Breaking News

पवारांचा मोदींना टोला, राज्यपालांना कान पिचक्या तर राजना आजोबांची पुस्तके वाचण्याचा सल्ला आकड्यात चूक दुरूस्त किंवा सुधारणा करायची राहीली असावी

मुंबई: प्रतिनिधी

मागील तीन वर्षापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सातत्याने १०० लाख कोटी रूपये पायाभूत सुविधांवर खर्च करणार असल्याचे सातत्याने सांगत आहेत. यंदाच्या लाल किल्ल्यावरील भाषणातही त्यांनी याचा उल्लेख केला. कदाचित त्यांना आकड्याच्या संख्येत झालेली चुक दुरूस्त करायचे किंवा सुधारणा करायचे राहीले असावे असा उपरोधिक टोला लगावत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार म्हणाले यापूर्वी तर त्यांनी हाच आकडा सांगत दोन वर्षात हा निधी खर्च करण्याचे जाहिर केले होते. त्यावेळी त्यांना मी विचारले दोन वर्षात या गोष्टी कशा शक्य आहेत. त्यानंतर त्यांनी सुधारणा करण्याचे आश्वासन दिले असल्याची आठवणही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी राज्यपालांनी पुण्यात केलेल्या वक्तव्याच्या अनुषंगाने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पवार म्हणाले की, होय मी हे कुठे तरी ते वाचलंय, कदाचीत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना त्यांच्या कार्यतत्परमुळे असा टोला लगावत यापूर्वी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पाठविलेले पत्र मिळालेले वाचता आले नसावे. तेवढ्यात नवाब मलिक यांनीही तीन चार दिवसापूर्वी मी ही यासंदर्भातील पत्र त्यांना दिल्याचे सांगितले. त्यावर आता मलिक यांनी दिलेले पत्रही त्यांनी अद्याप वाचलेले नसल्याचे दिसून येते. त्यांनी किमान आलेली पत्रे तरी वाचावित असा सल्लाही राज्यपालांना पवार यांनी दिला.

राज ठाकरेंना सल्ला    

राज ठाकरे यांनी केलेल्या आरोपासंदर्भात विचारले असता ते म्हणाले की, याबाबत मी काही भाष्य करणार नाही. पण मी त्यांना सल्ला देईन की त्यांनी प्रबोधनकारांचे साहित्य वाचावं त्यांना त्यांच्या प्रश्नांचे उत्तर मिळेल.

संसदेतील सुरक्षांचा वापर आणि महिला सदस्यांना धक्काबुक्की लोकशाहीसाठी घातक

संसदेच्या सुरुवातीला सभागृहाच्या अध्यक्ष आणि सभापतींच्या उपस्थित सर्वांची मिळून बैठक झाली. या बैठकीत विरोधकांकडून पेगॅसिस प्रश्न, शेतकरी कायदा आणि पेट्रोल-डिझेलची सातत्याने होणारी दरवाढ हे प्रमुख प्रश्न मांडत यावरील चर्चेची मागणी केली. त्यावर सरकारकडून या तिन्ही प्रश्नांवर चर्चा घेण्यात येणार असल्याचे सांगितले. त्यावर विरोधकांनी तुमच्या कडून मिळालेल्या कार्यक्रम पत्रिकेत हे तिन्ही विषय नसल्याचे निदर्शनास आणून दिले. सभागृहातही या तीन प्रश्नांवर चर्चेची मागणी विरोधकांकडून पहिल्या दिवसांपासून करण्यात येत होती. त्यादिवशी विरोधक वेलमध्ये गेले.

माझ्या आतापर्यतच्या संसदीय राजकिय कारकिर्दीत आणि इतिहासातही एखाद्या प्रश्नावर चर्चा करायची नाही म्हणून ३० ते ४० सुरक्षा सदस्य सभागृहात बोलावून विरोधकांना शांत करण्याचा प्रयत्न झाला नाही. तसेच या सुरक्षाकडून महिला सदस्यांना झालेली धक्काबुक्की या घटना चुकिच्या असून संसदीय लोकशाहीसाठी घातक असल्याचे त्यांनी सांगितले.

त्यानंतर सभागृह नेत्याने याप्रश्नी सरकारची योग्य ती भूमिका मांडणे गरजेचे असताना केंद्र सरकारचे सात मंत्री प्रसारमाध्यमांसमोर झाला प्रकार चुकिच्या पध्दतीने मांडत चौकशीची मागणी केले. यावरून केंद्र सरकारची भूमिका कच्ची होती असा आरोप करत याची त्यांना जाणीव होती म्हणूनच त्यांनी ती भूमिका मांडल्याचे त्यांनी सांगितले.

तुमच्यातल्या संजय राऊतांना फिजिकली उचलले

तुमच्यातले ते संजय राऊत हे ही त्यावेळी सभागृहात होते. सभागृहात आलेल्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना उचलले फिजिकली त्यांना उचलून बाजूला ठेवले. सुदैवाने यात त्यांना कोणतीही दुखापत झाली नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

राज्यसभा हे वरिष्ठांचे सभागृह आहे. या सभागृहात आतापर्यत जे वाद असतील, मतभेद असतील त्यावर चर्चा करून मार्ग काढण्यात आला आहे. या वरिष्ठांच्या सभागृहात एकदम ३० ते ४० सुरक्षा रक्षक बोलाविणे आणि महिला सदस्यांना धक्काबुक्की करणे या घटना घातक असून अशा प्रकारच्या घटनांमधून केंद्र सरकार संसदेची विश्वासार्हता घालवित असून हे चांगले नसल्याचा इशारा त्यांनी दिला.

परराष्ट्र धोरणाची पुर्न आढावा घेण्याची वेळ

यापू्र्वी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या काळापर्यत सर्वच शेजारील राष्ट्रांशी चांगले संबध असावेत यादृष्टीने प्रयत्न होत होते. त्यावेळी फक्त चीन आणि पाकिस्तानकडून भारताला त्रास होत होता. मात्र आता नेपाळ सारखा देशही आपल्या बद्दल भूमिका बदलतोय, बांग्लादेशही बदलतोय, आता  अफगाणिस्तान मध्येही आता भूमिका बदल होतोय यावरून या सर्वच गोष्टींचा आढावा घेण्याची गरज आहे. याप्रश्नी अधिक काही बोलता येणार नाही कारण देशाच्या सुरक्षेचा मुद्दा आहे. याप्रश्नी आम्ही केंद्र सरकारशी बोलू आणि वेळप्रसंगी सोबतही राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Check Also

अजित पवार म्हणाले, मग आम्ही पण शक्तीमान असल्याचे दाखविण्यासाठी तसं… प्रसार माध्यमाच्या प्रतिनिधीच्या सवालावर अजित पवारांचे उत्तर

शिंदे-फडणवीस सरकार स्थानापन्न झाल्यानंतर राज्याचे पहिलेच विधिमंडळ अधिवेशन होत आहे. यापार्श्वभूमीवर विरोधकांच्या बैठकीचे आयोजन करण्यात …

Leave a Reply

Your email address will not be published.