Breaking News

राजकारण

अखेर नाराज खडसेंनी भाजपाला सोडचिठ्ठी दिल्याची घोषणा राष्ट्रवादीकडून २३ तारखेला पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होणार असल्याची प्रदेशाध्यक्ष पाटील यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी गेल्या चार वर्षापासून माझ्यावर अन्याय होत असल्याची भावना वेळोवेळी जाहीरपणे बोलून दाखविणारे भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी अखेर आज सका‌ळी भाजपाला सोडचिठ्ठी देत लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची अधिकृत माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज दुपारी दिली. एकनाथ खडसे यांच्यावर भाजपामध्ये अन्याय झाला …

Read More »

महाविकास आघाडी सरकार केंद्राच्या कामगार कायद्यातही बदल करणार कामगार संघटनांना सूचना पाठविण्याचे कामगार मंत्र्यांचे आवाहन

मुंबई : प्रतिनिधी केंद्र शासनाने कामगार विभागाअंतर्गत विविध २९ कामगार कायदे एकत्रित करून वेतन संहिता २०१९, औद्योगिक संबंध संहिता २०२०, सामाजिक सुरक्षा संहिता २०२०, व्यावसायिक सुरक्षा आरोग्य आणि कार्यस्थळ परिस्थिती संहिता २०२० विधेयके २३ सप्टेंबर रोजी पारित केली आहेत. या नवीन संहितेबाबत विविध कामगार संघटनांनी लेखी सूचना कळवाव्यात, असे कामगार मंत्री दिलीप वळसे -पाटील …

Read More »

राज्यात एकाचवेळी १०६१ पोलीस अंमलदार झाले पोलीस उप निरीक्षक गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिल्या शुभेच्छा

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील १०६१ पोलीस अंमलदार यांची पोलीस उप निरीक्षक पदावर पदोन्नती झाली आहे. नवीन पदावर अधिक जोमाने कार्यरत रहा, तुमच्या सर्वांकडून अधिक उत्तम कामाची अपेक्षा आहे, अशा शुभेच्छा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पदोन्नत झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत. पोलीस महासंचालक कार्यालयाने राज्यातील १०६१ पोलीस अंमलदारांना पोलीस उप निरीक्षक या पदावर पदोन्नती …

Read More »

पंतप्रधान मोदींनी जनतेला इशारा देत हात जोडून केली ही विनंती कोरोनावरील औषध आल्याशिवाय ढिलेपणा चालणार नाही

मुंबई : प्रतिनिधी आंतरराष्ट्रीयस्तराचा विचार केला तर भारतात दर १० लाख लोकांमागे ५ हजार नागरीक कोरोनाग्रस्त आहेत. तर याच दर पाच हजारजणा मागे ८३ जणांचा मृत्यू होत असून ही संख्या तशी कमी आहे. कारण आपण खबरदारी म्हणून खुप काळजी घेत आहोत. मात्र आता सणासुदीचे दिवस असल्याने बाजारात आणि इतर ठिकाणी …

Read More »

काँग्रेसचे मंत्री म्हणाले …तर भाजपा नेत्यांचे आम्ही अभिनंदन करू केंद्राने महाराष्ट्राच्या हक्काचे ३० हजार कोटी द्यावेत!: बाळासाहेब थोरात

मुंबई : प्रतिनिधी कोरोना  पाठोपाठ अतिवृष्टीमुळे राज्यासमोर आर्थिक संकट निर्माण झाले आहे. मात्र राज्यातल्या भाजपा नेत्यांनी मोठमोठ्या गोष्टी करण्यापेक्षा केंद्र सरकारकडे अडकलेले राज्याच्या हक्काचे ३० हजार कोटी रूपये आणण्यासाठी आणि शेतकऱ्यांसाठी भरघोस निधी आणण्यासाठी प्रयत्न करून आणावा आम्ही त्यांचे अभिनंदन करू असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात …

Read More »

राज्यातील १५ आयएएस अधिकाऱ्यांच्या झाल्या बदल्या…वाचा कोण कुठे बदलून गेले प्रविण दराडे, डॉ. अश्विनी जोशी, डॉ.कलशेट्टी, डॉ.सुधाकर शिंदे यांच्यासह अन्य जणांचा समावेश

मुंबई : प्रतिनिधी राज्यावर कोसळलेल्या अतिवृष्टी संकटामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्याच्या दौऱ्यावर मुख्यमंत्र्यांसह राज्य मंत्रिमंडळातील बहुतांष मंत्री असताना आज १५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. यामध्ये ज्येष्ठ सनदी अधिकारी प्रविण दराडे आणि त्यांच्या पत्नीं पल्लवी दराडे यांच्यासह अन्य १५ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. सनदी अधिकारी प्रविण दराडे यांची समाज कल्याण …

Read More »

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपत्तीग्रस्तांना धीर देत म्हणाले…. तुम्ही सुरक्षित रहा, तुमची काळजी शासन घेईल

अक्कलकोट : प्रतिनिधी आपत्तीग्रस्त शेतकरी, घरांची पडझड झालेले नागरिक यांच्या पाठिशी शासन खंबीरपणे उभे राहील. कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही. तुम्हाला दिलासा देण्यासाठी आम्ही आलो आहोत. तुम्ही सुरक्षित रहा, तुमची काळजी शासन घेईल, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना धीर दिला. मुख्यमंत्री ठाकरे यांनी आज सोलापूर जिल्ह्याच्या अक्कलकोट तालुक्यातील रामपूर येथे आपत्तीग्रस्त …

Read More »

पवारांची स्पष्टोक्ती अतिवृष्टीच्या निमित्ताने राज्यावर आर्थिक संकट, पण दिले हे आश्वासन मुख्यमंत्र्यांशी बोलून विनंती करणार पाहणी दौऱ्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांची माहिती

तुळजापूर: प्रतिनिधी संकटाचं स्वरूप लक्षात घेता स्थानिक लोकांशी बोलल्यावर आणि प्रत्यक्षात पाहिल्यावर महाराष्ट्राच्या इतिहासात राज्यावर आर्थिक संकटही आलं नाही. पण या पावसाने आणलंय. त्यामुळे आता या संकटातून लोकांना बाहेर काढण्यासाठी कर्ज काढण्याशिवाय गत्यंतर नाही आणि ते कर्ज आपण काढणार असल्याचे सांगतानाच मुख्यमंत्र्यांशी बोलून कर्ज काढण्याची विनंती करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी …

Read More »

मंदिरप्रश्नी आंदोलन करणारी भाजपा महिलांच्या लोकल प्रवासावर गप्प का ? रेल्वेमंत्री पियुष गोयल मुंबईच्या महिलांना उत्तर देण्याची काँग्रेसची मागणी

मुंबई : प्रतिनिधी मुंबईसह एमएमआर भागातील महिलांना नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून लोकल प्रवास करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली असताना रेल्वेकडून मात्र आता वेळकाढूपणा केला जात आहे. राज्य सरकार, महापालिका व रेल्वे अधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय आधीच झाला होता, असे असताना स्वतःच्या अधिकारात निर्णय घेता येत असतानाही जाणिवपूर्वक टाळाटाळ केली जात आहे. १७ तारखेपासून …

Read More »

मुख्यमंत्री म्हणाले, आपण सगळे घेवूया ‘MAH कसम’ कोरोनाविरूध्दची लढाई निर्णयाक वळणावर असल्याने आजही मास्क हीच आपल्यासाठी लस

रत्नागिरी : प्रतिनिधी कोरोना विरुध्दचा लढा आता निर्णायक वळणावर आला आहे. यावर  लस प्राप्त होईपर्यंत मास्कच उत्तम लस ठरणार आहे, याची जाण ठेवा आणि इतरांना जाणीव करुन द्या. कोरोनाची दुसरी लाट येवू द्यायची नाही यासाठी MAH अर्थात मास्क, अंतर आणि हातांची स्वच्छता अशी ‘मा कसम’ सर्वांनी घ्यावी असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरी रुग्णालयातील प्लाझ्मा थेरपीसाठीच्या …

Read More »