Breaking News

राजकारण

अनिल देशमुखांची स्पष्टोक्ती, या गोष्टीनंतरच मी ईडीसमोर न्यायालयीन प्रक्रिया झाल्यानंतरच जाणार

नागपूर: प्रतिनिधी मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी १०० कोटी खंडणी वसुलीचे आरोप तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केल्यानंतर लागलेले शुक्लकाष्ठ काही केल्या थांबायला तयार नाही. सर्वोच्च न्यायालयाने देशमुख यांची याचिका फेटाळत त्यांना खालच्या न्यायालयात जाण्यास सांगितले, तर ईडीसंदर्भातील याचिका न्यायालयाने स्विकारल्याचे सांगत या गोष्टींचा निकाल लागल्याशिवाय आफण ईडीसमोर …

Read More »

आघाडीमुळे तिन्ही पक्षांचा श्वास कोंडला विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

मुंबई : प्रतिनिधी भारतीय जनता पार्टीच्या विरोधात तीन पक्षांनी आघाडी केल्यामुळे त्या पक्षांचा अवकाश कमी होऊन श्वास कोंडला गेला आहे. तर दुसरीकडे भाजपाला संपूर्ण राज्यभर मोकळ्या श्वासाने काम करून पक्ष विस्ताराची संधी मिळाली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टी स्वबळावर सत्तेवर येईल, असा विश्वास विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र …

Read More »

केंद्रीय मंत्री राणे म्हणाले, बाळासाहेब असते तर त्यांनी मला……. स्व.बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळाला भेट दिल्यानंतर करून दिली आपल्या भावनांना वाट

मुंबई : प्रतिनिधी केंद्रात मंत्री पदाचा भार दिड महिना सांभाळल्यानंतर जन आर्शीवाद यात्रेच्या निमित्ताने मुंबईच्या दौऱ्यावर आलेले मंत्री नारायण राणे यांनी आज सकाळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेत भावूक झाले. आज बाळासाहेब असते तर त्यांनी मला असाच आणखी यश मिळव म्हणून आर्शिवाद दिला असता आणि डोक्यावर हात ठेवला …

Read More »

तातडीने पाऊले उचला, देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र संभाजीनगरमध्ये उद्योजकांवर होणारे हल्ले गंभीर!

मुंबई: प्रतिनिधी उद्योगनगरी संभाजीनगरमध्ये सातत्याने उद्योजकांवर होत असलेले हल्ले, त्यातून महाराष्ट्राबाहेर जाणारे विपरित चित्र, यामुळे रोजगारांवर येणारी गदा, इत्यादींचा गांभीर्याने विचार करून याबाबत तातडीने पाऊले उचलण्यात यावीत तसेच जलदगती न्यायालयात खटले चालवून आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी करणारे पत्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे …

Read More »

न्यायपालिकेची स्वतंत्रता धोक्यात घालण्याचे काम कोणाच्या इशाऱ्यावर ? लोकशाही अबाधित ठेवण्यासाठी न्यायपालिकेचे पावित्र्य व स्वतंत्रता जपणे गरजेचे-नाना पटोले

मुंबई: प्रतिनिधी लोकशाही व्यवस्थेत न्यायपालिकेला अत्यंत महत्वाचे व स्वतंत्र स्थान आहे. देशातील जनतेचा आजही न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. परंतु न्यायपालिकेच्या कारभारातील वाढता हस्तक्षेप चिंतेचा असून त्यांची स्वतंत्रता धोक्यात घालण्याचे काम होत आहे. लोकशाहीसाठी हे अत्यंत गंभीर असून असे प्रकार कोणाच्या इशाऱ्यावर केले जात आहेत? असा सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी …

Read More »

सणासुदीच्या काळात कोरोनादूत बनू नका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन

मुंबई : प्रतिनिधी आगामी दिवस हे सणासुदीचे दिवस आहेत. या दिवसांमध्ये कोविडदूत म्हणून काम करू नका आणि तिसऱ्या लाटेला निमंत्रण देवू नका असे आवाहन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी करत निर्बंध शिथील केलेले असले तरी नागरीकांनी पुरेशी काळजी घ्यावी असे आवाहन त्यांनी केले. राज्यातून कोविडची लाट संपलेली नाही. पहिल्या आणि दुसऱ्या …

Read More »

मराठवाड्याच्या विकासासाठी लवकरच सर्व जिल्हाधिकारी, विभागप्रमुखांची बैठक केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड यांची माहिती

नांदेड : प्रतिनिधी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मला अर्थ राज्यमंत्रिपद दिले आहे. मी मराठवाड्यातील लातूर येथील भूमिपुत्र असून औरंगाबाद येथे स्थायिक झालो आहे. येणार्‍या अर्थसंकल्पात मराठवाड्याला झुकते माप देण्याचा माझा प्रयत्न राहिल, असे प्रतिपादन केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांनी मंगळवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केले. ते जन आशीर्वाद यात्रेनिमित्त …

Read More »

अजित पवारांच्या उपस्थितीत मोठा निर्णय: व्यापारी, टपरीधारक, व्यावसायिकांना होणार लाभ अतिवृष्टीसह पुरबाधितांच्या कर्ज पुरवठ्यासाठी जिल्हा बँका देणार या नाममात्र व्याज दराने कर्ज

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील पुणे, सातारा, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी व  सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अतिवृष्टी, पूरग्रस्त भागातील बाधित दुकानदार, व्यवसायिक, टपरीधारकांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारच्यावतीने पात्र बाधितांना सरसकट ५० हजार रुपयांची मदत देण्याचा महत्वपूर्ण निर्णय यापूर्वीच घेतला. आता त्याचबरोबर या बाधित व्यावसायिकांना पुन्हा उभे करण्यासाठी सामाजिक बांधिलकी राखत तेथील जिल्हा मध्यवर्ती बॅंकांनी पुढाकार …

Read More »

तळीये गावातील दरडग्रस्तांसाठी गुजरातमधून घरे येणार सातही वाड्यांमधील २६१ घरांची पुनर्बांधणी म्हाडा 'प्री-फॅब' पद्धतीने करणार - गृहनिर्माण मंत्री डॉ.जितेंद्र आव्हाड

मुंबई: प्रतिनिधी अतिवृष्टीमुळे कोकणातील तळीये गावात दरड कोसळून झालेल्या दुर्घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर जीवीतहानी होत गावच गायब झाले. तसेच सात वस्त्यांमधील घरांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले. त्यामुळे त्या सर्व बाधितांना घरे देण्याची घोषणा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केली. मात्र ही सर्व घरे सध्या गुजरातमधून तयार होवून येणार असल्याची माहिती म्हाडातील विश्वसनीय सूत्रांनी …

Read More »

एमटीडीसीच्या रूम्स आता मेक माय ट्रीप, स्काय-हायसह वरुन बुक करता येणार एमटीडीसीचे नवीन संकेतस्थळ, सिंहगड पर्यटक निवास, गणपतीपुळे येथे बोट क्लबचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

मुंबई: प्रतिनिधी महाराष्ट्राला नैसर्गिक, ऐतिहासिक, पौराणिक, भौगोलिक असे विविधांगी पर्यटनवैभव लाभले आहे. राज्यात जंगले, पुरातन गडकिल्ले, गुंफा, मंदिरे, समुद्रकिनारे, वन्यजीव असे पर्यटन वैविध्य असून हे जगाभरापर्यंत पोहोचविण्यासाठी पर्यटन विभागाने विविध उपक्रम हाती घेतले आहेत. यातून देशातील आणि जगभरातील पर्यटक महाराष्ट्राकडे आकर्षित होतील आणि त्याद्वारे राज्याचा पर्यटनविकास होऊन रोजगार निर्मिती आणि …

Read More »