Breaking News

राजकारण

राहुल गांधी यांनी बंगला केला रिकामा चावी देताना म्हणाले, खरं बोलण्याची किंमत… हसतमुखाने बंगल्याची चावी केली अधिकाऱ्यांच्या हाती सुपुर्द

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत केलेल्या एका वक्तव्यामुळे सुरत न्यायालयानं त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर त्यांची खासदारकी रद्द झाली. त्यानंतर लोकसभा सचिवालयाने राहुल गांधी यांना ३० एप्रिलपर्यंत बंगला रिकामा करण्याची मुदत दिली होती. त्यानुसार ३० एप्रिलपूर्वीच राहुल गांधी यांनी बंगला रिक्त करत आज स्वतः बंगल्याला कुलुप लावत …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांनी डॉ सावंतांना दिले प्रशस्तीपत्रक, तर विरोधकांच्या पोटदुखीवर … डॉ.तानाजी सावंत यांना शिक्षणमंत्री करायचे होते पण...

ठाणे जिल्हा मल्टिस्पेशालिटी रुग्णालयाचा भूमिपूजन सोहळा शनिवारी, अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाला. यावेळी केंद्रीय पंचायत राजमंत्री कपील पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्यासह आमदार, खासदार उपस्थित होते. या सोहळ्यात बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांना टोले लगावले. तसेच आरोग्य विभागाने गेल्या काही काळात …

Read More »

नाना पटोले यांचा टोला, चव्हाण सरकारबदद्ल… तर अजित पवारांनी तेव्हाच बाहेर पडायचे ना सत्यपाल मलिकांनी मोदींचा खरा चेहरा जनतेसमोर आणल्यानेच सीबीआयकडून नोटीस

पुलवामा घटना झाली त्यावेळी सत्यपाल मलिक हे जम्मू काश्मीरचे राज्यपाल होते, त्यावेळच्या घटनेचे सत्य त्यांनी जनतेसमोर उघड केले. आपल्या जवानांवर केलेला तो भ्याड हल्ला आहे, त्यावर पंतप्रधानांनी उत्तर दिले पाहिजे पण उत्तर न देता नरेंद्र मोदी सरकारचा खरा चेहरा जनतेसमोर आणला म्हणूनच सत्यपाल मलिकांना सीबीआयकडून नोटीस पाठवण्यात आली आहे, असा …

Read More »

सत्यपाल मलिक यांनी केलेले आरोप नेमके काय ? वाचा भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर आता काय परिस्थिती

द वायर या संकेतस्थळासाठी ज्येष्ठ पत्रकार करण थापर यांनी घेतलेल्या मुलाखती दरम्यान भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी काही दिवसांपूर्वी फेब्रुवारी २०१९ मधील पुलवामा दहशतवादी हल्ल्याबाबत मोठा दावा केला होता. जवानांच्या सुरक्षेमधील कथित त्रुटींबाबत मी बोलू नये, शांत राहावे; असे मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले …

Read More »

सत्यपाल मलिक यांना अटक? दिल्ली पोलिसांनी दिले हे स्पष्टीकरण समाज माध्यमांवरील माहितीमुळे पोलिसांनी केला खुलासा

भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा जम्मू काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी नुकतीच द वायर या संकेतस्थळासाठी ज्येष्ठ पत्रकार करण थापर यांना दिलेल्या मुलाखत दिली. या मुलाखतीवेळी सत्यपाल मलिक यांनी पुलवामा घटनेसंदर्भात गौप्यस्फोट केला. तसेच जम्मू काश्मीरच्या राज्यपाल पदी असताना दोन फाईलींवर सही करण्याचे ३०० कोटी रूपयांची लाच देण्याचे आमिष दाखविण्यात आल्याचा …

Read More »

शरद पवार यांचा सवाल, जर कुणी हल्लाच केला नाही तर हत्या झाली कशी… खारघर मृत्यूकांडाची चौकशी हायकोर्टाचे सिटींग न्यायाधीशांमार्फत व्हावी...

गुजरातमधील नरोडा पाटिया दंगलीतील ज्या लोकांची हत्या झाली. ती हत्या कशाने झाली. जर कुणी हल्लाच केला नाही तर हत्या झाली कशी? हत्या होते आणि हत्येकरु निर्दोष सोडले जातात म्हणजे एकादृष्टीने ज्यांची हत्या झाली त्यांचीही हत्या झाली तेही गेले आणि या देशात जो कायदा आहे जी कायद्याची व्यवस्था आहे. जे संविधान …

Read More »

मुख्यमंत्र्यांची ग्वाही, नवा आयोग नेमून मराठा समाजाचे विस्तृत आणि शास्त्रीय सर्वेक्षण करणार सर्वोच्च न्यायालयासमोर क्युरेटिव्ह याचिका दाखल करणार

मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाने राज्य शासनाची पुनर्विचार याचिका फेटाळली असली तरी मराठा आरक्षणाचे दरवाजे बंद झालेले नाहीत. हे आरक्षण मिळवून देण्यासाठी राज्य शासन ठाम असून अधिक मजबूत कायदेशीर लढा लढण्यात येईल. यासाठी उपचारात्मक याचिका (क्युरेटिव्ह याचिका) दाखल करण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या …

Read More »

अजित पवार यांचा पुण्यात सवाल, मी तर कोणाचं नावं घेतलं नाही, कोण संजय राऊत ? मग कोणाच्या अंगाला का लागावं...

ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे आणि खासदार संजय राऊत हे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी भेटीला गेल्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवसापासून राज्याचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीतील ज्येष्ठ नेते अजित पवार पक्षात बंडखोरी करणार असल्याच्या चर्चांना काही दिवसांपूर्वी जोर आला होता. मात्र, माध्यमांसमोर येत त्यांनी या चर्चांना पूर्णविराम …

Read More »

केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाकडून सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्याची दखल राजस्थान येथील पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या कार्यक्रम समितीच्या अध्यक्षपदी मुनगंटीवार यांची निवड

केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या अधिपत्याखाली असलेल्या राजस्थान येथील पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्रातील कार्यक्रम समितीच्या अध्यक्षपदी राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राजस्थानचे राज्यपाल तसेच पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्राचे अध्यक्ष कलराज मिश्रा यांच्या अध्यक्षतेत अलीकडेच झालेल्या बैठकीत कार्यकारी समितीने एकमताने सुधीर मुनगंटीवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. राज्याच्या सांस्कृतिक …

Read More »

अतुल लोंढे यांचा सवाल, खारघर प्रकरणी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री गप्प का ? खारघर प्रकरणाच्या चौकशीसाठी एक सदस्यीय सरकारी समिती म्हणजे निव्वळ धुळफेक

महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान कार्यक्रमात १४ लोकांचा मृत्यू हे शिंदे-फडणवीसांच्या निर्लज्ज सरकारचे बळी आहेत. सरकार आजही या प्रकरणावर मूग गिळून गप्प आहे. खारघर घटनेची चौकशी करण्यासाठी सरकारने महसूल विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली नेमलेली एक सदस्यीय समिती ही केवळ धुळफेक आहे. सरकारच सरकारची चौकशी करत असेल तर ती निष्पक्ष कशी …

Read More »