Breaking News

अजितदादांच्या उपस्थित शरद रणपिसे, राज्यपालांचा अल्पसेंकदाचा संवाद पण महत्वाचा १२ आमदारांच्या नियुक्तीवरून झाला संवाद

पुणे : प्रतिनिधी

स्वातंत्र्यदिना निमित्त राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते आज येथील विधान भवनात ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर उपस्थित असलेल्या मान्यवरांचा निरोप घेताना पुण्याचे खासदार गिरीष बापट, काँग्रेसचे विधान परिषदेतील आमदार शरद रणपिसे यांच्यासह अनेक जण उभे होते. त्यावेळी राज्यपाल समोर येताच रणपिसे यांनी राज्यपालांना १२ आमदारांच्या नियुक्तीचा प्रश्न उपस्थित करत नियुक्तीबाबत विचारणा केली. त्यावर राज्यपाल कोश्यारी यांनीही त्यास तितक्याच हजरजबाबी पणे उत्तर देत मै उत्तर नही दुंगा असे सांगत अजित पवार यांच्याकडे उंगलीनिर्देश केला. मात्र त्यांच्या दरम्यान झालेल्या सवांदात सर्वच जणांच्या चेहऱ्यावर काही सेंकदासाठी हास्याची लकेर उमटली.

राज्यपाल भवनाकडून पुण्यातील या ध्वजारोहणाचा व्हिडिओ प्रसारीत करण्यात आला आहे. ध्यजारोहणानंतर राज्यपाल  कोश्यारी यांना त्यांच्या वाहनापर्यत सोडण्यासाठी पालकमंत्री अजित पवार हे राज्यपालांच्या पाठोपाठ चालू लागले. दरम्यान पुण्याचे खासदार गिरीष बापट, शरद रणपिसे हे समोर दिल्याने राज्यपाल त्यांच्याशी संवाद साधण्यास सुरुवात केली. त्यावेळी शरद रणपिसे यांनी राज्यपालांना १२ आमदारांच्या नियुक्ती संदर्भात विचारणा केली. त्यावर राज्यपालांनीही याबाबत मै उत्तर नही दुंगा असे सांगत मेरे मित्र मित्र है ये असे म्हणत अजित पवार यांच्याकडे अंगलीनिर्देश करत सरकारच्या पाठपुराव्याबाबत वक्तव्य केले.

त्यांच्या या वक्तव्याने गिरीष बापट यांच्या चेहऱ्यावर मात्र हास्याची लकेर उमेटल्याने नेमके राज्यपालांनी काय उत्तर दिले हे कळू शकले नाही. मात्र राज्य सरकार त्यासंदर्भात आग्रह धरत नसल्याचे सांगत तुम्ही का आग्रह धरता असा उलट प्रश्न केल्याची माहिती तेथे उपस्थित असलेल्या इतरांनी दिली.

दरम्यान, राज्यपालांनी दिलेल्या उत्तरावर प्रसारमाध्यमांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारले असता ते म्हणाले की, आज स्वातंत्र्यदिन आहे. या विषयावर नंतर बोलेन, एवढंच बोलून अजित पवारांनीही यावर बोलणे टाळले.

Check Also

उद्धव ठाकरे यांचा टोला, मुस्लिम लीगबद्दलची माहिती नरेंद्र मोदी यांना असेल….

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मुस्लिम लीगशी स्वातंत्र्यपूर्व काळापासून संबंध आहे. १९४२ साली जनसंघाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *