Breaking News

केंद्रीय मंत्री राणे म्हणाले, बाळासाहेब असते तर त्यांनी मला……. स्व.बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळाला भेट दिल्यानंतर करून दिली आपल्या भावनांना वाट

मुंबई : प्रतिनिधी

केंद्रात मंत्री पदाचा भार दिड महिना सांभाळल्यानंतर जन आर्शीवाद यात्रेच्या निमित्ताने मुंबईच्या दौऱ्यावर आलेले मंत्री नारायण राणे यांनी आज सकाळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेत भावूक झाले. आज बाळासाहेब असते तर त्यांनी मला असाच आणखी यश मिळव म्हणून आर्शिवाद दिला असता आणि डोक्यावर हात ठेवला असता या शब्दात आपल्या भावनांना राणे यांनी वाट करून दिली.

शिवाजी पार्क येथील शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेतल्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

स्मृतीस्थळास भेट देण्यावरून काहीजणांचे डावे आणि उजवे बोलत होते. परंतु ज्यांना बोलायचे आहे त्यांनी असे आडबाजूने बोलण्यापेक्षा थेट बोलावे असे आव्हान शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचा नामोल्लेख न करता दिले. तसेच यागोष्टीकडे राजकारण म्हणून न पाहता माणूस म्हणून पहा एका व्यक्तीच्या भावनांना समजून घ्या अशी विनंतीही त्यांनी शिवसेनेच्या नेत्यांना केली.

मला जे काही मिळाले किंवा जे काही घडविले, जो काही आहे त्यामागे साहेबच आहेत. त्यामुळे मला त्यांच्या स्मृतीस्थळाच्या दर्शनासाठी कोणी अडवू शकत नसल्याचे ते म्हणाले.

मला केंद्रात मंत्रीपद मिळाले ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आर्शिवादाने आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यामुळे मिळाले. या दोघांचेही आभार मानताना मी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचेही आभार मानतो असे सांगत मी की सर्वसामान्य जनतेच्या मागण्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यत पोहोचविण्यासाठी जन आर्शिवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या यात्रेच्या निमित्ताने मी सर्वसामान्य जनतेची गाऱ्हाणी ऐकणार असल्याचे त्यांनी सांगितले.

नारायण राणे हे पूर्वाश्रमीचे शिवसैनिक आहेत. शिवसेनेत असताना त्यांचे आणि शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांचे जिव्हाळ्याचे संबध होते. राणे यांनी शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांना चांगलाच झटका बसला होता. त्यामुळे अनेकदा त्यांच्या भाषणात नारायण राणे यांचे नाव बाळासाहेब ठाकरेंच्या तोंडून यायचे. राणेंच्या काँग्रेस प्रवेशावरून ते टीकाही करायचे पण त्यांच्या टीकेतून कधीही कडवटपणा बाहेर आला नाही.  मात्र केंद्रीय मंत्री म्हणून ते शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर दर्शन घेण्यासाठी जाणार असे जाहिर केल्यानंतर शिवसेना नेत्यांशी त्यांच्यावर टीकेचा भडीमार केला.

Check Also

जयंत पाटील यांच्या टीकेवर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ते त्यांचे कामच पण… बिन खात्याचे मंत्री करणार ध्वजारोहण

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला असतानाही अद्याप मंत्र्यांचे खाते वाटप करण्यात आलेले नाही. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे …

Leave a Reply

Your email address will not be published.