Breaking News

राजकारण

राणेंनी मुख्यमंत्र्यांबद्दल केलेले वक्तव्य हे पंतप्रधान मोदींचे वक्तव्य समजावे लागेल राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची टीका

मुंबई: प्रतिनिधी केंद्रात नव्याने मंत्री झालेल्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेले वक्तव्य हे त्यांचे नसून नरेंद्र मोदी यांचं वक्तव्य समजावं लागेल कारण त्यांनीच नारायण राणे यांना मंत्री केले आहे असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना केला. दरम्यान …

Read More »

हिंदूंच्या प्रेतांची गंगा नदीत अवहेलना करणाऱ्यांना हिंदूचे नाव घेण्याचा अधिकार नाही ‘व्यर्थ न हो बलिदान, चलो बचाये संविधान’, अभियान नांदेडमध्ये संपन्न

नांदेड: प्रतिनिधी देशाला मिळालेले स्वातंत्र्य सहजासहजी मिळाले नसून ते मोठ्या कष्टाने मिळाले आहे, अनेकांनी त्यासाठी सर्वोच्च बलिदान दिले आहे. या स्वातंत्र्यचळवळीत काँग्रेस पक्षाचा मोठा सहभाग राहिला आहे. महाराष्ट्र नेहमीच देशाला दिशा दाखवणारे राज्य असून स्वातंत्र्य चळवळीतही ‘भारत छोडो’सह अनेक महत्वाच्या आंदोलनाची पायाभरणी महाराष्ट्रात झाली. देशाच्या स्वातंत्र्यचळवळीत महाराष्ट्राने मोठे योगदान दिले …

Read More »

लोकसंख्या, प्रभाग रचना नकाशे पालिकेने मागविले जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग

सातारा : प्रतिनिधी सातारा पालिकेने प्रारूप प्रभाग रचनेचे नकाशे व लोकसंख्या वाढीचा अचूक तपशील जनगणना आयोगाकडून मागविला आहे. त्यामुळे सातारा पालिकेच्या वर्तुळात राजकीय समीकरणांना वेग आला आहे. पालिकेने निवडणूकीच्या दृष्टीने प्रशासकीय तयारी सुरू करण्यात आली आहे. मंगळवारी राज्य निवडणूक आयोग, जिल्हाधिकारी व मुख्याधिकारी यांची ऑनलाईन बैठक मंगळवारी झाली. मात्र बैठकीत …

Read More »

नारायण राणे यांच्या विरोधात महाड आणि नाशिकमध्ये कोणते गुन्हे दाखलः जाणून घ्या शहर शिवसेनेच्या वतीने महामार्गावर निदर्शने

नाशिक -महाडः प्रतिनिधी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर नाशिक आणि महाड येथे गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर नेमके कोणते गुन्हे दाखल करण्यात आले ते जाणून घेवूया. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाडमध्ये जन आशीर्वाद यात्रे दरम्यान भाष्य करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आक्षेपार्ह भाषा वापरल्याने महाडमध्ये शिवसैनिकांनी संताप व्यक्त …

Read More »

केंद्रीय मंत्री राणे यांना अटक करण्याचा प्रयत्न ही महाविकास आघाडीची सूडबुद्धी केंद्रीय मंत्री राणे यांना अटक करण्याचा प्रयत्न ही महाविकास आघाडीची सूडबुद्धी

मुंबईः प्रतिनिधी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करण्याचा प्रयत्न ही सूडबुद्धी आहे, अशी खरमरीत टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी केली. नियम ध्यानात घेता राणे केंद्रीय मंत्री असल्याने त्यांना अटक करता येणार नाही, तरीही कोकणात जन आशिर्वाद यात्रेला मिळणारा प्रचंड प्रतिसाद रोखण्यासाठी राजकीय हेतूने अटक करण्याचे वातावरण निर्माण …

Read More »

जनतेच्या अपेक्षा जाणून घेण्यासाठी आणि योजना पोहोचविण्यासाठी जन आर्शिवाद यात्रा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे प्रतिपादन

रायगड: प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने गेल्या ७ वर्षांत अनेक लोकोपयोगी योजना आखल्या आहेत. या योजना सामान्य माणसापर्यंत पोहचवून आणखी चांगले काम करण्यासाठी जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी जन आशीर्वाद यात्रा काढण्यात आल्या, असे प्रतिपादन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी केले. पाली (जि. रायगड ) येथे केंद्रीय मंत्री नारायण …

Read More »

ग्रामीण महाराष्ट्रासाठी खुशखबर : बंद करण्यात आलेलेल्या या गोष्टी पुन्हा सुरु होणार राज्यात कला केंद्र, आठवडे बाजार आणि यात्रा लवकर सुरु करण्याबाबत शासन सकारात्मक-सांस्कृतिक कार्य मंत्री

मुंबई: प्रतिनिधी मागील दिड वर्षापासून राज्याच्या ग्रामीण भागातील आठवडी बाजार, कला केंद्रे, यात्रा आदी गोष्टी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आलेले आहेत. मात्र शहरी भागात सध्या काही निर्बंध शिथिल करण्यात आलेले आहेत. त्या धर्तीवर या बंद करण्यात आलेल्या गोष्टी पुन्हा सुरु करण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक असून यासंदर्भात लवकरच निर्णय होण्याची शक्यता …

Read More »

कोरोनामुळे अखेर उत्सवात दहीहंडी न फोडताच राहणार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे दहीहंडी पथकांना आवाहन

मुंबई : प्रतिनिधी काही काळासाठी आपले सणवार, उत्सव बाजूला ठेऊन जनतेचे प्राण वाचवण्याला महाराष्ट्राने प्राधान्य दिले हा संदेश आपण सर्वमिळून जगाला देऊया, संयम आणि धीराने आधी कोरोनाला हद्दपार  करूया, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करत दहिहंडी उत्सव साजरा करण्यास यंदाही परवानगी नाकारली.. शासनाचे प्रथम प्राधान्य हे जनतेचे प्राण वाचवण्याला असल्याचे …

Read More »

जिल्हा बँकेच्या सत्ताकारणासाठी भाजपाचे शिवेंद्रराजे भोसले राष्ट्रवादीसोबत महाविकास आघाडीच्या फॉर्म्यूल्याबरोबर काँग्रेस आणि भाजपाही राहणार दूर

सातारा: प्रतिनिधी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेत राष्ट्रवादी काँग्रेसची  सत्ता असूनही केवळ मते जास्त असल्याने आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले  यांना सोबत घ्यावे लागत आहे. पण, सर्वाधिक मते सातारा, फलटण व कऱ्हाड तालुक्यांत असल्याने विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, सहकार तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, आमदार मकरंद पाटील  यांच्यावरही या निवडणुकीची मदार असणार …

Read More »

काँग्रेस पदाधिकाऱ्यानेच केली मंत्री केदार यांना मंत्रिमंडळातून बडतर्फीची मागणी काँग्रेस संसदीय समितीचे सदस्य डॉ.आशिष देशमुख यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

नागपूर- मुंबई: प्रतिनिधी राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनिल केदार यांनी नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेसह अन्य तीन बँकांना ८०० कोटी रूपयांचा चुना लावला आहे. विशेष म्हणजे स्वत:चे निर्दोषत्व सिध्द करण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या लीगल सेलच्या अध्यक्षालाच सरकारी वकील म्हणून नियुक्त करून स्वत:चा बचाव करत असून सदरचा सरकारी वकील बदलावा आणि पदुम …

Read More »