Breaking News

राजकारण

तळीये गावातील दरडग्रस्तांसाठी गुजरातमधून घरे येणार सातही वाड्यांमधील २६१ घरांची पुनर्बांधणी म्हाडा 'प्री-फॅब' पद्धतीने करणार - गृहनिर्माण मंत्री डॉ.जितेंद्र आव्हाड

मुंबई: प्रतिनिधी अतिवृष्टीमुळे कोकणातील तळीये गावात दरड कोसळून झालेल्या दुर्घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर जीवीतहानी होत गावच गायब झाले. तसेच सात वस्त्यांमधील घरांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले. त्यामुळे त्या सर्व बाधितांना घरे देण्याची घोषणा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केली. मात्र ही सर्व घरे सध्या गुजरातमधून तयार होवून येणार असल्याची माहिती म्हाडातील विश्वसनीय सूत्रांनी …

Read More »

एमटीडीसीच्या रूम्स आता मेक माय ट्रीप, स्काय-हायसह वरुन बुक करता येणार एमटीडीसीचे नवीन संकेतस्थळ, सिंहगड पर्यटक निवास, गणपतीपुळे येथे बोट क्लबचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

मुंबई: प्रतिनिधी महाराष्ट्राला नैसर्गिक, ऐतिहासिक, पौराणिक, भौगोलिक असे विविधांगी पर्यटनवैभव लाभले आहे. राज्यात जंगले, पुरातन गडकिल्ले, गुंफा, मंदिरे, समुद्रकिनारे, वन्यजीव असे पर्यटन वैविध्य असून हे जगाभरापर्यंत पोहोचविण्यासाठी पर्यटन विभागाने विविध उपक्रम हाती घेतले आहेत. यातून देशातील आणि जगभरातील पर्यटक महाराष्ट्राकडे आकर्षित होतील आणि त्याद्वारे राज्याचा पर्यटनविकास होऊन रोजगार निर्मिती आणि …

Read More »

फडणवीस म्हणाले, पवारांना हे चांगलं माहित आहे…. ओबीसी आरक्षण प्रश्नी राज्य सरकार चालढकल करतयं

पुणे : प्रतिनिधी ओबीसी आरक्षण संपूर्ण देशातून गेलेले नाही तर ते फक्त एकट्या महाराष्ट्र राज्यातील गेलेले आहे. हे शरद पवारांना चांगलं माहित आहे. मात्र ओबीसींना आगामी महापालिका निवडणूका, नगरपालिका आणि नगर पंचायतीच्या निवडणूका होई पर्यत आरक्षण द्यायचे नाही. त्यामुळे ते पळ काढत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज …

Read More »

धर्माच्या नावावर राजकारण करणाऱ्यांना धडा शिकवा देशाचे संविधान व एकात्मता अबाधित राखण्यासाठी काँग्रेसचा लढा !: नाना पटोले

मुंबई : प्रतिनिधी स्वातंत्र्यपूर्वी व स्वातंत्र्यानंतरही काँग्रेस पक्षाने देशाच्या ज़डणघडणीत मोलाचे योगदान दिले आहे. स्वातंत्र्यानंतर भारताला आत्मनिर्भर बनवण्यासाठी काँग्रेसच्या सरकारने नियोजनपूर्वक आखणी करुन विकासकामे राबवली, त्यातूनच पायाभूत सुविधा निर्माण झाल्या, शिक्षण, रस्ते, पाण्याची व्यवस्था, आरोग्य व्यवस्था उभी राहिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने आणि काँग्रेस विचाराने देशातील एकात्मता कायम ठेवली …

Read More »

भाजपा राष्ट्रवादीची करणार पोलखोल भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा इशारा

कोल्हापूर : प्रतिनिधी मराठा आरक्षणाबाबत अपयश लपविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकारने राज्यांना अधिकार देण्यासाठी केलेल्या घटनादुरुस्तीबाबत चुकीची माहिती दिली आहे. या घटनादुरुस्तीबाबत अपप्रचार करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस जेथे जेथे सभा घेईल तेथे तेथे लगेचच भारतीय जनता पार्टीतर्फे त्यांचा खोटेपणा उघड करण्यासाठी आणि जनतेला सत्य सांगण्यासाठी पोलखोल …

Read More »

पवारांचा मोदींना टोला, राज्यपालांना कान पिचक्या तर राजना आजोबांची पुस्तके वाचण्याचा सल्ला आकड्यात चूक दुरूस्त किंवा सुधारणा करायची राहीली असावी

मुंबई: प्रतिनिधी मागील तीन वर्षापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सातत्याने १०० लाख कोटी रूपये पायाभूत सुविधांवर खर्च करणार असल्याचे सातत्याने सांगत आहेत. यंदाच्या लाल किल्ल्यावरील भाषणातही त्यांनी याचा उल्लेख केला. कदाचित त्यांना आकड्याच्या संख्येत झालेली चुक दुरूस्त करायचे किंवा सुधारणा करायचे राहीले असावे असा उपरोधिक टोला लगावत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा …

Read More »

शरद पवार म्हणाले, केंद्राने ताट वाढून दिलयं पण त्यातलं कोणालाच देता येत नाही आरक्षण देण्याचे अधिकार पुन्हा राज्यांना बहाल केल्याबाबत भूमिकेबद्दल पहिलीच प्रतिक्रिया

मुंबई: प्रतिनिधी साधारणत: दोन वर्षापूर्वी केंद्र सरकारने राज्यांना असलेले आरक्षणाचे अधिकार काढून घेत ते स्वत:कडे घेतले. त्यानंतर पुन्हा आरक्षण देण्याचा अधिकार राज्यांचाच असल्याची भूमिका मान्य करत हे अधिकार पुन्हा कायद्यात दुरूस्ती करत परत करण्यात आले. मात्र ५० टक्के अटीपेक्षा जास्त आरक्षण देण्याची अट अद्याप काढून टाकलेली नसल्याने केंद्राने ताट तर …

Read More »

अजितदादांच्या उपस्थित शरद रणपिसे, राज्यपालांचा अल्पसेंकदाचा संवाद पण महत्वाचा १२ आमदारांच्या नियुक्तीवरून झाला संवाद

पुणे : प्रतिनिधी स्वातंत्र्यदिना निमित्त राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते आज येथील विधान भवनात ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर उपस्थित असलेल्या मान्यवरांचा निरोप घेताना पुण्याचे खासदार गिरीष बापट, काँग्रेसचे विधान परिषदेतील आमदार शरद रणपिसे यांच्यासह अनेक जण उभे होते. त्यावेळी राज्यपाल समोर येताच रणपिसे यांनी राज्यपालांना १२ आमदारांच्या नियुक्तीचा प्रश्न उपस्थित …

Read More »

दालमियांच्या लाल किल्ल्यावरुन मोदींची पुन्हा फेकाफेकी अमृतकालाचे स्वप्न दाखवणाऱ्या मोदींच्या राज्यातील विषकालाचे काय ? सचिन सावंत

मुंबई : प्रतिनिधी ७५ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त दालमियांना आंदण दिलेल्या कंटेनधारी लाल किल्ल्यावरून गेल्या ७ वर्षांप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची याहीवर्षी फेकाफेकी सुरु होती. स्वतःच उद्ध्वस्त केलेल्या वर्तमानाच्या पार्श्वभूमीवर उज्ज्वल भविष्याचे स्वप्न दाखवणारे मोदी येत्या २५ वर्षात भारतात अमृत काल येईल असे आश्वासन देत आहेत. परंतु गेल्या ७ वर्षातील मोदी सरकारच्याच …

Read More »

स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत राज ठाकरेंची भूमिका राज्यावरून राष्ट्रीय होतेय (?) राज्यातील नागरीकांना देशवासिय म्हणून विचार करण्याचे आवाहन

मुंबई: प्रतिनिधी राज्याच्या राजकारणातील स्पष्ट भूमिका आणि नेमके मुद्दे मांडणारे नेते म्हणून राज ठाकरे यांच्याकडे पाहिलं जाते. आतापर्यंत राज ठाकरे यांनी राज्याची मातृभाषा मराठी माणूस यासह स्थानिक भूमिपुत्रांचा मुद्दा सातत्याने मांडत आलेले आहेत. मात्र यंदा १५ ऑगस्ट आणि स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षात प्रवेश करताना त्यांनी पहिल्यांदाच राज्यातील नागरीकांना देश म्हणून …

Read More »