शकतो म्हणून मंजुरीचे अधिकार वार्षिक सर्वसाधारण सभेऐवजी संचालक मंडळास देण्याबाबत सहकारी संस्था अधिनियमात दुरुस्ती करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. यास्तव, संस्थेमधील …

Read More »

राज्य निवडणूक विभागाचा स्वतंत्र दर्जा रद्द राज्य सरकारचा निर्णय

मुंबई: प्रतिनिधी राज्य निवडणूक विभाग असा नवीन विभाग निर्माण करण्याचा १४ ऑगस्ट २०१९ चा शासन निर्णय रद्द करून पूर्वी प्रमाणेच सामान्य प्रशासन विभागाची एक शाखा म्हणून मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय म्हणून यापुढे ओळखण्यात येणार आहे. तसेच राज्य निवडणूक विभागाचा स्वतंत्र असलेला दर्जाही आजच्या निर्णयाने रद्द करण्यात आला आहे. राज्य मंत्रिमंडळाने …

Read More »