Breaking News

राजकारण

बावचळलेले राऊत आता भोक पडलेल्या फुग्याला एवढे का घाबरतायेत? भाजपा आमदार गोपीचंद पडकरांची शिवसेना प्रवक्ते खा. संजय राऊतांवर टीका

सांगली-मुंबई: प्रतिनिधी आपल्या हुजरेगिरीमुळे बावचळलेले राऊत आता भोक पडलेल्या फुग्याला एवढे का घाबरतायेत? असा खोचक सवाल करत असंतर नाही की राणे साहेबांचा फुगा तुमच्याविषयीच्या गुपीतांनी भरलेला आहे. तो फुटला तर तुमच्या तिन्ही धन्यांचा तुमच्यावरचा विश्वास उडून जाईल अशी बोचरी टीका भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी शिवसेना प्रवक्ते खा. संजय राऊत …

Read More »

भाजपच्या पोकळ धमक्यांना महाराष्ट्रातील कुठलाही नेता घाबरत नाही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांची टीका

मुंबई: प्रतिनिधी सत्तेचा कितीही दुरुपयोग करा, परंतु भाजपच्या पोकळ धमक्यांना महाराष्ट्रातील कुठलाही नेता घाबरत नाही नसल्याचे सांगत भाजपने महाविकास आघाडी सरकारच्या मंत्री व नेत्यांना दिलेल्या धमक्यांवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी भाजपला सुनावले. भाजपला जे करायचे आहे ते करावे. कुणाच्याही विरोधात तक्रार दाखल करावी. …

Read More »

शिवसेना आमदार दानवेंनी काढली भाजपाच्या दाव्यातील हवा ते वक्तव्य पालघर निवडणूकीच्या वेळचे

औरंगाबाद-मुंबई : प्रतिनिधी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा अवमान करणारे वक्तव्य मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केल्याचा आरोप भाजपाकडून करण्यास सुरुवात झाली. मात्र भाजपाकडून करण्यात येत असलेला तो आरोप उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदावर असताना केला नसून तो मुख्यमंत्री होण्याआधी पालघर येथील पोटनिवडणूकीत केल्याचा दावा शिवसेनेचे विधान परिषद आमदार अंबादास …

Read More »

योगी आदित्यनाथ यांचा अवमान केल्याप्रकरणी आता भाजपाकडून मुख्यमंत्र्यांच्या विरोधात तक्रारी यवतमाळ पाठोपाठ नाशिकमध्येही अर्ज दाखल

नाशिक-मुंबई: प्रतिनिधी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी शिवसेनेकडून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात तक्रारी दाखल केल्यानंतर आता भाजपाकडून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या विरोधात तक्रारी दाखल करण्यासाठी आक्रमक पवित्रा घेतला असून यवतमाळमध्ये तक्रार अर्ज दाखल केल्यानंतर आता नाशिकमध्येही उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात वक्तव्य केल्याप्रकरणी तक्रार …

Read More »

अनिल परबांच्या त्या क्लिपची सीबीआय चौकशी करा संयमी माणसासोबत राहूनही शिवसेना संकुचित का राहते ? आशिष शेलार यांचा सवाल

मुंबई: प्रतिनिधी ज्यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे अटक झालेली नव्हती, त्यापुर्वीच राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब दूरध्वनीवरुन अनेक संशयास्पद बाबी बोलत असल्याची ध्वनी फित समोर आली आहे. राणे यांच्या अटकेसाठी पोलीस यंत्रणेवर  दबाव आणत होते, न्यायालयाबाबत काही गंभीर विधाने करुन अपमान करीत असल्याची व्हिडीओ क्लीप समोर आल्याने या संपूर्ण प्रकरणाची केंद्रीय गुप्तचर विभागामार्फत …

Read More »

नाशिक गुन्हेप्रकरणात नारायण राणेंना उच्च न्यायालयाचा तुर्त दिलासा १७ सप्टेंबर पर्यंत कठोर कारवाई न करण्याचे आदेश

मुंबईः प्रतिनिधी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी नाशिक सायबर पोलिसांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या गुन्हे प्रकरणात १७ सप्टेंबर पर्यत कोणतीही कारवाई करून नये असे आदेश नाशिक पोलिसांना देत मुंबई उच्च न्यायालयाने राणे यांना तात्पुरता दिलासा दिला. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी …

Read More »

नारायण राणेंचा पुन्हा सूचक शब्दातून इशारा, माझं कोणीच काही करु शकत नाही यात्रा पुन्हा सुरु होणार असल्याचे सांगत त्यांना एकटा पुरून उरलोय

मुंबई: प्रतिनिधी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याबद्दल विधान केल्याप्रकरणी पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर जामिनावर बाहेर आलेले केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज पुन्हा एकदा शिवसेना आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे नाव न घेता पुन्हा थेट इशारा दिला. माझं कोणीच काही करू शकत नाही. तुम्हालाही मुलं-बाळं नाहीत का असे वक्तव्य करत मी तुम्हा …

Read More »

राणे यांना सूडबुद्धीने अमानुष वागणूक, तरीही त्यांची जन आशिर्वाद यात्रा होणारच भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची घोषणा

पुणे : प्रतिनिधी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची न्यायालयाने जामीनावर मुक्तता केल्यामुळे सत्याचा विजय झाला आहे. ठाकरे सरकारने सूडबुद्धीने अमानुष वागणूक दिल्यामुळे नारायण राणे यांची तब्येत बिघडली. पण ते बरे झाल्यानंतर त्यांची कोकणातील जन आशिर्वाद यात्रा लवकरच पुन्हा सुरू होईल, असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी पुण्यात पत्रकारांना सांगितले. केंद्रीय …

Read More »

नारायण राणेंना आधी न्यायालयीन कोठडी नंतर अटींवर जामीन मंजूर जिल्हा सत्र न्यायालयातील सुनावणी दरम्यान दिला निर्णय

महाड: प्रतिनिधी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना रत्नागिरी पोलिसांनी गोळवली येथून जेवत असताना अटक करून त्यांना महाड पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यानंतर रात्री उशीरा महाड येथील सत्र न्यायालयात त्यांना हजर करण्यात आले. त्यावेळी सुरूवातीला राणे यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली. मात्र १५ मिनिटाच्या अंतरानंतर …

Read More »

बैलगाडी शर्यतींबाबत महिनाभरात मार्ग काढणार पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांचे आश्वासन

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील बैलगाडी शर्यतीची प्राचीन सांस्कृतिक परंपरा लाभलेली आहे. पारंपरिक वारसा व शेतकऱ्यांचा आवडता छंद म्हणून बैलगाडी शर्यतीकडे पाहिले जाते. बैलगाडी शर्यतीच्या आवडीमुळे देशी जनावरांचे गाय आणि बैलांचे चांगल्या पद्धीने संगोपन केले जाते. या करीता बैलांचा सराव आणि शर्यत पूर्ववत सुरु करण्यासाठी महिन्याभरात मार्ग काढण्यात येणार असल्याचे, पशुसंवर्धन …

Read More »