Breaking News

राजकारण

अजित पवार म्हणाले, निकालामुळे ‘ईडब्ल्यूएस’ आरक्षणाला घटनात्मक चौकट सामाजिक न्यायाच्या चळवळीला आर्थिक निकषाचा आयाम देणारा क्रांतिकारी निर्णय

सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारने राज्य घटनेतील १०३ कायद्यात दुरूस्ती करत आर्थिक दुर्बल घटकांना दिलेल्या आरक्षणाचा कायदा वैध ठरविला. तसेच या कायद्यामुळे राज्य घटनेच्या मुळ डाच्याला धक्का पोहोचत नसल्याचे स्पष्ट केले. या निकालावर राज्यातील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आपली प्रतिक्रिया देताना म्हणाले, दहा टक्के आरक्षण कायम राहिल्याने समाजातील एका मोठ्या …

Read More »

अब्दुल सत्तार सुप्रिया सुळेंना म्हणाले, भिक्कार## झाली असेल तर…

वादग्रस्त विधानांमुळे कायमच चर्चेत असणारे शिंदे-फडणवीस सरकारमधील कृषी मंत्री तथा शिंदे गटाचे नेते अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना औरंगाबादेत वृत्तवाहीनीशी बोलताना शिवी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. लोकशाही या वृत्तवाहीनीच्या प्रतिनिधीने सुप्रिया सुळे यांनी केलेल्या टीकेवर प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी अब्दुल सत्तार यांच्याकडे विचारणा केली. त्यावर अब्दुल …

Read More »

आर्थिक मागासांना आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने गरीबांना दिलेले दहा टक्के आरक्षण वैध ठरविण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे आपण स्वागत करतो, अशी प्रतिक्रिया भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी व्यक्त केली. या आरक्षणामुळे राज्यातील मराठा आणि अल्पसंख्यांकासह विविध समुदायातील गरीबांना लाभ होत असून पंतप्रधान मोदी हे गरीबांचे तारणहार असल्याचे पुन्हा सिद्ध झाले आहे, …

Read More »

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा, ठाण्यात नवी चित्रनगरी

मराठी नाट्य, चित्रपटसृष्टी जपण्यासाठी त्यांना आवश्यक त्या सर्व सोयी-सवलती दिल्या जातील. मराठी कलाकारांच्या पाठिशी शासन ठामपणे उभे आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिली. माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांच्या १२ हजार ५०० व्या विक्रमी नाट्य प्रयोगाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त दामले यांचा मुख्यमंत्री …

Read More »

राहुल गांधी सोमवारी संध्याकाळी नांदेडमध्ये: वडील भारत छोडो तर मुलगा भारत जोडोत

केरळपासून सुरु झालेली काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रा त्यांच्या नियोजित वेळेनुसार उद्या सोमवारी ७ नोव्हेंबर रोजी नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथे संध्याकाळी ७.३० वाजता पोहोचत आहे. भारत जोडो यात्रा नांदेडमधील देगलूर येथे पोहचल्यानंतर यात्रेचे जंगी स्वागत करण्यात येणार असल्याची माहिती माजी मंत्री तथा काँग्रेस नेते अशोक चव्हाण …

Read More »

निकालानंतर आशिष शेलारांनी लटकेंचे अभिनंदन करत म्हणाले, तर पराभव निश्चित होता

स्व.रमेश लटके यांच्या निधानामुळे रिक्त झालेल्या अंधेरी पूर्व विधानसभेच्या जागेकरीता झालेल्या निवडणूकीचा निकाल आज जाहिर झाला. या निवडणूकीत लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उध्दव ठाकरे गटाकडून उमेदवारी देण्यात आली होती. अपेक्षेनुसार या निव़डणूकीत ऋतुजा लटके यांचा ६५ हजारहून अधिक मते मिळवित विजय झाला. या निकालानंतर भाजपा नेते तथा मुंबई …

Read More »

उध्दव ठाकरे म्हणाले, थोडं पाणी पडलं पण तरीही मशाली भडकल्या विजयानंतर ऋतुजा लटके मातोश्रीवर ठाकरेंच्या भेटीला

शिवसेनेतील फुटीनंतर शिंदे गट-भाजपा आणि उध्दव ठाकरे गटातील पहिली लिटमस टेस्ट अंधेरी पूर्व विधानसभा निवडणूकीच्या निमित्ताने पार पडली. या निवडणूकीत ६५ हजार मतांनी विजय मिळविल्यानंतर उध्दव ठाकरे गटाच्या विजयी उमेदवार ऋतुजा लटके या मातोश्रीवर जात उध्दव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्या समवेत मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्ये उपस्थित होते. यावेळी उध्दव …

Read More »

भाजपा म्हणते, लटकेंचा विजय निश्चित होता त्यात नव्याने सांगण्यासारखे काही नाही

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात येत असतानाच रोज त्या पक्षाचे कार्यकर्ते बाहेर पडून भारतीय जनता पार्टीत प्रवेश करत आहेत. त्यांची यात्रा नेत्यांनी ताब्यात घेतली असून ती सामान्य कार्यकर्त्यांसाठी किंवा जनतेसाठी नाही, अशी टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी रविवारी केली. ठाणे जिल्ह्याच्या संघटनात्मक प्रवासाच्या दरम्यान त्यांनी मीरा …

Read More »

भाजपाच्या तोडफोडीच्या व दहशतीच्या राजकारणाला अंधेरीच्या विजयाने चोख उत्तर

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा दणदणीत विजय हा ईडी सरकारवर जनतेचा विश्वास नसल्याचे स्पष्ट करणारा आहे. या मतदारसंघात भाजपा व शिंदे गटाची ताकद नसतानाही निवडणुक लढवण्याचा अट्टाहास केला होता. आपला दारूण पराभव होत असल्याची चाहूल लागल्यानेच भाजपाला निवडणुकीतून पळ काढावा लागला. महाविकास आघाडीवर विश्वास व्यक्त …

Read More »

विजय झाला तरी पण उध्दव ठाकरेंसमोर खडतर आव्हाने

शिवसेनेतील फुटीनंतर पहिली लिटमस टेस्ट अर्थात अंधेरी पोटनिवडणूकीचा निकाल आज जाहीर होत आहे. या निवडणूकीत उध्दव ठाकरे यांच्या गटाकडून ऋतुजा लटके यांना तर भाजपाकडून मुर्जीत पटेल यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. वास्तविक पाहता या निवडणूकीच्या निमित्ताने एकनाथ शिंदे गट आणि उध्दव ठाकरे गट यांच्यात थेट सामना होईल अशी अटकळ बांधण्यात …

Read More »